Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jyoti gosavi

Comedy Others

4.0  

Jyoti gosavi

Comedy Others

चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या

2 mins
299


हवा येऊ द्याच्या सेटवर आर्ची. 

मराठीमध्ये "शोलेचा" रिमेक बनतो.

आर्चीचा बसंतीचा रोल आहे. 

डॉक्टर निलेश साबळे, आर्चीची मुलाखत घेत आहेत.

 

आर्ची पिक्चरच्या प्रमोशनसाठी चला हवा येऊ द्याच्या सेटवर येते. नमस्कार मंडळी हसताय ना आत्ताच हसून घ्या नंतर तुमच्यावर रडायची पाळी येणार आहे. अरे! स्वारी, स्वारी, चुकून बोललो बोललो हसताय ना मंडळी हसायलाच पाहिजे.


कार्यक्रमाला सुरुवात होते.


नमस्कार, मराठीमध्ये शोलेचा रिमेक येतोय त्यामध्ये आपली सगळ्यांची लाडकी आर्ची बसंतीचा रोल करतेय. मंडळी या सिनेमाबद्दल मलादेखील तुमच्याएवढीच उत्सुकता आहे.


आर्ची, जय आणि विरू यांच्या रोलमध्ये कोण आहे?


जय आणि विरू हे दोन सख्खे जुळे भाऊ या सिनेमात दाखवले आहेत. त्या दोन्ही भूमिका सुनील बर्वे करत आहेत.


आर्चीच्या वाक्याबरोबर अँकरला धक्का बसतो. 


काय! सुनील बर्वे?? निलेश साबळे जोरात किंचाळतात, अगं पण सुनील बर्वे ॲक्शन हिरो आहे का? जय आणि विरू यांच्यासाठी ते सूट होतील का?


त्यावर आर्चीचे उत्तर, जास्त मारामारी त्यांना दिलेली नाही ती मारामारी मीच करते.


ते जाऊ दे गब्बरच्या रोलमध्ये कोण आहे? 


भाऊ कदम.


निलेश साबळे पुन्हा एकदा आश्चर्यात पडतात, काय? 


गब्बरच्या रोलमध्ये भाऊ कदम? तिथे काय कॉमेडी करायची आहे? निलेश साबळे विचारतात.


अहो तसं नाही भाऊ कदम आणि गब्बर यांच्यात एक साम्य आहे दोघांना पण तंबाखू आवडते. फक्त भाऊ कदम "आक थू" करत नाही.


मग याचे निर्माते कोण आहेत? 


याची निर्माती मीच आहे.


काय! तू निर्माती पण झालीस?

 

हो मला स्वतःलाच धमाकेदार ब्रेक द्यावासा वाटला.

 

मग या सिनेमाला "सबकुछ आर्ची" असं म्हणायला काहीच हरकत नाही. बरं जयाजींचा रोल कोण करते?


आता जया त्यात कशाला पाहिजे? 


जयाजींचा रोलच नाही. अरे मग जयसाठी हीरोइन कोण?


जयसाठीदेखील मीच हीरोइन. आपण प्रेमाचा ट्रँगल बघतो की नाही तसे या सिनेमांमध्ये दोन जुळे भाऊ एकाच मुलीवर प्रेम करतात. ती मी आहे.


मग गब्बर या सिनेमात काय करतो?


गब्बर तंबाखू आणि गुटखा यांचे स्मगलिंग करतो. त्यासाठीच आमच्या गावांमध्ये येऊन लपून बसलेला असतो. आणि जय आणि विरू हे दोन जुळे भाऊ पोलिस ऑफिसर असतात.

 

अरे पण, मूळ सिनेमात ते कैदी असतात ना?

 

असं कुठे सांगितलंय का? रिमिक्स करताना काही बदल करू नये.


अगं पण इतर सगळ्या स्टोरीची मोडतोड केली तुम्ही.एकही पात्र खरं नाही. तुमच्या सिनेमात ठाकूरचा रोल तरी आहे का?

 

हो! ठाकूर आहे, तो आणि गब्बर गुटखा स्मगलिंगच्या धंद्यात पार्टनर असतात. ठाकूर आपल्या हवेलीमध्ये गब्बरला स्मगलिंग गुटखा सामान लपवून ठेवायला मदत करत असतो. 


बसंती गुप्तहेर असते तीच या स्मगलिंगबद्दल टीप देते. आणि तिच्या मदतीने जय आणि विरू गब्बरविरोधात आघाडी उघडतात. 


अच्छा! मग तुझ्या सिनेमांमध्ये एकंदरीत प्रेमाचा त्रिकोण आहे, मग बसंती कोणाशी लग्न करते.


बसंती गब्बरला पकडून देते आणि स्वतः धंद्याची मालकिण बनते आणि सांभाशी लग्न करते कारण तिला तिच्यापेक्षा वरचढ नवरा नको असतो. ती वाघीण असते.

 

अरे वा वा छान, मग सिनेमाचे नाव शोले कशाला? "बसंती वाघीण" असे का नाही ठेवत नाही?


अरे नावातूनच स्टोरी कळता कामा नये, म्हणून शोलेचा रिमेक असे नाव दिले आहे. पण मीच या सिनेमाची निर्माती, दिग्दर्शक, हिरोईन असून, वाघीण आहे वाघीण!


असे बोलत असताना आर्चीच्या पायापाशी एक झुरळ उडून येते. त्याबरोबर ती वाघीण खुर्चीवर उभी राहते आणि जोरजोरात आरडाओरडा करायला लागते. 


आणि त्यावर निलेश साबळे कार्यक्रम संपवतात आणि म्युझिक वाजते. 


चला हवा येऊ द्या, चला आर्ची जाऊ द्या.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy