वनिता
वनिता
वनिता वयाच्या अवघ्या सात वर्षाची असतांनाच तिची माय कॅन्सरच्या बिमारीने मरण पावली हलाकीची परिस्थिती आणि त्यात सांभाळणार ही कोणीही नव्हतं. त्यामुळे तिच्या बापानं दुसरं लग्न केल तिची सावत्र माय तशी लय प्रेमळ होती तिची काळजी पण घेत होती पण सख्या मायची जागा कोणी घेऊ शकते काय? अशातच वनिताच नाव गावातल्या शाळेत टाकलं आणि वनिता शाळेत जायला लागली. तिच्या सावत्र मायले दिवस गेले आता वनिताबद्दलच प्रेम कमी होऊ लागलं आता तिची माय अगोदर सारखी काळजी घेत नव्हती,आता तिच्या पुढे जेवायला ताट सावत्र माय ठेवणं देत होती मात्र तिचा बाप सकाळपासून गावात कामावर जात होता आणि संध्याकाळी वापस येत होता,वनिता संध्याकाळ व्हायले आली कि बापाची वाट पाहत बसे,तिचा बाप तिले लय जीव लावे, लय प्रेमानं बोलें, तिले जे आवडते ते सर्व तिच्यासाठी येतांना आणे, त्यातलं तिचा बाप सावत्र बायकोच्या पण साऱ्या गरजा पूर्ण करे,कायचीही कमी पडू देत नव्हता, सावत्र मायले आता एक पोरगं झालं, लय गोरपान, वनिता तशी जास्त गोरी नव्हती पण डोळे पाणीदार होते अन देखणी ही होती पण तिचा लहान भाऊ हा लय गोरा होता तिले लय आवडतं होता, भावाचा लय लाड करे,पायता पायता वनिता वयात आली,अन दहावीचे पेपर दिले आणि 63 टक्के घेऊन दहावी उत्तीर्ण झाली पुढचं शिक्षण घ्यावं अशी तिच्या बापाची लय इच्छा होती पण सावत्र बायकोसमोर त्याच चालत नव्हतं, सावत्र मायले वनिताच्या लग्नाची घाई सुरु झाली.
वनिताने लय विरोध केला मात्र तीच काही चालत नव्हतं,तिची सावत्र माय तिले समजून सांगत होती लवकर लग्न करून पोरीनं स्वतःच्या घरी गेलेलं बर नाही तर चांगल आलेलं स्थळही हातातून निघून जाईल आता तुले लय चांगले स्थळ येत हाय जर नाही म्हटलं तर पुढ चालून कोणीही लग्नाचं स्थळ घेऊन आपल्या दारात येणार नाही त्यातच तुया बापाची तब्बेत काही बरोबर नसते,अन लहान भाऊ विजू याच्याही शिक्षणाचा खर्च पुढ वाढणार हाय, त्याले लय शिकवाच हाय, जर तुया शिक्षणाले सारे पैसे लावले तर लग्न कस करावं तुय,तुया भावाच्या शिक्षण कस करावं? सुखदुःखत येणाऱ्या अडिअडचणी कशा सोडवावं तूच सांग वनिता,असं तिची सावत्र माय येऊन तिले समजून सांगू लागली वनिता तिच्या मायचं सर्व आयकून परिस्थिती लक्षात घेऊन लग्नाले होकार दिला,येत्या रविवारीच तिले पुलगावचे पाहुणे पहायले आले अन पहिल्याच खेपात तिले आलेल्या पाहुण्यांन पसंद केल,अवघ्या पंधरा दिवसात तीच लग्न झालं.वनिताच सासर लय श्रीमंत नव्हतं पण खाऊन पिऊन ठीक होत तिचा नवरा किराणाच्या दुकानात कामावर होता,घरात सासू सासरे होते एकच नणंद, अन तीच पण लग्न झालेलं होत तसा तिले घरात कोणताही त्रास नव्हता सर्व देवाच्या कृपेन सर्व व्यवस्थित होत,लग्न होऊन एक वर्षही होत नाही तर तिले दिवस गेले आणि ऐकामाग एक असे तीन वर्षात तिले तीन पोरी झाल्या,वनिताले पहिल्या पोरीच्या वेळी लय आनंद झाला होता तसाच दुसऱ्या तिसऱ्या पोरीच्या वेळीपण झाला पण घरात वातावरण काही वेगळंच होत,तिले जेव्हा दुसरी पोरगी झाली तेव्हा तीन तिच्या नवऱ्याले म्हटलं आता मले तिसरं लेकरू नाही पाहिजे,मले कुटुंबं नियोजनाच ऑपरेशन कराच हाय पण तीच कुठं चालते,तिच्या सासूले हे माहित झालं अन घरात मोठ भांडण झालं,घराले म्हणे वारिस पाहिजे या पोरी काही घराच्या वारिस नाही पोरी म्हणजे लोकायचं धन, वनिता लय समजवण्याचा प्रयत्न करत होती पण तीच काही चालत नव्हतं यात तिले मदत करणारे तिच्या कडून बोलणारे कोणीही नव्हतं.
वनिता पोरीकडे पाहून विचारात बुडून जाये
" मनातल्या मनात,मी पुटपुटू किती
कायले बाई म्हणून जन्म दिला व माय
नाही जन्म देणाऱ्या मायच्या घरची
सासरवाडीत मनासारखं चालते काय"
तिच्या मनासारखं काहीही घरात होत नव्हतं तिचा नवरा त्याच्या मायचं,बापाचं आयकत जाय,आता घरात तीन पोरी झाल्या वनिताले तिघीच्या शिक्षणाची, लग्नाची काळजी वाटू लागली मग डबल तिले दिवस रायले आता सर्वांयले वाटू लागलं यंदा तरी पोरगं होईल,तिच्या नवऱ्यान अन सासून 'सोपीनाथ बुवाचा' सोमवारचा उपवास सुरु केला पोरगं झालं पाहिजे म्हणून, हे माहित पडताच वनिताले लय रड आला तिले समजलं नव्हतं कि तिच्या नवरा आणि तिची सासू 'पोरगं' झालं पाहिजे म्हणून किती काय करत हाय जर यात डबल पोरगी झाली तर कस करावं या विचारानं तिले जेवण पोटात जात नव्हतं त्यात तिले तीन पोरीची काळजी घ्यावी लागत होती,त्या पण वयान लहान होत्या त्या तिघीमध्ये फक्त दीड दीड वर्षाचं अंतर होत. वनिता शरीरान लय कमजोर होत होती अंगणवाडीतुन तिले आयरन च्या गोड्या आणि पाहजे तेवढी सुविधा भेटत होती पण ते लय वेळा चौथ लेकरू नको मले म्हणून नेहमीच अंगणवाडी बाईले म्हणत होती, आता तिले आठ महिने झाले अन नववा महिना लागला.तिचे तिन्ही बायतपण तिच्या सासूनच केलेले होत आणि हे बायतपण पण घरी आणि सासूच्याच हातानं होणार हाय हे तिले माहीत होत, नववा महिना लागताच तिच्या नवऱ्याले अन सासूले तिची काळजी वाटू लागली, प्रत्येक सोमवारी देवापुढे नारळ फोडल्या जात होते आणि वनिताले यंदा पोरगच झालं पाहिजे असं म्हणून एक किलो पेढे वाटणार देवा पोरगं झाल्यावर हा 'नवस' केला.एका रात्री वनिताले झोप काही येत नव्हती वनिता मुकाट्यानं पलंगावर पडून होती यातच तिचा नवरा आणि तिची सासू यायच्या गोष्टी चाललेल्या होत्या,जर वनिताले चौथादा पोरगी झाली तर काय करावं याच सर्वायले टेन्शन होत,या बद्दल बोलण सुरु होत, वनिता हे आयकताच तिच्या डोळ्यातून पाणी आलं तिच अंग कापायले लागलं तिले समजतं नव्हतं जर पोरगी झाली तर काय होणार वनिताच्या नवऱ्यान त्याच्या मायले म्हटलं माय जर पोरगी झाली तर, वनिताची सासू मोठ्यानं श्वास घेत म्हणाली जर पोरगी झाली तर जे नाही केल ते करावं लागणार हाय, आपल्याले, पोरगं पाहिजे अन् जर पोरगी झाली, असं वनिताच्या नवऱ्यान म्हणताच तिच्या सासूच्या तोंडातून निघालं कि 'तिचा जीव घेऊन घेऊ' नाही तरी लेकरू झाल्यावर बायतीन बाई जवळ कोणीही नसते लहानस लेकरू रक्तामासाच कोणाले पण काहीही माहित नाही पडणार सर्व बरोबर होणार हे सार वनिता मुकाट्यानं आयकत होती.
आता तिले व्यवस्थित सर्व समजतं होत कि जर पोरगी झाली तर ते वाचणार नाही तिचा जीव घेतला जाणार, वनिता सर्व मन मोठं करून सर्व पोटात ठेवलं अन सकाळ होताच तिच्या तिन्ही पोरीले जेवायले देल तयचा खूप लाड केला अन् लय प्रेमानं समजून सांगू लागली जेव्हा कि तयच वयपण समजदारीच्या गोष्टी समजू शकणार इतकं नव्हतं तरी पण वनिता सांगत होती दुपारून वनिताच पोट दुखाले लागलं आता वनिता विचारात पडली कि काय करू, जर सासूले सांगतलं तर होणाऱ्या पोरीचा जीव घेतला जाईल तीन घाईघाईन सारे काम केले जेवण न करताच तीन डब्यातून दहा रुपयाची नोट साडीच्या मिरीत खोचली,पोटाचा त्रास वाढत होता तशीच ते रोडवरून जाणार येणार ऑटोरीक्षावर लक्ष ठेऊन होती कि कोणता ऑटोरीक्षा गावाच्या दिशेने जाईल म्हणून एक ऑटोरीक्षा आला तिनं मोठ्या सावधपणे पायात चप्पल घातली अन एका झोल्यात कपडे घेऊन सरवायची नजर चुकवून ऑटोरीक्षात बसून गावच्या सरकारी दवाखान्यात गेली ऑटो लय स्पीड मध्ये जात होता तिनं हळू चालवाले म्हटलं अन दवाखाना येताच रिक्षावाल्या ने तिला दवाखाण्याच्या आत मध्ये नेलं, वनिताच्या वेदना वाढतच होत्या दवाखानात जाताच त्या जास्त झाल्या अन ती जोर जोरात ओरडायला लागली "माया पोरीले वाचवा, माया पोरीले वाचवा" लवकरच दवाखाण्यातील नर्स, डॉक्टर वनिता जवळ आले आणि डिलेव्हरी बेडवर झोपवण्यात आले वनिताचा त्रास वाढलेला होता अंग थरथरत होत नर्स तिच्या जवळ येताच "माया पोरीले वाचवा, माया पोरीले वाचवा"नाही तर तिचा जीव घेऊन घेईल मायी सासू अन माया नवरा अशी ओरडायला लागली तिचा अवतार पाहून डॉ. अंजली या तिच्या जवळ गेल्या तिला धीर दिला मी आहे न असं म्हणत तिची समज काढत तिला डिलेव्हरी रूम मध्ये नेण्यात आलं ऑटोचा प्रवास करून अन तिची गर्भवस्थेत असतांना बऱ्याच प्रमाणात मानसिक त्रास सुद्धा झालेला होता अर्धवट जेवण यामुळे तिची शारीरिक स्थिती खराब झालेली होती, डॉक्टर अंजली विचारात पडली होती कारण त्यांनी अशा प्रकारची पहिलीच केस डिलिव्हरीची बघितली होती त्यांना ही काही समजेना वनिताच्या सोबत कोणीही आलेलं नव्हतं,सर्व नर्स,डॉक्टर यांना विचार पडला कि काय करायच,डॉ अंजली यांनी सर्व जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली थोड्यावेळातच वनिताने गोंडस बाळाला जन्म दिला,दोन तास वनिता बेशुद्ध अवस्थेत होती तिला सलाईन देण्यात आली मात्र इकडे डॉ अंजली आणि पूर्ण स्टाफ या विचारात होता कि आता या पेशन्टच्या घरच्या लोकांचा शोध घ्यावा कसा,काही वेळातच वनिता ओरडायला लागली"माया पोरीले वाचवा माया पोरीले वाचवा"डॉ अंजली धावतच वनिताकडे गेल्या अन मोठ्या प्रेमाने वनिताच्या डोक्यावरून हात फिरवला तिला धीर देत विचारना केली कि काय झाले,तुझ गाव कोणतं,नवरा काय करतो, अन अशी दवाखान्यात एकटी कशी,हे सर्व प्रश्न अंजलीने वनिताला केले यावर वनिताने सर्व हकीकत डॉ अंजली यांना सांगितली मात्र वनिता रडत असता एकच म्हणत होती जर मुलगी झाली तर तिला मारून टाकणार लवकरच वनिताच्या घरच्या लोकांचा शोध घेतला गेला अन दवाखान्यात वनिताच्या तिन्ही पोरी तिचा नवरा,सासूसासरे सर्व दवाखान्यात दाखल झाले डॉ अंजली यांनी पोलिसांना बोलवून घेतले सोबतच वनिताचे बयानही पोलिसांनी नोंदवून घेतले
आता वनिताच्या सासुसासरे व तिच्या नवऱ्याला काहीही सुचत नव्हते हे काय झालं म्हणून अन पोलीसही वनिताला भेटू देत नव्हते कस तरी करून वनिताला भेटण्याची परमिशन डॉ अंजली अन पोलिसांनी दिली,सोबतच डॉ अंजली व पोलीस त्यांच्या सोबत वनिताला भेटायला गेले तेव्हा वनिताच्या आजूबाजूला मुलं नव्हतं हे पहाताच वनिताचे सासुसासरे तिच्या नवऱ्याला प्रश्न पडला अन तेजोरजोरात रडायला लागले सोबत वनिताही रडायला लागली वनिताने तिच्या नवऱ्याला म्हटले कि तुम्हचे अन सासूच बोलण मी रात्री झोपेत ऐकलं होत कि तुम्ही पोरगी झाल्यावर तिचा जीव घेणार म्हणून म्हणूनच म्या न सांगताच पोटच्या पोरीचा जीव वाचवण्यासाठी नं सांगताच आली 'मले माफ करा' मले पोरी होतात यात माया काय दोष हाय!पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता सर्व पुरावे होते मात्र नंतर डॉ अंजलीनी वनिताचा संसार टिकून रहावं कारण वनिताला तीन पोरीचं होत्या त्यात तिची काळजी घेणार कोणीही नव्हतं म्हणून डॉ अंजलीनी वनिताच्या नवऱ्याला व तिच्या सासूला समजून सांगितलं कि पोरग अन पोरगी असा भेद करू नये दोघांनाही सारखाच हक्क आहे कोणाला ही कमी लेखू नये तुम्ही जस पोराला शिकवता तसेच पोरीलाही शिकवावं,ती पण म्हातारपणात तुम्हाला आधार देईन,वनिताचे सासुसासरे तिचा नवरा हात जोडून डॉ अंजली अन पोलिसांना माफी मागू लागले सोबत वनिताही,थोड्या वेळातच नर्स वनिताच्या जवळ एका कपड्यात गोरपाण गोंडस बाळ घेऊन आली अन येऊन वनिताच्या बेडवर जवळ ठेऊन दिल, बाळाला सर्व आंनदाने बघू लागले यावेळी कोणीही पोरग आहे कि पोरगी अशी विचारणा केली नाही सर्वांच्या डोळ्यात आंनदाश्रू निघत होते.वनिताची सासू डॉ अंजली यांना म्हणाली मी पण माया चारीही नातीले तुमच्या सारखीच डॉक्टर बनवणार लय शिकवणार पोरांसारखंच डॉ अंजली म्हणाला वनिताला चौथ्यादा पोरगी नाही पोरग झालेलं आहे हे ऐकताच सारे खुश झाले वनिताने डॉ अंजली यांचा हात पकडला आणि रडायला लागली वनिता म्हणाली आज तुमच्यामुळे हा आंनदाचा दिवस पहाले भेटला तुम्हीच पोरग अन पोरीचा भेद दूर केला,आमच्या विचारात परिवर्तन केल,माया संसार सुखाचा केला बाई,तुम्हचे उपकार कसे फेडू "तुम्ही डॉक्टर नाही माणसाच्या रूपात मायासाठी देव आहात" वनिता हे बोलताच साऱ्याच्या डोळ्यात आंनदाश्रू वाहू लागले.
"देवाले इथं,तिथं शोधलं
देव काई केल्या भेटला नाई
माणसातच देव हाय खरा
माणसानं काहून जाणलं नाई!"
