Chaitali Warghat

Abstract Others

2  

Chaitali Warghat

Abstract Others

लेख : चैत्रोत्सव

लेख : चैत्रोत्सव

3 mins
28


आला आला.. चैत्र मास

सृजनशीलतेची बहरणं

नवी पालवी नवा गोडवां

गोड कौतुकाची उधळणं

चैत्र महिना साधारणपणे मार्च आणि एप्रिल महिन्यात येतो. वसंताच्या आगमनाचा महिना म्हणजे चैत्र. हळूहळू सार आसमंत गरमीने, उष्णतेने व्यापून घेते. उष्णतेची झळा जाणवू लागते. रखरखत्या उन्हात एक नव्या बहराची चाहूल. सूर्य जणू आग ओंकत आहे, ऊन अंगाला लागते ती ऊन सहन होतं नाही. उन्हाळा सुरु झालेला हें सांगत येण्याचे हेच दिवस. चैत्र म्हणजे कडक ऊन त्याच बरोबर चैत्राचा उदय म्हणजे फुलत जाणारे उत्सव समारंभ निरनिराळ्या रंगाच्या, सुगंधाच्या फुलांची होतं रहाणारी बससात आणि नवलाई. चैत्रात जरी ऊन असली तरीही झाडांना नव्या पालव्यांची उधळण करणारी, फळांमध्ये गोडवा भरणारी, आंब्याच्या झाडाला प्रथम मोहरून, बहरून फळांना गोडवा देणारी. फळात चैत्र रंगत वाढवते. फुलांना फुलविते, सुशोभित रूप देते. चैत्र म्हणजे एकूणच सृष्टीचा सोहळा. चैत्रात बहरून येणारा फुलांचा सडा दिसून येतो. या ऋतूत गुलमोहर आपल्या सौंदर्याने मन जिंकतो. बहावा सुद्धा फुलून येतो. तो आकर्षित करतो. चैत्र मासात आपल्या सांस्कृतिक लाभलेली एक निरंतर चालत आलेली परंपरा आहे ती म्हणजे चैत्रामध्ये मोठ्या प्रमाणात खूप महत्वाची कामे जसे, घराचे बांधकाम, लग्नाकरिता योग्य स्थळ बघण्याचे, जुळवून आणण्याचे काम तसेच बरीच महत्व पूर्ण कामाला सुरुवात केली जाते. चैत्रात गावोगावी आनंदाचे वातावरण दिसून येते. गावोगावी जत्रा-यात्रा भरतात. शेतकऱ्यांनाही थोडाफार तरी उसंत घेऊन संपूर्ण गावातील लोक, नातेवाईक. या निमित्त एकत्र येतात, चैत्र उत्सव आनंदाने साजरे करतात. संपूर्ण गोतावडा गोळा होऊन जत्रेचा आनंद घेतला जातो. ग्रामदेवतेची पूजापाठ केली जाते. थोडी का होईना पण हौसमौज चार, पाच दिवस तरी केली जाते. या दिवसांचा आनंद मनसोक्त घेतला जातो.

चैत्र जत्रा- यात्रांचे क्षण

आठवणीत गुंतलेले मन

ग्रामदेवतेची पूजा पाठ

गोड नैवेद्य कुठे खारे अन्न

चैत्र मास सुरु होता, ग्रामदेवतेच्या नावाने गावातील लोक संपूर्ण यात्रेचा आनंद घेत जेवणाचा ही उत्सव करतात, सर्व एकत्र येऊन गोड जेवण किंवा खार या निमित्त ऐकमेकांप्रति जिव्हाळा, गावामध्ये आपुलकी, एकोपा, प्रेमभाव टिकून रहातो, ऐकमेकांच्या सुखदुःखाची विचारपूस केली जाते, चैत्र नात्यात गोडवा वाढतो हें मात्र खरं. त्याच बरोबर नजरेस आपल्याला चैत्रात कडुनिंबाला बहर आलेला दिसतो. चिंचेच्या, बोराच्या झाडाला हिरवेगार बोर, चिंचा दिसून येतात. आंब्याच्या झाडाला बहर आलेला असतो. तर बऱ्याच झाडांना आंबे ही आलेले असतात, आंबे तोडण्यासाठी, कधी करवंदीच्या जाळ्यात हात ओरबडून घेण्यासाठी मुलांची धावाधाव सुरू असते. चैत्रात नवी उमेद, नवा उत्सव, लग्न सराई, सणं उत्सव समारंभ सर्व काही नवनवीन सृजनोत्सव दिसून येतो. फळांचे रस मोठ्या प्रमाणात सेवन केले जातात. खेड्यामध्ये पोरं रानोमाळ आंबे, चिंचा, बोर, करवंद तोडत असताना दिसून येतात. निसर्ग नव्या रूपात आपल्याला दिसतो. निसर्गात होणारा बदल हा आपल्याला जाणवत असतो. आपण डोळ्यांनी बघत असताना कधी हिरव्या पानाचं पिवळ्या पानात होणार रूपांतर, गुलमोहराच्या केशरी नारंगी लाल भडक दिसणाऱ्या छटा, झाडाखाली पडलेला गुलमोहर, मन भारावून घेणारा लाल गलीचा. पळसाचं आग ओंकणार लाल भडक रूप, कोकिळेचा मधुर स्वर, पक्षांची किलबिल कानावर पडते. विविध सुगंधीत फुलांच्या गंधाची उधळणं होतांना दिसते,. जाई जुई गुलाब मोगरा चाफा फुलझाडं फुलतात, बहरतात. वातावरणातील होणारा बदल, फुलांचे रंग, फुलांचा सुंदर, फळांच्या रसाची चव, प्रत्येकाचे खुललेले रूप, निसर्गातला लाभलेला एक गंध, यात फुले फळे एक सृष्टीचा जणू उत्सव सुरू होतो. चैत्र मास सांस्कृतिक सौंदर्याचे ही दाखले देतो. चैत्र मनात नव्याने जुळवून आलेल्या लग्नसराई ने स्वप्न बघण्यास नव्याने मनाला सज्ज करतो. निसर्गाने सृजनशीलतेचे दान ओंजळीत टाकल्यामुळेच चैत्र मनाला आवडतो. मग सुरू होतो सृष्टीचा एकच उत्सव चैत्रोत्सव.

गंधाळलेल्या मनात

प्रीत बहरलेली

रंग गंधाने न्हाऊन

सृष्टी चैत्रात नटलेली


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract