लाडला
लाडला
लेक माझा
परदेशी
सोडून ही
मायदेशी.
आशा होती
तो येईल
समाधानी
मी होईन.
पण नाही
केले लग्न
संसारात
झाला मग्न.
मी एकटी
वाट पाहे
चिंती मन
दुःखी राहे.
आता झाले
माझे वय
आजारात
वाटे भय.
भरलेले
माझे डोळे
पुन्हा पुन्हा
मीच चोळे.
बाळा ये ना
पाहायला
एकदाच
या मायला.
दूधावर
वाढवला
बाळ माझा
विसरला.
मागते मी
देवा पाव
मदतीस
त्याच्या धाव.
मी तयार
मरणास
सुखी ठेव
लेकरास.
