गोडी गुलाबी
गोडी गुलाबी
उरले जीवन ते जगायचे
कोणाशी वाद नाही घालायचे
प्रत्येक क्षण आनंदाने घालवायचा
सर्वांशीच गोडी गुलाबीने राहायचे...
अधुरे स्वप्न पुरे करायचे
जागेपणीच ते अनुभवायचे
त्यासाठी खूप कष्ट करायचे
सर्वांशीच गोडी गुलाबीत राहायचे....
संकट समयी नाही डगमगायचे
आला दिन तोही जाईन म्हणायचे
कर्तव्यात कसूर करायची नाही
सर्वांशीच गोडी गुलाबीने राहायचे....
माणसाशी माणसासम वागायचे
दृष्ट विचार तर नको ग बाई
सदविचार मनी अाचारायचे
सर्वांशीच गोडी गुलाबीने वागायचे...
ताठ मानाने जगी जगायचे
चारित्र्यवान,सदशील बनायचे
पापभीरु पणे वागायचे नाहि
सर्वांशीच गोडी गुलाबीने वागायचे...