Chaitali Warghat

Abstract Inspirational Others

2.4  

Chaitali Warghat

Abstract Inspirational Others

विश्वासघाताचे फळ

विश्वासघाताचे फळ

3 mins
14


जरी, खोटा मुखवटा लेवूनी 

विश्वासघात जरी रोजच केला 

फिरूनी येतात कर्म आपले 

माणसा तू कसा विसरून गेला 


आपल्या वर्तनाला समाजाने मान्यता द्यावी अशी प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. आपले वर्तन इतरांनी मान्य करावे. इतकेच नव्हे तर त्याचे कौतुक प्रशंसा करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. समाज मान्यता ही व्यक्तीची गरज आहे. आणि म्हणून व्यक्ती तितक्याच प्रवृत्ती व्यक्तीच्या समाजात दिसून येतात. व्यक्तीच्या वर्तनात समाज मान्यतेला धरून खोटा मुखवटा व्यक्ती सतत मिरवत असतो. एक परिपूर्ण व्यक्ती अशी आपली ओळख व्हावी हीच अपेक्षा असते. व्यक्ती हा खरा मुखवटा सोडून खोटा मुखवटा घेऊन मिरवत असताना होणारे फायदे तोटे याचाही विचार करत नाही. कितीतरी खोटी स्वप्ने तो आपल्या बोलण्यातून इतरांना दाखवत असतो. समोरचा व्यक्ती नकळतं त्या बोलण्यात येऊन जातो, तो त्यातील खोटेपणा तपासून न बघता भावनेच्या आहारी जातो. नको ती पातळी ओलांडली जाते. एक भावनिक व्यवहार तेथे झालेला असतो. मात्र व्यक्तीला गोड बोलणारा, स्तुती करणारा स्वभाव हा काही जास्तच आवडतं असतो, त्यामुळे सहजच व्यक्ती विश्वास ठेऊन या असल्या स्तुतीस विश्वासघातास बळी पडतो. एकदाका मन दुखावले गेले की पुन्हा त्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे धोक्याचे असते. मात्र अशा वाईट व्यक्तीमुळे मोठ्या प्रमाणात मन दुखावल्या जाते मग नकळत त्या व्यक्तीबद्दल उर्मटपणा, खोटेपणा, नावड अशी मनोवृत्ती मनात वाढीस लागते. 


खोट्यांचा भरतो बाजार 

विश्वासघाताची फळे हजार 

ठाऊक जरी समाजाची रीत 

दावती अविश्वासाची फीत 


सहकार्य म्हणजे एकमेकांना सहाय्य करून बरोबर काम करणे व स्पर्धा म्हणजे काम करीत असताना आपल्या श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे मात्र याचे व्यक्ति व्यक्तीत गटागटात मध्ये स्पर्धा दिसून येते. चुरस हा स्पर्धेचा नकारात्मक प्रकार आहे. मात्र या ठिकाणीही निसर्गदत्य गुणांचा पूर्ण उपयोग न करता बऱ्याच गोष्टी बऱ्याच कृती या खोट्या पद्धतीने मांडल्या, बोलल्या जातात. मनामध्ये असलेली ठरवलेली त्या व्यक्तीबद्दलची छबी कुठेतरी कमी होताना दिसून येते. एक खोटेपणांच मिरवलेल, प्रस्थापित केलेलं वर्तन मनाला अस्ताव्यस्त करून देते. कितीतरी रंगवलेली बघितलेली स्वप्ने ती काही क्षणातच मनाला नकारात्मकता वाढवतात. अपेक्षा कमी होतात, संबंध दुरावल्या जातात. फसवा फसवी अप्रमाणिकपणा यामुळे माणसाला माणसापासून दूर लोटण्याच कामच करतात. हे मात्र रोजच्या जीवनात मोठ्या प्रमाणात घडत असते. वाईट लोकांच्या सहवासात राहिल्यास म्हणजेच खोट्या बोलणाऱ्या लोकांच्या संगतीत असल्यामुळे दर्वर्तनीपणा आपल्या वागण्यात दिसून येऊ शकतो. प्रामाणिक व्यक्तीच्या सहवासात राहिल्यास चांगले पैलू ही पडत जातात. म्हणजेच नकळतं दिसून येतात.


चालतो रोज शब्दांचा खेळ 

जिव्हाळा धोक्यांचाही मेळ 

जसे कर्म तसेच फळ

जीवन जगण्यास देई बळ 


विश्वासघाताचे फळ चांगले असूच शकत नाही. विश्वासघाताचे परिणाम नेहमी वाईटच असतात. मुळात एखाद्याचा विश्वासघात करणे हीच वाईट प्रवृत्ती आहे. म्हणून कोणावरही विश्वास ठेवताना माणसाने दहा वेळा विचार करावा. तो माणूस विश्वास पात्र आहे की नाही. खातरजमा केल्याशिवाय आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नये. विश्वास ही जगातील सर्वात दुर्मिळ गोष्ट आहे एकदा का विश्वास गमावला की तो कमावणे महा कठीण. नाती विश्वासावरच अवलंबून असतात आणि टिकतात ही. जेथे विश्वासघात होतो त्या ठिकाणी नात्याची वीण उसवते आणि त्यामुळे नात्याची विस्कटलेली घडी परत बसवायला वेळ लागतो. खूप प्रयत्न करूनही ते नाते साधले जाईल याची शाश्वती नसते. त्यामुळे कोणाच्या विश्वासघात करू नये आणि आपला विश्वासघात होऊ देऊ नये.


नकोत नाती खोट्या 

विश्वासाची असावी 

खातरजमा केलेली 

घट्ट प्रेमाची दिसावी 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract