STORYMIRROR

Priti Dabade

Fantasy Inspirational Others

3  

Priti Dabade

Fantasy Inspirational Others

साबुदाणा वडा

साबुदाणा वडा

1 min
305

साबुदाणा रात्रभर भिजवून

उकडलेले बटाटे त्यात कुसकरले

हिरवी मिरची, आलं, मीठ, कूट

घालून सर्व एकजीव केले


कढईत घेऊन तेल शेंगदाण्याचे

कढई गॅसवर ठेवली

वडे हाताने गोलाकार करत

ताटाची शोभा वाढवली


टाकता गरम तेलात वडे

टम फुगून वर येती

खमंग वास अन् रंग

मनात घर करती


सोबत खोबऱ्याच्या चटणी

वड्यांची चव वाढवते

उपवासाची ही पाककृती

जिभेचे चोचले पुरवते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy