एक तरी झाड लाव
एक तरी झाड लाव
सुंदर आहे ही धरा
त्याची काळजी घे जरा
वृक्षवेलींनी सजलेली
पक्षी पाखरे गाणी गाती
निसर्ग आमचा मित्र सखा
पडतो उपयोगी अनेक वेळा
अमानुषपणे असे वागू नको
धरतीला देऊ नको कळा
मानवाच्या तीन मूलभूत गरजा
अन्न, वस्त्र आणि निवारा
सर्वच गोष्टी तोच पुरवितो
एकदा तरी त्याचा विचार करा
त्याची काळजी घे जरा
आपली इच्छा व गरज भागविण्या
जंगलातली झाडे केली साफ
स्वार्थी आपल्या या वागण्याला
निसर्ग करणार नाही माफ
पुढची पिढी जगवायची असेल तर
एक तरी झाड लाव धरा
निसर्ग जगला आणि वाढला
तरच राहील आपला नाव खरा
त्याची काळजी घे जरा
एक तरी झाड लाव धरा