Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Swapnil Kamble

Drama

3  

Swapnil Kamble

Drama

बँडस्टँड

बँडस्टँड

3 mins
9.0K


एक नावाजलेली लेखिका बक्षिस समारंभातुन रात्री उशीरा घरी येते. तिने कमविलेले पारितोषिक तसेच साथीचा या वर्षाचा साथी ऑफिस ऑफ दि ईयर पुरस्कार तिने वर्षभर केलेल्या लिखाणास मिळतो.

ती जाम खुश असते. त्यारात्री ती उशीरा घरी परतते. नवरा नुकताच कामावरून आलेला असतो. फ्रिजमध्ये ठेवलेले जेवण तो गरम करुन खातो.

ती मात्र फ्रेश होते. अंग बिछान्यावर लोटते. तेवढ्यात नवरा तिला उठवतो. ती उठत नाही. नवऱ्याला तिचे हे लेखनसंबंधी कार्य खटकत असते. पण तिच्या समोर डोके फोडून काय फायदा.

तो तिला उठवत असतो. ती त्याला झटकते. त्याला जे हवे असते. तिला ते नको होते. तिचे अंग समारंभाचे संचालन करुन तसेच पाहुण्यांची उठबस करुन थकले असते.

तो तिच्या अंगावर हात टाकतो. तिला जवळ घेतो. तिला ते नको असते.

“आज नको, आज मी खूप थकले आहे”

असे म्हणून ती कुस बदलते.

नवर्याला तिच्या अशा वागण्याने तिची कीव आली होती. तो ह्या लेखक कवींना मनोमनी डाफरत होता. "कसले हिला चाळे लागले हे, एक दिवसपण मनासारखा हात लावायला देत नाही. त्यापेक्षा बारबाला परवडली असती. रोज रोमांस करायला मिळाला असता. प्रणयक्रिडेचं सुख अनुभवलं असतं."

बायको मात्र झोपेत बडबडत असते. मनात गालातल्या गालात हसत असते. नवरा मात्र तिच्या ह्या बक्षिसाकडे ढुंकूनपण बघत नाही. एक झी टिव्हीवरच्या हिंदी मालिका व आता हे बक्षिस समारंभ डोक्याला ताप करुन ठेवला आहे.

तो वैतागून बाल्कनीत येरझाऱ्या मारतो. परत फ्रिजमधुन पाण्याची बाटली घेऊन रूममध्येच चकरा मारत असतो. अचानक त्याचे लक्ष बायकोच्या डायरीकडे जाते टेबलावर ठेवलेली बुककेसजवळ पाने दुमडलेले पुस्तक त्यावर उपडे ठेवले होते.

आता झोप तर येणार नाही. निदान बायकोची डायरी तरी वाचू. मग तो डायरी उघडतो. डायरीची सुरुवात जूनपासून होती. पहिले पान वाचायला घेतो. त्यात पुढीलप्रमाणे वाचायला घेतो :

“आज ते दोघे बँडस्टँडवर बसले होते. एकमेकांच्या गळ्यात गळा घालुन. प्रथम तिने नकार दिला. पण एवढे प्रेमीयुगल पाहून तिचीही इच्छा झाली. त्याने तिच्या खांद्यावर हात टाकला. सावकाश सावकाश तो तिच्या केसांतुन हात फिरवत होता. मंदशी हवेची झुळूक तिच्या केसातून गेली. मग त्याने तिच्या ओठावर हात ठेवला. अंगावर शहारे येताता तसा तो स्पर्श करीत होता. तिने आपले डोळे बंद केले. त्याने तिला कवेत घेतो. तेवढ्यात ओठांची किस घेणार तेवढ्यात फोन वाजतो.”….

हे सर्व वाचुन तो थक्कच झाला. कारण लग्न झाल्यापासून तिने कधीच असे प्रणयकारी लक्षणे केली नाही. कधीच प्रणयसुखाचा उच्चांक गाठला नव्हता. नाही कधी तिने किस घेण्यासाठी चेतना दिली. मी जेव्हा जेव्हा तिला स्पर्श करायचे. कधीच शरीरसंबंधाचे येवढे प्रकार तिने लिहीले कसे. हाच मोठा त्याच्या मनाला पेच होता.

आयुष्यात कधीच आम्ही मुक्तपणे शरीरसंबंधावर बोललो नाही. मग हे तिने कसे लिहीले.

तो ताडकन उठतो. डायरी टेबलावर ठेवतो. बेडरूममध्ये घुसतो. तिला अलवार स्पर्श करतो. तिच्या संपूर्ण शरीरावर स्पर्शाने न्याहाळतो. तिच्या शरीरावर रोमांच स्पर्श करतो. तिला जे जे करता आले तो ते वास्तविक जिवन तो तिला देण्याचा प्रर्यंत करीत असते.

तो तिची किस घ्यायला जाणार तेवढ्यात तिला जात येते :

“हे काय करताय”

“जे या अगोदर करायचे राहीले होते”

जे तू मनात भावना दाबून ठेवल्यास भावना तु डायरीत उतरवतेस… काल्पनिक जगात वावरतेस.

“ते फक्त मनातील भाव मी कागदावर उमटवते”

तेच शब्द तुझे अस्सल मनातील चित्र आहे.

ती डायरी म्हणजे तुझ्या मनात उद्भावणाऱ्या भावनेचा आरसा.. जो तू कधीच माझ्याशी शेअर करु शकलीस नाही.

आज एवढे वर्ष मी समजू शकलो नाही. परंतु एका डायरीतला परिच्छेद, एखाद्या काट्यासारखा रुतला मनाला.

नवऱ्याने व्यक्त केलेले मन आज पहिल्यांदाच तिचा थकवा दूर झाला होता. नवऱ्याचे मन तिनेही कधी ओळखले नव्हते.

लग्नाच्या पहिल्या रात्री मैत्रिणीने दिलेला कानमंत्र तिला आठवू लागला तो असा की, 'नवर्याला नेहमी खुश ठेवत जा' हा तो कानमंत्र ती आठवू लागला.

दोघांचा संभ्रम आता दूर झाला होता. खूप रात्र झाली होती.

“उद्या बोलू” एवढं बोलून नवरा बेडरुममधून पुन्हा बाल्कनीत जातो. आता पुन्हा डायरी वाचायला घेतो. बायको पुन्हा झोपून जाते. सकाळी उठल्यावर बायको पाहते तर रात्रभर केलेले पसारा एकच शब्द सर्व कागदावर लिहीलेला….तो म्हणजे….बँडस्टँड…..हात होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama