STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

खेळ आणि शिक्षण

खेळ आणि शिक्षण

1 min
332

खेळ आणि शिक्षण


जेव्हा मला मिळतो वेळ

तेव्हा तेव्हा खेळतो खेळ

कशाचेही नसते भान

अभ्यासाशी नसतो मेळ


बालपणापासून आवड

विटी दांडू खेळण्याची

मित्रांसोबत खेळताना

भरपूर मजा यायची 


थोडा मोठा झालो तेव्हा

आवड निर्माण झाली क्रिकेटची

सोबत असायची बॅट बॉल

तीन लाकडं घेऊन विकेटची


टीव्हीवर धोनीला पाहताना

वाटे आपण ही असचं खेळावं

मैदानावर जाऊन धोनीसारखं

भरपूर धावा चोपून काढावं


गल्लीत खेळणारे आम्ही

दिल्लीतील सामना बघायचो

टीम इंडिया जिंकला की

मोठे मोठे फटाके उडवायचो


खेळल्याने पोट भरत नाही

वाडवडील खूप सांगायचे

त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्षून

आम्ही मात्र हट्ट नाही सोडायचे


त्यांच्या बोलण्याचे महत्व

आज कळायला लागते 

काही काम भेटत नाही

वेळ निघून गेलेली असते


खेळाला ही महत्व द्यावे

सोबत अभ्यास ही असावा

त्याच्याच बळावर तर

लागते रोजगार मिळवावा



ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from नासा ( NaSa ) येवतीकर

Similar marathi poem from Inspirational