पाऊसधारा
पाऊसधारा
झेलती थेंबांना
पानांच्या ओंजळी
तप्त धरा सोस
निवविल्या झळी
-१-
निथळे अंगांग
सांचे जळ तळी
सांवळा अथांग
खुले कळी कळी
-२-
मेघ छाया रंग
अंतरी उजळी
निनादे छप्पर
पागोळ्यांत गळी
-३-
झेलती थेंबांना
पानांच्या ओंजळी
तप्त धरा सोस
निवविल्या झळी
-१-
निथळे अंगांग
सांचे जळ तळी
सांवळा अथांग
खुले कळी कळी
-२-
मेघ छाया रंग
अंतरी उजळी
निनादे छप्पर
पागोळ्यांत गळी
-३-