STORYMIRROR

Priti Dabade

Tragedy Children

3  

Priti Dabade

Tragedy Children

सिगारेट

सिगारेट

1 min
298

सिगारेट

एक चटक

लागता शरीरास सवय

होई जीवनाचा अविभाज्य घटक


सिगारेट

शरीरात चलबिचल

बेचैन होई मन

परिस्थिती सुन्न अन् हतबल


सिगारेट

कर्करोगाने त्रस्त

कसं जीवन जगावे

उत्तर शोधण्यात व्यक्ती व्यस्त


सिगारेट

जडतात व्याधी

वेळीच सावरणे हाच

उपाय बाळगावा अंगी आधी


सिगारेट

धुराचा त्रास

होई पूर्ण कुटुंबास

नको वाटे मग सहवास


सिगारेट

शरीराची नासाडी

नाही सोडली तर

होई कुटुंबाची आर्थिक पिछाडी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy