STORYMIRROR

Chaitali Warghat

Abstract Others

3  

Chaitali Warghat

Abstract Others

ती काय करते

ती काय करते

4 mins
25

ती काय करते..?

विचारांचा गोंधळ सतत सुरु असतो तिच्या मनात,प्रत्येक कामाची लिस्ट असते तिच्या हातात, एक काम झालं कीं दुसरं असते तिच्याजवळ, सतत स्वतःला कामात झोकून देणारी ती, दुपारी थोडा वेळ जर मिळाला तिला तोही मग संध्याकाळी काय करायच आहे जेवणात, रात्री झोपतांना ही तेच मुलानं साठी बदाम पाण्यात भिजत ठेवणे. रात्रीलाच जेवणाचे उष्टे भाडे न चुकता घासून ठेवणे. सकाळी स्वयंपाकाच नियोजन रात्रीलाचं झालेलं असते. विचारा विचारात केव्हा झोप येते तिला तीच माहित. अशी म्हणजे ती. सकाळी झोप खुलली कीं सर्वात अगोदर किती वाजले? हा पहिला प्रश्न स्वतःनेच स्वतःला केलेला. उशीर तर झाला नाही ना, सकाळी उठल्या उठल्या सर्व आवरून संपूर्ण घर झाडून स्वच्छ पुसून सर्व वस्तू टॉप टीप ठेवलेल्या, हें सर्व करून नंतर मात्र तिच्या पोटात पाण्याचा घोट जाते. पाणी पितांनाही तिच्या मनात स्वतःशी बोलण सुरूच असते. उशीर तर झाला नाही न, भर भर स्वयंपाक उरकून घ्यावा लागेल. उशीर होता कामा नये. पुन्हा मग तीच तेच सुरुचं असते. चहा करायला भांड गॅसवर ठेवते. ऐकीकडे चहा बनणं सुरु असते तर दुसऱ्या शेगडीवर वरणं भाताचा कुकर ठेवलेला असतो.एका कोपरामध्ये कणिक घेतलेली असते,मळण्यासाठी.सोबत सोलण्या करिता लसूण ही, एका शेगडीवर चहा, दुसऱ्याशेगडीवर तपवण्यासाठी ठेवलेलं दूध, तिसऱ्या शेगळीवर कुकर, इतके काम तिचे सुरु असते. चहा गाळणीने चहा गाळत असताना थोडंसं स्मित हास्य मात्र तिच्या गाली असते. सर्वांना चहा दिल्यानंतर एका चेअरवर बसून किंवा खाली बसून वाफाळलेला गरमा गरम चहा शांततेत एक एक घोट चहाचे घेत असते. पण तेव्हा ती शांत असेल असं नाही त्यातही ती मनातल्या मनात चहाच्या आस्वाद घेत साखर, इलायची, अद्रक मस्त चव आठवत चव घेत चहा घेते. तिच्या अंगात चहाची स्फूर्ती नवी ऊर्जा तिला मिळते.शेवटचा घोट जेव्हा घेते तेव्हा पुन्हा तिच्या डोक्यात समोर बाकी राहिलेल्या कामाचे चित्र उमटलेले असते. ती मग भरभर ते सर्व चहाचे कप बेसिंगच्या एका बाजूला ठेवून किंवा लवकरात लवकर धुवून ती व्यवस्थित ठेवून देते. एकही कप फुटता कामा नये. मग ती पोळ्या लाटायला सुरुवात करते. पोळी लाटत असतांना सुरुवात करण्यापासून तर शेवटची पोळी होईपर्यंत कितीतरी कल्पना तिच्या मनातून निघून असंख्य गोंधळ घालतात,मध्येच ती मुलांना जेवण करायला ताट देते किंवा नवऱ्याला जेवायला आग्रह करते. मी गरमागरम पोळी बनवते तुम्ही एकीकडे जेवण करा बऱ्याचदा होतेही असं सर्वांना जेवणाला देऊन मुलांना शाळेला पाठवून नंतर संपूर्ण घर आवरून नंतर कोठे ती शांततेत जेवण करते. बऱ्याच स्त्रियांना नाश्ता करायची सवय नसते. तर बऱ्याच स्त्रिया सतत काही ना काही खात असतात, तशी प्रत्येकांची सवय जरा वेगळीच असते पण शेवटी ती स्त्रीच आहे.दुपारचा थोडा वेळ तिला मिळाला तर त्यातही तिला आराम करावा दुपारी थोडं झोपावं तर ती ते न करता नको ते उद्योग करत असते. साफसफाई,भांडे,कपडे धुतल्यानंतर ते व्यवस्थित प्रेस करून घड्या करून ठेवते. जेवण झाल्या झाल्या भांडे घासून ठेवते. स्वयंपाक झाल्यानंतर गॅसचा ओटा रोज दोन्ही टाइम्स पुसून नीटनेटका सुंदर दिसाव अगदी चमकदार पाहिजे इतपत ती काळजी घेत असते.तरी घरातील मंडळी म्हणतात की ती काय करते..?


उन्हाळा आला रे आला की तिची तयारी सुरू होऊन जाते. गव्हाच्या कुरड्या,पापड, शेवया, मुंगाच्या,मटकीच्या वड्या करण्याची. तिच नियोजन ही ठरलेलं असते.कोणत्या दिवशी काय करायचं.नोकरदार स्त्रिया असेल तर त्या दोन पैसे शिल्लक देऊन सर्व बनवून घेतात, कारण त्यांच्या कडे म्हणावं तेवढा वेळ नसते.मात्र गृहिणींना असं जमत नाही. गृहिणी म्हटल्यानंतर हे सर्व काम तिच्या वाट्याला आलेली. स्वतः जर घरी केले तर थोडे पैसे वाचतात असं त्या स्त्रियांना वाटत असते. घरी असणाऱ्या गृहिणी म्हटल्यानंतर थोडी काटकसर त्या करतातच. सर्व मात्र स्वतः प्रेमाने न कसलीही तक्रार करत सर्व काही करतात. या सर्व कामाची दखल मात्र कोणीही घेत नाही शेवटी तिच्या वाटेला एकच वाक्य येते की ती काय करते..?

बऱ्याच स्त्रियांना लहान मुलं असतात. अगोदर सारखे आता एकत्र कुटुंब बघायला मिळत नाही त्यामुळे मुलांना सांभाळण्याची जबाबदारी संपूर्ण तिच्यावर असते आता मात्र मुलांना सांभाळतांना ती स्वतःच्या इच्छा लग्नाच्या अगोदर बघितलेली बरीच स्वप्ने अपूर्ण राहिलेली असतात. अशात तिच वाढणार वय. तिचे आरोग्याकडेही म्हणावं तेवढं लक्ष तिला देता येत नाही. नोकरी करणाऱ्या स्त्रियांन जवळ मुलं सांभाळायला कोणीतरी असते. अशा मध्ये ती घराबाहेरच्या वातावरणात राहिल्याने तिला तितका मात्र ताण डोक्यावर येत नाही. मात्र गृहिणी म्हणून जीवन जगत असताना तिला काही कार्यक्रम किंवा सहज शेजारांशी कधी मधी तिचं बोलणं होते ती तिच्याच गुंतार्‍यात इतकी मग्न असते की तिला बऱ्याचदा वाटते की घर मुलं, नवरा घरातील मंडळी यातच तिच संपूर्ण जीवन निघून जाते. तिला आवडणाऱ्या गोष्टीसाठी तिला वेळच मिळत नाही.कधीतरी ती एकांतात बसून जर मोबाईल बघत असेल तर त्यावरही बरीच प्रश्न उभी केल्या जाते की ही तासंताच असं मोबाईल मध्ये काय बघते. खरंतर मोबाईल मध्ये ती कधी रांगोळी,मेहंदी, गाण्याचे रिल्स, मेकअप, नवनवीन कपडे ऍक्टरचे नवे लुक ती मोबाईल मध्ये मिळालेल्या वेळामध्ये बघत असते. कधीतरी एखादी मूव्ही तर कधी ती चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही ती गृहिणी असताना करत असते. मात्र तिच्या बद्दल बोलल्या जाणारा एक प्रश्न असतो की ती काय करते..?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract