STORYMIRROR

sangita tathod

Tragedy Others

3  

sangita tathod

Tragedy Others

देवा तुझे गुपित

देवा तुझे गुपित

1 min
255

असा कसा देवा तुझा नियतीचा खेळ कसा लागे ना त्याचा कुठेच ताळमेळ

आयुष्याची ज्याला आली उभारी तोच गाठतो वयाची शंभरी

जगण्याची असे जयाला आस त्याची कटते चाळिशीतच पास

घरदार पाहते ज्याच्या मरणाची वाट तोच अडवतो पाच दहा वर्षे खाट

चिल्ल्या पिल्ल्यांचे जिच्या वाटेकडे डोळे तू तिच्या आयुष्याचे करतो वाटोळे

ज्याला असे जगण्यात गोडी त्याला आयुष्याची शिदोरी थोडी

घासापरत लागे औषधीची गोळी परी त्याची येते नव्वदी जवळी

आरोग्याचा ज्याच्या वाटे सर्वाना हेवा त्याच्यासाठी आहे यमाचा सांगावा

एकलकोंडी पिंजतात अंधार कोठडीत वर्षे वर्षें त्यांच्याकडे पाहत नाहीस

ज्याच्या आसपास माणसांचा घोळका त्याचा संसार करतो मोडका तोडका

हेच तर आहे देवा तुझ गुपित तुझ्या मनातल ठेवतो कुपीत

माणसाची जात हे सर्व सहन करते नशिबाचा खेळ समजुन खेळत सुटते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy