लग्न
लग्न
लग्न म्हणजे काय असते ?
दोन नव्या जिवाचे मिलन
अजाणतेपणी राहणाऱ्या
दोन नव्या मनाचे संमेलन
प्रत्येकाला आतुरता असते
जीवनात एकदा लग्नाची
साथीदार शोधत असतात
गाठ पडलेली असते जन्माची
पाहणीचा कार्यक्रम होतो
पसंद नापसंद कळविले जाते
पसंदीच्या स्थळाला निरोप मिळे
लग्नाच्या तयारीला मग सुरू होते
लग्नाची सर्वाना लागते चिंता
खरेदी करण्याची खूपच घाई
लग्नानिमित्त सर्व पाहुण्यांची
येणाऱ्या जाणाऱ्यांची सरबर
ाई
लग्नाची वेळ येते जशी जवळ
होतो आनंद सर्व जनमनात
दोन नवी पाखरे एका घरट्यात
येत असल्याचा आनंद मनात
लग्नानंतरच सुरू होतो खरा
सुखी जीवनाचा प्रवास
एकमेकांना मिळतो येथे
सोबत राहण्याचा सहवास
सुखदुःखाचे प्रसंग येतात
त्याला तोंड कसे द्यावे ?
लग्नानंतरच्या संसारात
हे सारे शिकत जावे
अविवाहिताना काय माहीत
लग्न म्हणजे काय असते ?
लग्न केल्यावरच कळते की
संसार म्हणजे काय असते ?