नाव
नाव
तुझं गावही पाहिलं
ओठांवर तुझं नाव राहिलं...
खूप काही मिळालं
तुला प्रेम ना कळालं
मनाने तुझं दुःख सोसलं....
मी पाण्यासारखा संत
तुला माझ्या प्रेमाची खंत
तुझंच गीत नेहमी गाईल....
तुझं ते नकली हसणं
माझं ते असली रडणं
आठवणींचं पिक मी घेरलं...
