STORYMIRROR

Dhanraj Gamare

Inspirational Others

4  

Dhanraj Gamare

Inspirational Others

समाजात एकता हवीच

समाजात एकता हवीच

1 min
493

धर्म आणि जातींच्या झगड्यांमुळे

आजवर कित्येक जणांचे प्राण गेले, 

वाईट परंपरा आणि अंधश्रद्धेमुळे 

हजारो - लाखों जण तडफडून मेले.


अजून किती निर्दोष लोकांचे 

प्राण जातील माहित नाही मला, 

पण समाजात एकता हवीच

हा विचार डोक्यात घेऊन चला. 


आज एकत्र सर्वांनी येऊन 

धर्म आणि जातींची बंधने तोडुया, 

माणुसकीने सर्वांशी चांगले वागून

आपुलकीने सर्व माणसे जोडुया. 


महापुरुषांचे विचार खरे होताना 

रोज दिसतील सर्व माणसांना, 

एकतेत किती ताकद असते

याचा प्रत्यय येईल प्रत्यक्ष पाहताना. 


भारतात माझ्या मग कधीच 

कोणीही राहणार नाही दुःखात,

सर्वजण एकमेकांसाठी करतील प्रयत्न

एकमेकांना ठेवतील सगळे सुखात.


© धनराज संदेश गमरे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational