STORYMIRROR

kusum chaudhary

Inspirational

3  

kusum chaudhary

Inspirational

गेट टुगेदर

गेट टुगेदर

1 min
2.6K

गेली पाखरे उडून

मैत्री गेलो विसरून

 ऋणानुबंधांच्या गाठी

आल्या आज जुळून


मैत्री होतीच आमची

आम्ही जपली मनात

प्रेम ह्रदयात जरी

होतो कर्तव्यात व्यस्त


हर्ष मनात मावेना

मिळे स्मृतींना उजाळा

असा आगळा वेगळा

आहे मैत्रीचा सोहळा


पूर्व जन्मीची पुण्याई

पुन्हा मैत्री बहरेल

गेट टुगेदर मुळे

नाळ मैत्रीची जुळेल


कृष्ण सुदाम्याची मैत्री

जशी अमर जगात

तशी आमचीही मैत्री

आम्ही जपू ह्रदयात


सुख दु:खात सोबत

राहू आता सदोदित.

मैत्रीनेच जीवनात

मिळे आनंद नियमीत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational