Chaitali Warghat

Abstract Inspirational Others

3  

Chaitali Warghat

Abstract Inspirational Others

भाग्याच्या रेषा

भाग्याच्या रेषा

3 mins
6


भाग्याच्या रेषा म्हणे 

तळहातावर असतात 

ज्यांना हात नसतात 

त्यांचे काय भाग्य नसतात 


बऱ्याच गोष्टी आपण आपल्या भाग्यावर सोडून देत असतो. माझ्या भाग्यात नशिबात जे असेल, ते होईल. सर्व काही नशिबावर अवलंबून आहे. मी माझ्याकडून रोजच पूजा, पाठ, अगरबत्ती, धूप सकाळ संध्याकाळ देवापुढे लावत असतो. आता, जे काही चांगले करायचे किंवा व्हायचे असेल ते सर्व देवावर अवलंबून आहे. जे चांगलं असेल ते मला मिळेल असे म्हणून आपण सर्व काही देवावर सोपवून देतो. मनासारखे जर काही परिणाम दिसून आले नाही तर बरेच मंडळी मागणी पूर्ण होत नाही. हवं ते मिळत नाहीं, म्हणून दुसऱ्या देवापुढे आपला भक्ती भाव निर्माण करून आता सर्व काही नवीन देवतेचा स्वीकार करून सर्व सुख समृद्धी मिळू दे, मला खूप श्रीमंत बनव, इत्यादी म्हणून नवीन देवाचा स्वीकार करतो. आता अगोदरच्या देवापुढे मांडलेल्या मागण्या पूर्ण करण्यात अगोदरच्या देव असमर्थ्य ठरला म्हणून दुसऱ्या देवाच्या पुढे हात जोडणे बरोबर नाहीं. पण खरं सांगा देव देवता आपल्या कसल्याही कष्टाशिवाय आपल्याला सर्व काही देऊ शकतो का ? आपण जर काही करण्याचा, मिळवण्याचा प्रयत्नच केला नाहीं तर आपल्याला जे पाहिजे ते कसे मिळेल. देवाचेच तर रक्षण करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे देवळात लावावी लागतात. देव तर स्वतःच रक्षण पण करू शकत नाही. तर आपले कसे करेल. हे शिकलेला वर्ग समजून घेत नाही. कितीतरी डिग्री घेतलेले उच्च पदावर असणारे मंडळी वैज्ञानिकदृष्या त्यांच्या बुद्धीचा विकास झालेला मात्र दिसत नाही. शिक्षणाचा, पदाचा उपयोग समाजात वैज्ञानिकदृष्टी जागवण्यासाठी, शिक्षणाची धारा, अशिक्षित लोकांपर्यंत नेतांना दिसत नाहीं. बरेच शिकलेले आजचे तरुण वर्ग अंधश्रद्धेला खतपाणी घालतात व आपल्या मुलांना त्याच पद्धतीत त्याच रीतीत गुंतवून ठेवतात. जेव्हा ती माणुसकी हा एकच माणसाचा धर्म आहे. मात्र माणसाला माणुसकी हा धर्म सोडून, नको त्या रितीला खतपाणी घालताना दिसतात. देवावर ही श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नव्हे. आपल्या देशाला, राज्याला लाभलेली एक संस्कृती आहे. ती जपणे हे अगोदर आपले कर्तव्य आहे. पशुपक्षी, झाडे, आपले पर्यावरण, हें सर्व मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात आपण वृक्षतोड करतो. प्राण्यांची शिकार करतो. त्याचे वाईट परिणाम शेवटी माणसालाच भोगावे लागतात. परमेश्वराकडे हात जोडून काही मागण्यापेक्षा आपले दोन हात चांगल्या समाजकार्यांकरिता लावावी. समाजात एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न करावेत. धर्म हा घराच्या उंबरठ्याच्या आत व्यवस्थित वाटतो पण उंबरठ्याच्या बाहेर मात्र माणसाचा एकमेकां प्रति माणुसकी हा एकच धर्म असावा. ही बीजे पुढच्या पिढीसाठी रुजवण्याचा पुढाकार आज प्रत्येकाने घेणे महत्त्वाचे आहे. आजचे विज्ञान युग आहे. शिक्षण खूप महत्वाचे आहे. शिक्षणामुळेच समाजाचा, देशाचा विकास होतो. आजच्या तरुण मुला-मुलींना धर्म, जात यापेक्षा बेरोजगारी कमी करण्यासाठी तरुणांच्या हातात काम पाहिजे. नोकरी, शिक्षण, शाळा, दवाखाने, कमी दरात मूलभूत गरजा मिळाव्यात व पूर्ण व्हाव्यात. अगणित प्रश्न आजच्या तरुण वर्गात आहेत. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळाली पाहिजे. प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात सरकारी नोकर भरती करून शिकलेल्या तरुणांच्या हाताला काम दिले पाहिजे. बेरोजगारी दिवसान दिवस वाढत जाणारी ती कमी होण्यासाठी उपाय योजले पाहिजे. आपल्या प्रथम समस्या सोडवण्यासाठी समाज हिताचा विचार करणारी विचारधारा असलेली, समाजात एकोपा कायमचा टिकवून ठेवणारी, सर्वप्रथम सर्व जाती-धर्मांच्या विचाराचा आदर करणारी, समानतेने वागवणारी, अशी बळकट समाज व्यवस्था असली पाहिजे जी कसलाही भेदभाव करणार नाही सर्वांच्याच हिताचा विचार करेल.


माणसा माणसाच्या प्रती 

नसाव कसला भेदभाव 

विविधतेने नटलेल्या भारताचे 

प्रथम स्थानी येथे नाव 

जपावी आपली संस्कृती 

उत्सव करावा सभ्यतेचा 

समाज हित विचारधारे संग 

आदर्श समाज निर्माण करावा 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract