सई कुलकर्णी

Inspirational

3  

सई कुलकर्णी

Inspirational

हवा विसावा क्षणभर

हवा विसावा क्षणभर

1 min
203


राघवला सकाळी रोजच्यासारखीच आई ओरडत होती, "राघू, उठ आता.. वाजले बघ किती".. पण राघवला काही कळत नव्हते.. 

तो शाळेत गेला.. बाई वर्गात आल्या आणि त्यांचा तोंडाचा पट्टा सुरू झाला, "राघव, केस का विंचरले नाहीत? बुटाच्या लेस का सुटल्या आहेत? गृहपाठ का केला नाही?......" पण राघवला काही कळत नव्हते.. 

रात्री वडील ओरडत होते, "राघव, बाईंनी परत मला शाळेत कशाला बोलवलय? आता काय दिवे लावलेत तू?" पण तरीही राघवला काही कळत नव्हते.. 


असाच होता राघव.. काहीही कळत नसे.. का? कोणी कधी जाणू घ्यायचा प्रयत्नच केला नाही.. 


मग एक दिवस शाळेत नेहा आली.. खरंतर स्कॉलरशिप परीक्षेत विद्यार्थ्यांना विशेष शिकवणी द्यायला म्हणून.. पण तिने राघवला बघताक्षणीच ओळखले की तो ऑटीस्टिक आहे.. नेहाचं स्पेशलायझेशन याच विषयात तर होतं.. 

राघवला तर देवानेच जणू मदत पाठवली होती.. अडाणी आई-वडील आणि सरकारी शाळेतले ढुंकूनही न बघणारे शिक्षक यांच्यात त्याचा गोंधळ कित्येक पटींनी वाढायचा.. पण नेहा ताईने मुख्याध्यापकांची रीतसर परवानगी काढून राघवला स्वावलंबी बनवायचा विडाच उचलला.. पैशांपेक्षाही ते एक महत्त्वपूर्ण मिशन होतं तिच्यासाठी.. आणि राघवसाठी नेहा ताई म्हणजे आतापर्यंत सतत वाटणारी "हवा विसावा क्षणभर" ही फालींग.. नेटाने तिचं मिशन नेटाने पूर्ण केलं.. राघव स्वतःच्या पायांवर उभा राहिला.. आज राघव कोट्यवधींची उलाढाल करणार्‍या आंतरराष्ट्रीय कंपनीचा मालक आहे.. पण नेहा ताईला विसरलेला नाही.. 


त्याच्या कंपनीने सी.एस्.आर. या तत्त्वाखाली समाजकार्य म्हणून ऑटीस्टिक मुलांसाठी एक संस्था स्थापन केली.. ही संस्था दुर्गम भागात, खेडोपाडीही कार्यरत आहे.. राघवने तिचं नाव ठेवलंय "हवा विसावा क्षणभर"... 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational