Chaitali Warghat

Others

3  

Chaitali Warghat

Others

बाबा

बाबा

3 mins
8


आपल्या आयुष्याला लाभलेल, आपलं अस्तित्व उभं करणार असं, बाबा नावाचं पान, स्वतःच्या जीवापेक्षा जास्त आपली काळजी घेणार, आणि आपल्या जीवनाला नवा आकार देणार, असं एक अस्तित्व, ते असता जीवनात आनंद सतत असतो. कशाची काळजी करायची गरज पडत नाही. त्यांच्या नसल्याने कितीही मोठी संपत्ती, पैसा काहीही महत्वाच वाटतं नाही. त्यांचं असणं जीवनाला नवा आकार देऊन जातो. 'बाबा' हा दोन अक्षरी शब्द असला तरी या दोन शब्दात संपूर्ण विश्व सामावलेल आहे. त्यांच्या असल्यामुळेच आपल्या असण्याला महत्त्व प्राप्त होते. आपल्याला घडवतांना त्यांना होणारा त्रास, त्यांनी घेतलेले परिश्रम ते कधीही आपल्याला बोलून दाखवत नाही. आपल्या भविष्यासाठी स्वतः पैसा जमवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात काटकसर करतात. हवा त्या ठिकाणीच हा पैसा खर्च केला जातो. आपले शिक्षण, आपले लग्न आपल्या दररोजच्या गरजा इत्यादीचे नियोजन त्यांच्या रोजनिशीत निश्चित, जणू लिहून ठेवलेले असते. कधीही आपल्या मुलांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये म्हणून स्वतःचा खर्च कमी करून उरलेला सर्व पैसा ते बँकेत आपल्या भविष्यासाठी राखून ठेवतात. मुलगी लहान असताना तिच्या नावाने बँकेत पैसे भरणे सुरू करून देतात. आधीच मुलीच्या नावावर पैसा जमा करून ठेवून देतात, जेणेकरून त्या पैशात मुलींचे लग्न, शिक्षण याला पैसा कमी पडू नये. मुलांसाठी मुलांच्या शिक्षणासाठी काटकसर करणे सुरू असते. मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी जर पैसे कमी पडले तर ते स्वतःचे राहते घर, स्वतःच शेत सुद्धा विकायला काढतात. वेळ पडली तर ते घर विकायला ही मागेपुढे बघत नाही. मात्र मुलांच्या शिक्षणाला, लग्नाला पैसा कमी पडू देत नाही. मुलांना लहानाच मोठं करत असतांना, त्यांना इवल्या इवल्या पावलांनी चालणं शिकवितांना. आपल्याला घास भरवतांना. आपली तब्बेत जर बरोबर नसली तर ते रात्र रात्र जागी रहातात. त्यांना झोप येत नाही. आपल्याला घेऊन बरीच स्वप्नं ते बघत असतात. मुलीच्या लग्नाच्या वेळी योग्य स्थळ शोधून, तो मुलगा आपल्या मुलींसाठी योग्य आहे काय..? मुलीला सुखात ठेवेल काय..? या सर्व गोष्टी बघूनच मुलीचं लग्न करून देतात. मुलीच्या लग्नानंतर ही मुलीला हक्काचा आधार देण्याचं काम बाबा पूर्ण करत असतात. मुलीच्या जवळ बसून मुलीशी सासरच्या लोकांविषयी विचारना करत असतात. मुलीला सतत चांगले संस्कार देऊन, सासू सासरे घरातील इतर लोक ते तुझी आहेत, ते तुझे खरे घर सांगून त्यांच्यावर प्रेम करणे शिकवित असतात. बाबाकडून मुलीला चांगल्या संस्काराची शिदोरीच मुलीला मिळालेली असते. मुलांसाठी बाबा स्वतःच्या पायावर उभं रहाण्यासाठी सतत त्याच्या पाठीशी उभे असतात. मुलाच्या हातातून काही चुका झाल्यात त्यावर दुर्लक्षित करून त्याला योग्य सल्ला देऊन त्याला पुन्हा नव्याने आत्मनिर्भर करण्यास आत्मविश्वास मुलात भरतात. कोणतीही अपेक्षा आपले बाबा आपल्याकडून मात्र करत नाही. फक्त आपण चांगले व्यक्ती म्हणून आत्मनिर्भर स्वतःच्या पायावर उभं राहावं हेच त्यांच स्वप्न असते. प्रत्येक वेळी ते आपल्याला योग्य तो सल्ला देत असतात. काय करावे काय करू नये याविषयी आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतात. जरी ते कमी शिकलेले असते तरीही ते आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी नेहमी प्रोत्साहित करतात. बाबाच्या स्वभाव हा जरी बाहेरून खूप गरम, रागीट दिसत असला तरी सुद्धा मुळात बाबा हे खूप प्रेमळ असतात. ते आपल्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून नेहमी ते चांगल्या गोष्टी आपल्याला सांगत असतात. आपल्यात बिंबवत असतात. काही चुकीचे आपल्याकडून घडले तर त्याला बोलून समजावून योग्य सल्ला देऊन मुलांना वळणीवर आणतात. वडिलांमुळेच जीवनाला खरा आकार प्राप्त होतो. बाबा घराचा आधार असतो. बाबा मुळेच एक आदर्श घर उभ असते. बाबांची चप्पल जरी घराबाहेर असली तरीही ते घर शोभून दिसते. बाबाचा भक्कम असा आधार सर्वांना लाभलेला असतो. बाबा आपल्याला लहानपणापासून आपले बालपण, शिक्षण, लग्न व आपल्या मुलांच्या चांगल्या जीवनाची सोय ते लावून ठेवण्यासाठी सतत परिश्रम ते घेतात. आपल्या उज्वल भविष्यासाठी बाबा संपूर्ण आयुष्य स्वतःच्या जीवाचा, गरजांच्या, इच्छांच्या विचार न करता आपल्यासाठी खूप कष्ट घेतात. आपल्यासाठी पैसा जमवून ठेवतात असे या पृथ्वीतलावर आपला चांगला विचार करणारी अशी फक्त एकच व्यक्ती ते म्हणजे आपले बाबा..!


 बाबाला असते उभ्या भविष्याची जान 

 बाबाचा करावा आदर, करावा सन्मान 

 बाबा आहे म्हणूनच आपलं अस्तित्व 

 बाबा मुळेच आपल जगणं आहे ' मस्त '


Rate this content
Log in