Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jyoti gosavi

Horror

4.3  

Jyoti gosavi

Horror

लावसट

लावसट

3 mins
517


लावसट


ती "लावसट " जिभल्या चाटत  हॉस्पिटलच्या कडेने घिरट्या घालत होती. तिला खूप दिवसांमध्ये ताजे, कोवळे, लुसलुशीत मांस तिला खायला मिळाले नव्हते .

____+++++++______


वनिता लेबररुममध्ये टेबलवरती कळा देत होती. तिला बरेच वर्षांनी मुल राहिले होते. ती आई बनणार होती. अथक परिश्रमानंतर आणि खूप त्रास झाल्यावर, तिने एका गोंडस, गुबगुबीत, गुलाबी त्वचेच्या, गोर्‍यापान बाळाला जन्म दिला. तसं बाळ आणि आई व्यवस्थित होते. त्यामुळे काही प्रश्न नव्हता. नर्स "लक्ष्मीने" त्या बाळाला छान स्वच्छ करून पांढऱ्या दुपट्ट्यात गुंडाळून आईकडे सोपवले. वनितानेदेखील मोठ्या समाधानाने बाळाला छातीशी दूध पाजायला लावले. लक्ष्मीपण आपली इतर कामे करण्यासाठी लेबर रुमच्या बाहेर आली. बाहेर पडतापडता तिने सहज मागे वळून पाहिले, तर लेबरमध्ये तिला काहीतरी हालचाल जाणवली. एक मोठी सावली तिला बाळावर आणि बाळाच्या आईवर दिसली. लक्ष्मी बाहेर आली खरी, पण तिच्या मनाला काहीतरी खटकत होते. आज काहीतरी घडणार आहे, बाळाला आणि आईला धोका आहे असे तिला राहून राहून वाटू लागले. त्यामुळे हातातले काम सोडून उगाच पुन्हा एकदा लेबरमध्ये आली. बघते तर वनिताच्या पुढे झोपलेलं बाळ काळं-निळं पडत चाललं होतं आणि मगाशी भासलेली सावली वनिताच्या बाळावरती वाकून वाकून बघत होती.


लक्ष्मी पेशाने नर्स होती. तो तिच्या पोटापाण्याचा व्यवसाय होता. परंतु ती अध्यात्मात अधिकारी व्यक्ती होती. हॉस्पिटलच्या डिलिव्हरी केल्यानंतर घरी जाऊन आंघोळ करेपर्यंत ती तोंडात पाण्याचा थेंबदेखील बराच वेळ घेत नसे. तिचंच जे काही यम-नियम होते ते ती व्यवस्थित पाळत होती. तिची जी काही साधना होती ती नित्यनेमाने करत होती. म्हणूनच तिला अशा गोष्टी बघण्याची दृष्टी मिळालेली होती. त्यामुळेच तर तिला तेथे फिरणार्‍या लावसटीची सावली अंधुकपणे दिसली होती, जाणवली होती. हा काही फक्त आरोग्याचा मामला नसून, काहीतरी वाईट शक्तीचा प्रादुर्भाव आहे हे तिला तत्काळ जाणवले.


"काय करते तिथे? तिने त्या लावसटीला दरडावून विचारले.

त्याबरोबर बाळावर वाकून बघणारी ती सावली मागे वळली, पहाते तर थंड नजरेने तिच्याकडे बघणारी एक स्त्री तिला दिसली.

त्या नजरेने लक्ष्मीच्या अंगावरदेखील काटा आला.

बाप रे! हे काही साधे प्रकरण दिसत नाही. त्या दोघींचा एकमेकींशी मनात संवाद चालू होता.

बाकी कोणाला काही दिसतदेखील नव्हते आणि ऐकूदेखील येत नव्हते. लोकांना असे दिसत होते. नर्स लक्ष्मी बाळाला उचलून घेऊन गरम पेटीमध्ये (इनक्यूबेटर) ठेवत आहे आणि ऑक्सिजनचा मास्क लावत आहे.


अगं! या बाईला किती वर्षांनी बाळ झालंय, तू का त्याच्या जीवावर उठलीस? त्याला या जगात येण्यास मी मदत केलेली आहे. मी तुला त्याला असं मारू देणार नाही.


पण मला खूप दिवसांत ताजे लुसलुशीत कोवळे मांस मिळालेले नाही. माझी ते खाण्याची इच्छा आहे. 


तुझ्या इच्छेसाठी मी, बाळाला मरु देणार नाही.


बघतेच आता! तू कशी बाळ देत नाहीस. 


मीही बघते !तू कशी बाळ नेऊ शकतेस. 


तुला काय करायचंय? तू तुझं काम केलंस ना? आता तू इथून निघून जा. 


मी अशी तुला येथून हा हाकलल्याशिवाय जाणार नाही. 


असे दोघांमध्ये भांडण चालू होते. बाळाची आई वनिता मात्र शांत झोपलेली. तिला काहीच माहीत नव्हते. वाईट शक्ती आणि चांगल्या शक्तींचा लढा चालू होता. लक्ष्मीदेखील आपल्या मनातल्या मनात काहीतरी जप करत होती. काहीतरी मंत्र पुटपुटत होती. तिकडे लावसट आपल्याला बाळ मिळणार नाही, ही नर्स आपल्याला भारी पडते आहे हे बघून थयथयाट करत होती. बाकी कोणालाही प्रत्यक्षदर्शी ह्यातले काही दिसत नव्हते. शेवटी काही काळाने लक्ष्मीने लावसटीवर मात केली आणि एसी चालू असतानादेखील घामाघूम होऊन ती एका खुर्चीमध्ये बसली. 


सध्याची वेळ निघून गेली होती. परंतु धोका टळला नव्हता किंवा पुन्हा एकदा काही हल्ला करण्याआधी नर्स लक्ष्मीला एक युक्ती सुचली. तिने स्वतःच्या मोबाईलवरती रामरक्षा लावली आणि तो मोबाईल बाळाच्या उशाला पेटीमध्ये ठेवून दिला. तसेच पेटीच्या कडेने इन्फ्रा लाईट लावली, जेणेकरून ती "लावसट" पुन्हा आली तर इन्फ्रा लाईटच्या प्रकाशामध्ये ती सर्वांनाच दिसली असती. दोन तास पेटीच्या कडेकडेने चकरा मारून लावसट शेवटी हार मानून निघून गेली. बाकी कोणालाही यातलं काहीही कळलं नव्हतं. त्या दिवशी वेळेपेक्षा दोन तास जास्त थांबून नर्स लक्ष्मीने आपली उरलेली कामे पूर्ण करून दिली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror