मेहंदी
मेहंदी
।। मेहंदी ।।
तिला पाहून गेल्यापासून
ती फारच होती आनंदात
पाहुण्यांनी देखील पसंदीचे
खास पाठविले होते संदेशात
घरात लगीनघाई झाली सुरू
नववधू स्वप्नात गेली घडून
मुहूर्त आला लग्नाचा अन
लग्न वेळेवर आले जुळून
आपल्या सासरी आली नववधू
सर्वांना भेटून झाली आनंदी
नशिबात नव्हते हे आनंद
यजमानाच्या अपघाताने
झाले दुःखी नाराज समदी
लग्नाच्या गप्पा गोष्टी चालूच होते
हळद अजून निघाले नव्हते
स्वप्नांच्या दुनियेतच वावरताना
मेहंदी अजून निघालेच नव्हते
राडून रडून तिचे डोळे सुजले
विचार करून मन जड झाले
दोन्ही हाताच्या मेहंदीला बघून
तिचे डोळे नेहमी राहतसे ओले