Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

yuvaraj jagtap

Tragedy

3  

yuvaraj jagtap

Tragedy

महापूर (अभंग)

महापूर (अभंग)

1 min
330


वाऱ्याचा तांडव। धुडगूस धारा ।

पावसाचा मारा । भुईवर ।।


पावसाची गती । धो धो कोसळला ।

जीव धास्तावला । पावसाने ।।


मेघांचा संताप । कोपला वेगाने ।

श्र्वासाचे जगणे ।अंताआधी ।।


पुराचा थैमान । दाटले काहूर ।

आक्रोश चित्कार । पुरामध्ये ।।


उघडे संसार । लुप्त घरदार ।

जगण्याचा घोर । उद्या साठी ।।


रक्षणाची बोट । मदतीचा हात ।

तिने केला घात । जगण्याचा ।।


झोपेतच मेले । पुरासंगे गेले ।

अनर्थ जाहले । पाणी पाणी ।।


देव अंध झाला । कसा घात केला ।

जीवावर घाला । निसर्गाचा ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy