आधार
आधार
मान्य आहे उदरातल्या त्या गडद अंधारातून
प्रकाशात येताना सोबत एकटेपणाच असतो
आणि मरण रुपी काळोखात सुद्धा आपण एकटेच असतो
परंतु दोन्ही मधल्या उजेडात
वावरवण्याला म्हणतात कला जगण्याची अन्
सर्वांना भासते कधीतरी गरज आधाराची
त्या आधाराला साथ हवी असते आपुलकीची, प्रेमाची
जगण्याला खरा अर्थ मिळते तेव्हा
जेव्हा असते सोबत कुणाची
सर्वांनाच भासते कधीतरी गरज आधाराची
वेलीला जशी गरज असते झाडाची
जीवन रूपी वादळवाऱ्यात उभे राहण्यासाठी
जशी असते झाडाला पाण्याची
आधाराशिवाय अर्थहीन दिशा जीवनाची
एकटेपणाला जगणं म्हणत नाही
किंमत नसते एकटेपणाची
जगण्यासाठी असते गरज आधाराची
आधारच करून देतो ओळख आपल्याला स्वतःची
जाणवून देतो किंमत आपल्याला स्वअस्तित्वाची
आधाराशिवाय असह्य जीवन
कारण प्रत्येकालाच गरज असते एकातरी खांद्याची
नाही औषधी या प्रारब्धाला
खोलवरच्या जखमेवरती हलकीशी फुंकर घालायला
गरज असते आधाराची
नाही उमगले जरी ध्येय जीवनाचे
तरी हरवलेल्या वाटेवरती योग्य दिशा,
अंधारातल्या अज्ञानात धडपडणार्या
या जिवाला मिळावा मार्ग चांगला
असते मनीची एवढी आशा
सार्थक जीवन होईल सर्वदा निवारता व्यथा दुःखितांची
असते गरज सर्वांना आधाराची
वंचित असे आई-वडिलांच्या प्रेमापासून
असे जो एकटा
आधार मायेचा देऊन बघावा कधीतरी
निःस्वार्थपणे हात गरजूंना द्यावा मदतीचा
संकटकाळी भेदभाव विसरूनी शत्रूलाही आधार द्यावा चांगले काम करतांना मनात प्रेमभाव सदा असावा
लाभेल मनास एक वेगळी शांती आणि समाधान
जीवनात कधीतरी देऊन बघावा आधार ... 🙏😊
