STORYMIRROR

sangita tathod

Others

3  

sangita tathod

Others

कसं जमते

कसं जमते

1 min
211

कसं जमते लोकांना असं डुप्लिकेट वागणं?

गरज असते तेव्हा हाजीहाजी करणं गरज सरते तेव्हा हेटाळणी करणं कसं जमते


मोठ्या लोकांशी दुरचं नातंही जपणं अन गरिबांशी जवळचं नातं तोडणं कसं जमते


सेल्फीसाठी नेहमी स्मितहास्य ठेवणं अंतःकरणात सदैव कटुता भरणं कसं जमते


उगवत्या सुर्याचा उदोउदो करणं डुबत्या सुर्याला पायदळी तुडवणं कस जमते


स्वतःची बुद्धी गहाण ठेऊन स्वार्थासाठी फक्त झुंडीमागं धावणं कसं जमते


आपला खोपा सुरक्षित ठेवणं अनेकांची घरे आगीत जाळणं कसं जमते

लोकांना असं डुप्लिकेट वागणं...


Rate this content
Log in