STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

गझल खुलासा

गझल खुलासा

1 min
583

नको आज देऊ दिलासा मला

कळाला तुझा गोड फासा मला


तुझे प्रेम नाही कळाले सखी 

नको फार मोठा खुलासा मला


मला ठाव आहे दिव्यास्वप्न तू 

नको दूर नेवूस भासा मला


पुरावे कशाला हवे साजणी 

खुले प्रेम माझे तपासा मला


किती कोंडला श्वास माझा इथे 

जलाविन केलास मासा मला


सुखांना किती मी इथे शोधतो 

विसावा नसे ना जरासा मला


कुणाला उगा दोष देऊ नको 

अरे मारले तूच श्वासा मला



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy