Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rama Khatavkar

Inspirational Others

4  

Rama Khatavkar

Inspirational Others

नवरात्रीचे प्रश्न

नवरात्रीचे प्रश्न

1 min
370


महिषासुराचा तू अंत केला,

केलास त्याला युग लोटले की !

त्याचीच पिल्ले फोफावताना 

का येत आम्हास सामर्थ्य नाही ?


नवनिर्मितीची नवशक्ति अंगी

देऊन लेकींस तू धाडियेले.

गर्भात जेव्हा मिटती कळ्या त्या 

का शांत राहून अन्याय साही ?


तू अन्नपूर्णा बनुनी जगाला 

देतेस तृप्ती असतेस आई

लाथाडती जे परी अन्न तेव्हा 

माजोरड्यांना अभिशाप देई


रंभे परी रूप घेऊन येसी 

घरा अंगणांना शोभाच देसी 

दु:शासनांची मति भंगता का 

डोळे तयांचे फोडीत नाही ?


तू शारदा तूच सरस्वतीही 

तुझीच रुपये किती भोवती ही 

संधी तयांना नवशिक्षणाची 

नाकारता का न संताप होई ? 


घरात बाहेर 'ही' कष्ट घेते 

शक्ती शिवाचीच बनू पाहते 

परंतु भोळा आशुतोष का गं

जागृत का होतं 'त्या'च्यात नाही ?


प्रश्नावली सर्व ऐकून घेता 

बोले हसुनी जगताची आई 

की, "सांगते नीट ऐकुन घे ग 

दोषीच तू ही जी अन्याय साही. 


अंशांश माझे तुम्हीच बाळे,

धी धैर्य शक्ती स्थिरबुद्धी युक्ती 

यां जागविण्यास येतेच मी ही,

का वेळ येताच निद्रिस्त राही ? 


ईर्षा, भय, क्रोध अन् मत्सराला, 

अज्ञान, अस्वच्छ तनामनाला 

उल्लंघुनी जाय सीमेस आता 

मग साजरा रोज दसराच होई!"


Rate this content
Log in