STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

आभाळमाया

आभाळमाया

1 min
253

ऊब आईच्या मायेची 

जगण्यास धीर देई, 

आभाळमाया दिसे 

ममतेत ठाई ठाई. !!१!! 


बाप सदा कवठाळे 

कुटुंबास बाहुपाशात 

वागणे जरी कठोर 

दिसे माया शिस्तीत. !!२!!


ईश्वराची कृपा दिसते 

सर्व भक्त बांधवात,

रोज रोज दर्शन घेता 

मिळे माया आशीर्वादात. !!३!!


पावसाची माया जणु 

आभाळभर पसरते, 

धन्य करे लेकरास 

धरतीस सुखावते. !!४!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational