विलंब
विलंब
आज मोगराचा डोळा लागला सकाळी सकाळी.. उठली तेव्हा साडेपाच वाजले होते.. तशी वैतागली.. बाजूलाच पहुडलेल्या विशावर म्हणजेच विश्वजितवर ओरडली.. तसा तो कुंभकर्णासारखा निश्चल राहिला.. मग तिने एक थंड पाण्याचा तांब्या डोक्यावर ओतला.. झटका लागल्यासारखा तो उठला.. चिडचिड करत आवरून बाहेर पडला.. नाव वल्हवायला लागला.. आज उशीरच झाला होता.. मासे पकडायला जाळं टाकणार इतक्यात दहा दिशांनी त्याला घेराव घातला गेला.. काळे कपडे, काळी रंगवलेली तोंडं, काळे हातमोजे, काळ्या टोप्या.. कोण होते ते सगळे? विशा घाबरला.. पण ओरडणार इतक्यात त्यातल्या एकाने विशाच्या मानेवर बंदूक रोखली आणि जीव घाबरेल इतक्या थंड आवाजात म्हणाला, "पहले ही बहुत देर हो गयी है.. अब बस जितना बोले उतना ही करो.. ज्यादा दिमाग खराब करोगे तो इधर ही उडा देंगे".. मग विशाने त्यांना तीन मोटरबोटींची व्यवस्था करून दिली आणि ते लोक निघून गेले.. भरधाव वेगाने त्या मोटारबोटी सुटल्या आणि तुफानासारख्या मुंबईच्या किनार्याला धडकल्या.. काळ्या गँगने पाण्यात उड्या घेतल्या आणि आपापल्या नियुक्त जागांवर दबा धरून बसले.. आज बोट उशीरा मिळाल्याने त्या आतंकवाद्याचा प्लॅन १ चौपट झाला होता.. किती गंभीर गोष्ट..
कधीकधी विलंब होण्यामागे नियतीचा खेळ वेगळाच असतो.. आपण काहीही मनसुबे आखले तरीही नियती मात्र तिचे फासे टाकते.. आज वाटतं खरंच ते आतंकवादी विलंब झाल्यामुळे परतले असते तर.. माझी मुंबई वाचली असती...
