Chaitali Warghat

Inspirational Others

1.8  

Chaitali Warghat

Inspirational Others

चिंता

चिंता

3 mins
17


'Sound mind in a sound body '


असे जे म्हणतात ते खरे आहे कारण निरोगी शरीरात निरोगी मन वास करते आणि व्यक्तीचे कोणतेही कार्य चांगले होण्यास मदत होते. जर का व्यक्तीला परिस्थितीशी समायोजन साधता आले नाही तर मन विकृत बनते. मनाला रोग होतो यालाच मनोविकृती म्हणतात. परिस्थितीशी व्यक्तीचे जितके योग्य स्वरूपाचे समायोजन तितके त्या व्यक्तीचे मानसीक आरोग्य चांगले आहे असे समजावे. ज्या व्यक्तीची समाजाशी समायोजन करता येईल त्या व्यक्ती निरोगी त्याचे मानसिक आरोग्य चांगले.

यासाठी मानसिक आरोग्य संवर्धनासाठी उपयुक्त असणाऱ्या सवयी, मनोवृत्ती, निष्ठा, विचारधारा, यांच्या मनामध्ये रुजतील अशाप्रकारे आपले नियोजन होणे आवश्यक ठरते.आधुनिक जीवन धकाधकीचे अस्थिर झाले आहे दुःख, निराशा, वैफल्य, चिंता याचे फरके सर्वांनाच सहन करावे लागतात. विवेचना व चिंता आपल्या मनात घर करतात व आपल्याला अस्वस्थ करतात, आणि आपण आपला आत्मविश्वासाचा थर हळूहळू गमावून बसतो आणि चिंतेत / चिंता करत आयुष्य जगतो 


चिंतेची करणे


1- यशभावनेची पूर्ती

आपल्याला जीवनात यश मिळावे असे प्रत्येकाला वाटते. यशासाठी आपली सारखी धडपड चाललेली असते. सामाजिक जीवनामध्ये आज प्रत्येक क्षेत्रात तीव्र स्पर्धा आहे. या स्पर्धेत जो टिकतो तोच तरतो, स्पर्धेमुळे जीवनात संघर्षाचे प्रसंग येतात. अगदी बालपणापासून आपल्यात सतत अपेक्षा, स्वप्ने, महत्वाकांक्षा पूर्ण करण्याची धडपड सुरु असते,या संघर्षातून यश न मिळाल्यास असमाधान निर्माण होते यातूनच वैफल्य व मानसिक विकृती जन्म घेतात आणि या मनात चिंता उत्पन्न करतात.


2-वर्चस्व वं प्रतिष्ठेची भावना

आपले प्रभुत्व प्रस्थापित व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते.तसेच आपण ज्या ठिकाणी राहतो, काम करतो तेथे आपल्याला सर्वांनी ओळखावे योग्य तो मान द्यावा असे प्रत्येक व्यक्तीला वाटतं असते. इतिहासात झालेल्या लढाया वर्चस्वासाठीच होत्या, लग्नात नवरदेवाचे रुसणे, विहीणबाईचा मानपान याचे कारण 'प्रतिष्ठा' समाजात आपले विशिष्ट स्थान असणे ही प्रतिष्ठेची गरज असते या जर पूर्ण झाल्या नाही तर मनात संघर्ष निर्माण होतो व मानसिक आरोग्य बिगळते फक्त अति काळजी चिंता केल्यामुळे.


3- शारीरिक सुरक्षिततेची गरज

तहान, भूक, विश्रांती, वासना या प्राथमिक स्वरूपाच्या गरजा आहे, या गरजा पूर्ण झाल्या कि व्यक्ती आनंदाने आयुष्य जगतो पण यातील कोणतीही गरज कमी ठरली तर ती चिंतेचे कारण ठरते, आज पैसा खूप महत्वाचा घटक आहे सोबतच चांगले कुटुंबं असणे हे ही महत्वाचे आहे, आपल्याला आधाराची, समजून घेण्याची, प्रेमाची, गरज असते, सोबतच यावरच आपले जीवन अवलंबून असते जर यात कमतरता जाणवली तर मन अस्वस्थ होते नको ते विचार मनात येतात आणि मानसिक ताण निर्माण होऊन कामात लक्ष लागतं नाही यातूनच चिंतेचा जन्म होतो, मानसिक आरोग्य बिगळते, व मानसिक विकृतीची बीजे पेरली जातात.


 उपाय


आपले व्यक्तिमत्व सुधारव्याचे असल्यास व्यक्तीने ऐकलंकोडेपणा व माणूस घाणेरडेपणाची वृत्ती सोडावी. त्याने समाजात जास्तीत जास्त मिसळावे. त्यातून चांगल्यातले चांगले गुण घेण्याचा प्रयत्न करावा. इतरांच्या सहवासात राहून समाजातील आपले मान्यता मूल्य वाढविण्यास प्रयत्न करावा, शिक्षणाच्या माध्यमातून उत्तम ज्ञान वाढवावे, चांगले चारित्र्य,व्यवसायाची आवड, बौद्धिक पात्रता, मानस शास्त्राचे ज्ञान, शिकण्याची आवड , सतत नवीन शिकत रहाणे, यातून आपल्या कौशल्यात वाढ होऊन आपला आत्मविश्वास वाढतो, यामुळे आपण सतत कामात रहातो. चिंता, काळजी करण्यास कोणतेही कारण मिळत नाही कारण उत्पन्न होणाऱ्या काळजीवर मात करण्याचे समर्थ आपल्याया असते आणि आपण आनंदी, सकारात्मक आयुष्य जगतो...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational