Arun Gode

Comedy

2  

Arun Gode

Comedy

विश्र्व पती महामेळावा

विश्र्व पती महामेळावा

12 mins
130


        तीन-चार जिवलग मित्र, एकदम लंगोटी मित्र म्हणायलां हरकत नाही .ते जेव्हा मिळतात. जे काही म्हणतातं ,काही विचार क्षण भर ही न करता एकमेकांशी बोलतात.एके दिवशी सहज भेटतात. त्यातील एक मित्र जो चेह-या वरुनचं वाटत असे की हा घरुन निघतांना बायको सोबत भांडुन आला आहे. त्याचे हाव-भाव बघुन अन्य मित्र थोडे चिंतित दिसतात. जसे जामवंताने हनुमानाला आपल्या शक्तिची जानीव करुन दिली होती. तसाच प्रकार इथे पण घडतो.आलेले सर्व मित्र एक-मेकाशी फार जीवा-भावाने मिळतात. एक दुस-याच्या कुशल-मंगलतेची विचारपुस करतात. पण संतापलेले मित्राला मात्र चन्याच्या झाडावर चढवण्या प्रयत्न करतात. अरे हा आपला बबर शेर ,मस्त-मौला असतो. हा काही चिंता वैगरे काहींच बाळगत नाही. सगळ्या चिंता खुंनटीवर बांधुन ठेवतो.आपल्या सगळ्या मध्ये फार सुखी आणी भाग्यवान आहे. आपल्या वहिणी पण फार माळाऊ व व्यवहारिक आहे. त्या याची फार काळजी घेत असतात. हा सर्व प्रकार त्याला डिवचन्या साठी नसुन त्याला होत असलेल्या वेदनान मधुन बाहेर पाडण्यासाठी असतो. तसे पाहिले तर जीवलग मित्र आपल्याला होणारा त्रास कधीच मित्रांना सांगत नसतो. त्याचा त्रास त्या मित्रांना न सांगताच समजत असते. जेव्हा हे मित्र मिळतात,त्यांचा उदेश फक्त एक –दुस-याला कशे खुश करता येईल यावर जास्त असतो. कारण त्यांना माहित असते की घरों-घरी मातीच्याच जुली असतात. जीत्याची खोड कधी मेल्या शिवाय जात नसते. रोज मरे त्याला कोण रडे. हे सगळ सहनच करावे लागते.पत्नी सुर्पंखा असुनही, आमच्या ससुर बाईची पाठ किती मऊ म्हनून तीचे गुण-गाण सारखे गावे लागते. व असाच संसार समोर ढकलावा लागतो. स्वतःचे झाकुन पण दुसर्याचे वाकुन पाहण्याची प्रवृत्ती ख-या मित्रांन मध्ये नसते.


     पहिला मित्र : अरे, यार, या सा-या बायकांना नेहमीच सारखी कट-कट करण्याची सवय कां असते ?. त्या सारख्या नव-याला बंधनात बांधुन ठेवण्याचा प्रयत्न कां करत असतात ?. करुण करुण राबावे आणी शेवटी शिव्या खाऊन मरावे अशी गत या बायका कां करतात?. आपण एवढी उठा-ठेव करुण तीच्या इच्छा पूर्ण करित असतो.पण शेवटी काय ?

दुसरा मित्र : काय म्हणजे ,

पहिला मित्र : करुन –करुन राबावे, शेवटी शिव्या खावुन मरावे !

तिसरा मित्र : म्हणुन तर म्हणतात ,लग्नाचा लाडु जो खातो, तो ही नेहमी पसतावतो, आणी जो खातं नाहीं तो पण पसतावतो.

दुसरा मित्र: अरे सोड, हे तर चालतचं राहणार.यालाचं घर-ग्रहस्ती किंवा संसार म्हणंतात. तु घरी भांडुन आला.पण तुझ्या जेवणाची वाट फक्त तीच बघणार !

सर्व मित्र : आपण सगळे ,बाकी सगळे पण, या बायकांच्या कट-कट या महामारीने फार त्रस्त झालो आहे. आपण स्वःतला खुप विदवान समजतो. तर यावर काही उपाय कां शोधुन काढत नाही?. सर्व मित्रांनी ठरविले की काही तरी कायमचा उपया शोधला पाहिजे. त्यामुळे जे लग्नानंतरचे एक-दोन गुलाबी वर्ष पुनः परत आनता आले पाहिजे. अरे आपल्या सर्वांचे म्हणने फार रास्त आहे . त्याला काय उपाय असु शक्तो. ज्या मित्राचे सर्वात पहिले लग्न झाले होते तो गंमतीने म्हणालां ( दुसरा मित्र ). आता माझी बायको शेवटच्या अवस्थेत आहे. ती प्रथम अवस्थेत वापस येने कठीन आहे, मित्रोहो !.

दुसरा मित्र:- अरे नविन- नविन बायको, पहिला वर्षि असते, “मृगानयनी”. तीच्या डोळ्याकडे बघुन, अजुन काही बघण्या इच्छा नसते. समुद्रा सारख्य विशाला डोळ्यात सारखे पोहत राहावे असे वाटते. नंतर ती बनते “ चंद्रमुखी “, अमावशेला ती नेहमीच दाखवते आपला इंगा,व पोर्णिमेला कधी- कधी दाखवते मधुचंद्र. आणी तुम्हाला करते खुश. आणी काढुन घेते आपले काम. त्याच्या नंतर जेव्हा मुला-बाळ्यांची लागते झड ती बनते “सूर्यमुखी “. म्हणजे तीला मिळते स्थाई आदेश तुम्हच्या जीवन साथी राहण्याचा. ती बरेच वेळा आपल्याला समजुन घेण्याचा कधी-कधी प्रयत्न करते. आणी मुले जेव्हा चांगली तुम्हच्या खांद्या टेकली की ती बनते “ज्यालामुखी “.आनी ही अवस्था गाठली की ती मग सारखी कट-कटीची आग तुमच्या जीवनात ओकत असते. हेच पत्नीचे वास्तविक रुप असते. मित्रोहो,जरा समझा करों, मेरे मर्द दोस्तों.


     सर्व मित्रांना आज किंवा उद्या आम्ही पण ज्वालामुखीचे भुकत- भोगी होणार !. म्हणुन काही तरी उपाय शोधुन काढायलाच पाहिजे. शेवटी ते सर्व मित्र या वर खुली चर्चा करण्यासाठी विश्र्व पती महामेळावा घेण्याचे ठरवितात. तशे ते प्रयत्न सुरु करतात..त्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करतात.शेवटी त्यांच्या प्रयत्नाला यश येते. जगातील सर्वच ,सर्व वयोगटाचे सर्व पीडित पती या मेळाव्यात येण्यासाठी आतुर असतात. त्यामध्ये, विख्यात,लेखक, कवि, समाज सुधारक, समाज सेवी, चित्रापट सितारे, वैज्ञानिक, अभियंता, खेळाडु व अन्य गन्य-मान्य अतिथी येण्यासाठी आवेदन पाठवतात. इतक्या महत्व पूर्ण पतींची सूची बघुन मेळवा प्रबंधनच्या सदस्यांची पाया खालची जमिन खिसकुन जाते.त्यांना विचार पडतो, अरे, हे,सर्व नामी कलाकार व देशसेवी आमच्या पेक्षा पण जास्त पत्नि पीडित दिसतात. आली आंगावर तर घेतली शिंगावर. आता आपण जर अशी वाटचाल केलीच आहे तर मेळावा घेवुनच टाकु. भिड ट्याळण्यासाठी जे गन्य-मान्य पती प्रथम आवेदन करतील, अशाच फक्त एक हजार सहभागींनाच परवांगी द्यायची अशी प्रबंधनाने अट ठेवली होती.तरी अवघ्या आठ दिवसातच एक लाखा पेक्षा जास्त आवेदन प्राप्त झाले होते.फक्त प्रथम एक हजार सदस्यांना आमंत्रण देण्यात आले होते. त्यमुळे अन्य सदस्यांनी त्यांना वीडिओ कॉनफरंसिंग द्वारा प्रवेश देण्याचा आग्रह केला होता. अव्यवस्था निर्माण होवु नये म्हणुन त्यांचा आग्रह स्वीकारण्यात आला नव्हता.तरी त्यांना आपले कोमेंट्स ई-मेल द्वारा पाठवण्याची संधी देण्यात आली होती. त्यासाठी भव्य –दिव्य शाही पेंडाल टाकण्यात आला होता.सर्वच व्यवस्था अगदी चोख करण्यात आली होती.


    पती महा मेळाव्याचे अध्यक्ष स्थान, दुस-या मित्राला देण्यात आले होते..कारन त्याला सगळ्यात जास्त कट-कटीचा आधी लग्न केल्याने अनुभव असतो. मेळ्याव्यात, जगातील सर्वेच धर्माचे व भाषेचे पीडित पती येतात.या वरुन एक गोष्ट स्पष्ट होते. प्रत्येक स्त्रीचा कट-कट करने हा आनुवंशिक गुन आहे. व तो जगाच्या प्रत्येक स्त्रीत विद्दामान असतो. ठरल्या प्रमाने प्रतेक व्यकताला पांच मिनटाचा अवधी आपाले विचार व अनुभव व्यक्त करण्यासाठी देण्यात आले होते.


     कार्यक्रमा मध्ये पेशाप्रमाने वक्तांची सूची बनवण्यात आली होती.त्यांना सांगितले होते कि जर आपले विचार आधी दिलेल्या वक्ताशी मिळते-जुळते

असेल तर त्याची पुन्हा पुनरावृत्ती करु नये. फक्त वकता नंबरचे मी समर्थन करतो.अशे व्यक्तव्य देवुन मोकळे व्हावे. महामेळाव्यात सर्व औपचारिकता केल्या नंतर वक्तांच्या भाषणाला सुरुवात झाली.


शिक्षक पती : मी सर्व मुला-मुलींना वर्गात निट पने सांभाळतो. माझ्यां वर्गातील मुले कधी गोंधळ करित नाही.या साठी मुख्याध्यापक माझे सारखे कौतुक करतात.पण मी घरची गृहिनी व तीच्या मुलांना आटोक्यात ठेवु शकत नाही.तीच्या कट-कटीचा आवाज , रस्तावरील जाणा-या-येणा-या व्यक्तिला ऐकु जातो.शेवटी रस्तावरिल व्यक्तिनां व वाहणांना आपले कान बंद ठेवावे लागते.

नौकर पती : अहो वाढती महांगाई बघुन मी एका सुर्पंखा शिक्षेकेशी लग्न केले. तीची सर्व कमाई ती आपले सौंदर्य वाढवण्यात खर्च करते .मी तीला नेहमी सांगतो की माणसाने नेहमी नैसर्गिक्च राहावे.पण ती माझे ऐकत नाही. शाळेतील विद्यार्थासारखे मला ती विद्यार्थी समजुन वागनुक देत आहे.तीच्या कट-कटी थांबवण्यासाठी मी तीचा आजीवन विद्यार्थी बनलो आहो.तरी तीची कट-कटी वाढतच आहे.

डॉक्टर पती: माझ्या कडे सकाळ पासुन तर रात्री पर्यंत सारखे रुग्न असतात. त्यांचा मी उत्तम इलाज करत असतो. मला कधी काही त्रास झला तर मी माझ्या पँथीचा इलाज नाहीं करु शकत. डॉकटरची पत्नि महणजे बिना डीग्रीची डॉकटर व होम एम.डी धारक असते. माझा नेहमीच घर-घुती उपचार करते. मला लपुन-छ्पुन तीचा उपचार, काढा वैगरे लंपास करवा लागतो.पण ती आजारी पडली तर आपले नुसके आपल्यावर वापरत नाही.ती शहरातील माझ्या पेक्षा गौण डॉक्टर तीचा उपचार करित असतो. तीला जर प्रश्न केला तर तीचे चोख उत्तर असते कि नाव्ही आपली स्वतः कटिंग करतो कां?.

ठाणेदार पति: एकदाची जर मी ठाणेदाराची वर्दी घातली,व आपल्या कर्तव्या वर निघालो की चांगल्या-वांगल्या, नावाजलेल्या गुंड्यांना मी मिनटात सरळ करुन वठणीवर आनतो.. ज्या शहरात मी असतो. तिथे गुंडा-गर्दी नसते. कारण मी ज्याण्याच्यां आधीच माझी किर्ती तीथे पोहचलेली असते.पण दुरदैवाने ही किर्ती अजुन पर्यंत घराच्या बाहरच भितीने उभी आहे. वर्दी पत्नि समोर कां काम करत नाही ?.याची खंत सारखी मनाला वाटत असते.

अभियंता पती: शहरातील कित्येक श्रीमंत मानसांचे मी घर बांधुन दिले आहे.शहरात माझी सर्वश्रेष्ठ अभियंता म्हणुन ओळख आहे.मझ्यां कडुन घर बांधुन घेण्यासाठी एक लंबी प्रतिक्षा सुची बनली आहे. घर बांधणारे माझ्या साठी दोन-तिन वर्षांची घर बांधनी साठी देवा सारखी वाट बघत असतात. पण माझी पत्नि रोज किचनचा ओटा असा पाहिजे होता,ती खिडकी इकडे पाहिजे होती. ते दार तसे पाहिजे होते. तीचे देव घर असे पाहिजे होते. घराचे सगळ अष्टकोणी वाटोळ करुन ठेवलं आहे. माहित नाही यांनी कोणी अभियंताची पदवी दिली. ही कट-कट केव्हा न संपणारी आहे.मला शंका येते कि अभियंता आमच्या पैकी कोण आहे ?.


अधिकारी : कार्यालत जशी माझी गाडी प्रवेश करते,सर्वत्र सन्नाटा पसरतो. सर्व पुरुष-महिला कर्मचारी नेहमी दहशत मध्ये असतात. कोनचे ही काम बहुतेक शिल्लक राहत नाही. कोणीही , कधीही माझ्याशी वाद-विवाद करण्याच्या बेतात नसतो.ज्याला जे सांगितले ते वेळेच्या आधीच पूर्ण करतो.पण हा सारा रुवाब फक्त माझा कार्यालयतच चालतो. आणी तो कार्यालतच वास्तव्य करतो.घरी आल्या वर मीच घरचा आदर्श कर्मचारी असतो. फ्क्त मला, एस मँडम शिवाय काहीच बोलता येत नाही. चुकले तर क्षमा मागावी लागते. अन्यथा कट-कटीचा सारका वर्षाव सुरुच असतो.


नेता पती: नेता आपल्या सगळे कार्यकर्ता व जनाधार टिकविण्या साठी अहोरात्र प्रयत्न करत असतो. पन तो आपल्या पत्नि साठी जगातील सर्वात मुर्खच प्राणी असतो. देशाच्या, राज्याच्या,जिल्हाच्या व गांवाच्या विकासाची जवाबदारी त्याची असते. व त्याला ते करण्यात आनंद पण मिळतो. एवढे चांगले काम करत असतांना त्याची मुर्खता सिध्द करण्याची कामगिरी मात्र घरची बाई करत असते . सारखी तीची कट-कट निकंमा पति म्हणुन असते.

कवीपती : समाजाला लिखाणा दवारा जाग़ृत,सतर्क,मार्ग दाखवण्याचे व आनंद ठेवण्याचे महान कार्य कवी करत असतो. असे म्हणतात, जीथे पोहचत नाही रवी ,तीथे पोहचतो कवी. सामान्य मानवाच्या डोक्यात ना येणा-या कल्पनांना तो सतत खत पाणी देत असतो.पणं त्याच्या पत्नीला त्याचे महत्व नसते.घरात कवीचे लक्ष्य कमी असते. फालतु, खटाळ,बेचव, बेढंग कल्पना करुन काही तरी बेढंग ओळी हा पागल कां लिहत बसतो याची सारखी ती कट-कट करत असते?.हा मुर्ख माझी तुलना कधी कोण्या चंदमुखी सोबत तर करत नाही. उलट माझी थट्टेने, किती सुंदर दिसते, जशी सुर्पंखा असा माझे वर्णन करत असतो. गाडव कुठला!.


लेखक पती : लेखकांच्या पत्नीला ही चिड असते की या मुर्खांने कधी माझ्या साठी प्रेमाच्या चार ओळी लिहल्या नाही.समाज, राजकिय परिवर्तन घडवुन आण्यासाठी मी लिहत असतो.घरात राहवुन अजुन पर्यंत पत्नीला काय हव, घरात कशे परिवर्तन करता येईल या मुर्खाला अजुन समजले नाही, आणी बघा चालले जग बदलविण्यासाठी.यांची तीची सारखी कट-कट असते.

वाहन चालक पती: जगातील सर्व लोकांची व सामाणाची उला-ढाल करणारा चालक पतीची पण काही विशेष त्याच्या पत्नी समोर किंमत नसते. नुसत्या बिना येसणच्या सांड्या सारखा इकडे-तिकडे नुसता भटकत असतो. कधी आपल्या परिवाराला फिरवले पाहिजे असे या गाढवाला कळत नाही.काम नसतांनाही नुसता पोंगा घरी व बाहेर वाजवत असतो. याची सारखी कट-कट तीची असते. कट-कटीचा तीच्या पोंगा वाजत असतांना माझा पोंगा कामच करत नाही.


गायक पती: सकाळ –संध्याकाळ नुसता ओरडा-वारड्त करत बसतो, मेला.कोना भवानी साठी रडतो काही सांगत नाही?. कसले सुर आणी राग काढतो माहित नाही. सुखी संसाराचे सुर अजुन या बेसु-या माणसाला कळले नाही.आणी म्हनतो मी जगाचे मनोरंजन करतो. जगाला सुखी करतो. इतक्या वर्षात पत्नीला तर सुखी केले नाही याची सारखी तीची कट-कट असते.तीची कट-कट माझे सुर बेसुर करत असते.

वैज्ञानिक पती : कसला हा वैज्ञानिक स्वतःला म्हनतो माहित नाही. अजुन पर्यंत पत्नीच्या मनाचा व इच्छंचा शोध या मुर्ख माणसालां लावता आला नाही.जगाला सुखी करन्यासाठी मी सारखे संशोधन करित असतो. असे नुसते सांगतो.ज्याला आपल्या पत्नीच्या भावणाचे संशोधन करता येत नाही, याची तीची सारखी कट-कट करत असतो. व ही कट-कटच माझी उर्जा नेहमी क्षीण करत असते.नाही तर मी आज आईस्टाईनच्या स्तराचा वैज्ञानिक असतो.


वकिल पती : मी जगातील नागरिकांना न्याय मिळवुन देण्याचे महान कार्य करत असतो.समाजात कुठेही अन्याय होता कामा नये. याची मी सारखी जवाबदारी घेत असतो. प्रत्येक माणसाने ,प्रत्येक माणसाशी माणसासारखे वागावे.कोणीही दुस-या माणसाच्या अत्याचाराला बळी पडु नये.देशात व जगात समता, न्याय , बंधुत्व व चांगुलापणाचे वातावरण असावे अशी माझी धडपड असते.घरच्या पत्नीला हे सर्व गाढव पणाचे वाटते. म्हणुन ती संतापाने म्हणते ,या गाढवाने अजुन पर्यंत घरांची जवाबदारी निभवली नाही. समानतेचा डंका वाजवनारा वकिल स्वतःच्या पत्नी व परिवारावर कडे लक्ष्य देत नाही. या अन्यायाची तीची सारखी कट-कट असते.


कोळीपती : नदी, नाले,समुद्रा वर मस्य पालन करुन , तडफणा-या मासे यांना फार मोठ्या जीवापार होनुन कौशल्याने पकडतो.त्यांची बाजारात नेवुन चांगली किंमत घेतो. मित्र मंडळी मला दर्यासारंग म्हनतात. पण घरची पत्नी चोविस तास मासोळी सारखी धाव-पळ करते. या वसाड्याच्या संसारासाठी ,काम करुन-करुन मासोळी पलीकडे तडफत असते. आणी तीच्या भावनांची या माणसाला काहीच किंमत राहत नाही. याची सारखी तीची कट-कट असते.

खाटिक पती : बक-या कोबंड्या, जसा निर्दयी पणाने कापत असतो. त्याला त्याचे काहीच वाटत नाही. तसास निर्दयी पणाने माझ्या भावनांची निर्दई पने सारखी हत्या करत असतो. असा हा भावनांचा हत्यारा महणुन नेहमी तीची कट-कट असते.


घर जवाई पति : या पतीची लग्नापासुन तर शेवटच्या घटके पर्यंत सारखी, अवहेलना, अपमानाची वाट लागलेली असते.पती कसा असावा याची जाण न त्याला,ना बायकोला व सासुला असते.तो नेहमी बायको व सासुच्या अत्याचा-याचा बकरा बनत असतो.सासरे पण या सजीव प्राण्यासाठी काहीच करु शकत नाही.त्याची पण अवस्था जवाया सारखीच केव्हाचीच झाली असते. ऐवढे सगळ सहन करुन ही त्याच्या बायकोची सारखी कट-कट चालुच असते. हा नवरा नसुन मागच्या जन्माचे पाप त्याला समजुन सारखी कट-कट चालुच असते.


       वरिल सर्व प्रसंगावरुन लक्षात येते की प्रत्येक पत्निला,तीच्या पतीचा जो व्यवसाय, हुनर, कौशल्य असते. ते मुळातच तीच्या कट-कटीचे मूळ कारण असते. म्हणुन या पुढे सर्व तरुनांनी लग्न करण्या आधी मल्टीटाक्सकिंग जीवेकेचा व्यवसाय असने जरुरी आहे. कारण तीला तुम्हचा व्यवसाय सोडुन इतर पतींचे व्यवसाय व हुनर, कौशल्य जास्त नाविन्य पूर्ण वाटते व तेच तीच्या कट-कटीचे मूळ कारन असते. म्हणुन तरुनांनी लग्न करण्या आधी मल्टीटाक्सकिंग असने जरुरी आहे. आत जे नाहीत त्यांच्या साठी सरकारने प्रक्षिशन शिबिर आयोजित करुन त्यांना मल्टीटाक्सकिंग बनवावे व कट-कटी सारख्या महामारी पासुन पतींचा बचाव कराव. अन्यथा ही महामरी कोरोना पेक्षा जास्त फैलाव करु शक्ते. व त्याचे परिणाम जगातील सर्वच पतींना अनंत काळ पर्यंत भोगावे लागतील.


      जगातील इतक्या महत्व पूर्ण लोकांच्या विषयी जर त्यांच्या पत्नीचे असे विचार व आचरण असेल तर यांची कल्पनाच करने कठीन आहे कि अन्य छुट-पुट व्यवसाई पतींची त्यांच्या पत्नी कडुन कशी भयंकर,वेदनादायक कट-कट होत असावी.


       मेळाव्याच्या अंतिम दिवसी जगातील सर्व प्रकारच्या पतींचे विचार, अनुभव तर्क व सुझावाचे विश्लेषन करण्यात आले होते. सर्वांनी आपले विचार फार सावधानीक पूर्वक व दूरदृष्टि ठेवुन मांडले होते. विशेषग्य समितीने नंतर एक मताने प्रस्ताव पारित केला होता.पत्नीच्या या अन्या विरुध्द लढा दिलाच पाहिजे. पत्नी शिवाय संसार करने प्रत्येक पतीला अवघड असते. पण याच्या गैर फायदा पत्नीने घेवु नये . यासाठी कायद्याची तरतुद असायला पाहिजे. खुप गहन ,सखोल, विचार व मंथना नंतर एकच उपाय सापडला होता. तो म्हणजे कट-कटी वर अंकुश लावने . यासठी जन प्रतिनिधीनां साक्षी ठेवुन प्रस्तावाचा मसोदा एक मताने पास करण्यात आला होता. क‌ट-कट करने हा प्रत्येक स्त्रीचा आनुवंशिक गुन आहे. तो प्रकृतिने तिला दिला आहे. आपन प्रकृतिच्या नियमा विरुध्द जावु शकत नाही. घरात तीचे वास्तविक सक्रिय योगदान असते यात कोणाचेही दुमत नाही. म्हणुन तीला पण घटनेने कर्तव्या सोबतच काही अधिकार दिले आहे. प्रकृतिच्या संविधानुसार क‌ट-कट हा तीचा मूलभूत अधिकारात येतो. म्हणुन हा अधिकार आपल्याला काढुन घेता येनार नाही. जर आपण असे कायदे पास जरी करुन घेतले, तरी उच्च नायालयात ते टिकणार नाही. म्हणुन समितीने तीच्या क‌ट-कटचा अधिकार कायम ठेवण्याचा निर्णय घेतल होता. पण तीला फ्क्त चोविस तासात, फ्क्त एकाच वेळेस केव्हाही, न थांबत क‌ट-कट करण्याचा अधिकार देण्यात आला. पण तीने याचे जर उल्लघन केले तर तीला कोणची शिक्षा द्यायची याचा विशेषाधिकार फक्त आणी फ्क्त शुध्दीवर असलेल्या पतीलाच देण्यात आला होत.


     वरील प्रस्तावांना समितीने एक मताने मंजुरी दिली. आता या मसोद्या वर मोहर लावुन अध्यक्षांची सही झाल्यावर याला मंजुरी साठी संसदेत पाठवण्याचे ठरवीले होते. सही साठी जसा हा प्रस्ताव अध्याक्षा समोर ठेवला जाणार होता,लगेच सर्वांना धक्का बसण्या सारखी बाब घडली. उपस्थित सांसद पळ काढुन निघाले. इकडे मेळ्याव्याचे अध्यक्ष मूर्छित होवुन खाली कोसळे होते. मंचावर एकदम अफरा-तफरी मचली होती. काही उपस्थित डॉकटरांच्या हे लक्ष्यात येताच त्यांनी अध्यक्षांची बारिक दखल वेळीच घेतल्याने ते शुध्दिवर आले .त्यांना शरबत वैगरे पाजुन पुनाः अध्यक्षस्थान देण्यात आले होते. आता स्वाक्षरी करण्या आधी त्यांनी सर्वांना विनंती केली की माझे आपण प्रथम अध्यक्षीय भाषण ऐकावे. व नंतरच मला यावर स्वाक्षीरी करण्यासाठी बाध्य करावे. कारण स्वाक्षरी केल्यावर सर्वात आधी या प्रकरणावर गृहिणीचा अणुबॉम हल्ला माझा वरच होणार आहे. आणी त्यातुन माझे प्राण जे तुम्ही आता वाचले ते मी नक्कीच गमावणार !. कृपया हे कवीता रुपी अध्यक्षीय भाषण एक दा तरी शांत पने ऐकावे. अशी मनपूर्वक सर्वांना आग्रहाची विनंती आहे. 


कटकट

सर्वंच पतींना पत्निची कटकट नको-नको सी वाटते,

पण प्रेमा करणा-या पत्निला ती हवी- हवी सी वाटते.

सर्व मनासारखे असतांना ती कटकट कां करते ?.

याचा खुलास कौनचीच पत्नि कधी करत नसते. 

कटकटीच्या अस्त्राने मर्दपणा ती मोजत असते,

पतीच्या प्रतिसादांचे मुल्यांकण ती करत असते.

म्हणुन जसे –जसे लग्नाचे वर्ष वाढत असते,

तस –तसा तीचा कटकटीचा अवधी वाढत जाते.

कटकट ही तीची आपली लिटमस टेस्ट असते,

पतीची मर्दांगीनीची पी. एच. सारखी ती मोजत असते.

तीच्या पतीची पी. एच, नेहमीच स्थिर असावी,

म्हणुन ती सारखी कटकटिची झड लावत असते.

हेच प्रेम करणा-या पत्निचे गुपित समजुन घ्यावे,

अधुन-मधुन सांडा सारखी हुलकावनी देत राहावे.

अशाने तीला तुम्हच्या नवरेपणाची जाण होते,

अजुन नवरा बैल झाला नाही याची खात्री होते.

तुम्ही एक्दाचे बैल झाले की तीचा आत्मविश्वास उठतो,

पी.एच स्थिर करण्यासाठी मग कटकटीचा डोज वाढवते,

कटकटिच्या गुंताडा अभियातुन तीला बाहेर कशे काढावे,

त्या साठी मुंगेरीलालचे स्वप्न तिला अधुन-मधुन दाखवावे.

कटकटीने पतीला लुप्त पावलेल्या प्रेमाचे आठवण होते,

जुन्या रेशीम गांठीनी तुम्हची पी. एच ती यथावत ठेवते. 


      कविता ऐकल्यावर सर्वांना आपल्या समोरचे भविष्य दिसत होते. म्हणुन सर्व मेळ्यावतीला सहभांगीनी पळ काढला होता. प्रस्तावाची तीथेच होळी पेटवली. व हे तर आमचे स्त्री न होण्याची मागच्या जन्मीचे पाप आहे. ते सर्व पतींना भोगावेच लागणार !


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy