अभंग
अभंग
माय वनीं धाल्या धाये । गर्भ आंवतणें न पाहें॥१॥ तैसें पूजितां वैष्णव । सुखें संतोषतो देव ॥ध्रु.॥पुत्राच्या विजयें । पिता सुखातें जाये ॥२॥ तुका ह्मणे अमृतासिद्ध । हरे क्षुधा आणि व्याधि ॥३॥
*-तुकोबा*
(गाथा अभंग क्रमांक ३९३४)
संत तुकाराम महाराज यांचा हा एक उत्कृष्ट अभंग आहे... वाचकांसाठी... प्रसिद्ध करत आहे.