खरे - खोटे
खरे - खोटे
नेहमी खरे बोलावे कधी ही बोलू नये खोटे
नसता जीवनात सहन करावे लागेल तोटे
नकारघंटा सोडून नेहमी सकारात्मक रहा
तुझें विचार करतील तुला जीवनात मोठे
जीवनात सुखासोबत दुःख येणारच आहे
डगमगायचे नाही येवो किती ही संकटे
आपली प्रगती दुसऱ्यांना नेहमीच छळते
शत्रू नेहमीच पसरवून ठेवतात टोकदार काटे
जराशा यशाला पाहून हुरळून जाऊ नको
पंख पसरवून ठेव फुटू देऊ नको फाटे
विश्वासाला तडे जाईल असे वागू नको
त्यासाठी जीवनात कधी ही बोलू नको खोटे
विचार कर पक्का ठरवलेले ध्येय मिळविण्याचे
यश नक्की मिळेल स्वप्न जर नसेल तुझे छोटे