बाप..!
बाप..!
लेक दारात पाहिली
काही दिसांची पाहुनी..
बाप मांडव घालितो
डोळा आटवून पाणी..
दिस राबतो रानात
माझा बाप बैला वाणी..
देवा पाव ना जरासा
टाक भरून तू खाणी..
पाणी पाणी कर रान
त्याला भिजू दे की छान..
बघ कसा हसतो गालात
गात तुझं गुण गान..
मोल येऊ दे पिकाला
नको नुसतीच नाणी..
जीव टांगेल झाडाला
बाप माझा खुट्यावाणी..!
