सई कुलकर्णी

Inspirational Others

4  

सई कुलकर्णी

Inspirational Others

मंथन भाग ४

मंथन भाग ४

5 mins
254


भाग ४


      दानिशला आधीच खूप काम असायचं.. त्याच्या कंपनीचा विस्तार आशिया, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया खंडांमधे झाला होता.. त्यात आता कंपनीच्या चेअरमनचं नवीन येऊ घातलेल्या कोरोनाने अकाली निधन झाल्याने जास्तीचा भार दानिशवर पडत होता.. तो कंपनीच्या कामात आकंठ बुडून गेला होता.. मग आजी-आजोबांनी मुलांची सगळी जबाबदारी उचलली.. नॅनी हाताशी होतीच.. तीही लाघवी स्वभावाची.. संकोच, कुरबूर, कटकट न करता ती वाट्टेल ते आणि पडेल ते काम करायची.. आता तर ते सगळेच जवळ, अगदी नजरेसमोर होते.. वेगळंच चैतन्य संचारलं होतं आई बाबांच्या अंगात.. दहा हत्तींचं बळ आलं होतं जणू.. सगळेच एकमेकांना भेटून सुखावले होते.. विदिशाशिवाय काही फार समाधान नव्हतं पण एकमेकांना धीर देत होते..

     आजोबा चिमुकल्यांना रोज घराबाहेर स्वतः फुलवलेल्या बागेत घेऊन जायचे.. झाडं-फुलं दाखवायचे.. गप्पा मारायचे.. नवीन गोष्टी सांगायचे.. रोज काहीतरी शिकवायचे.. मुलंही कुतुहलाने प्रश्न विचारायची.. आजीही मुलांना देवपूजेत सामील करून घ्यायची आणि खूप बोलायची.. मग मुलंही मोकळेपणाने बडबड करायची.. बागेतली फुलं आणि मुलं, फुलायला लागली होती.. बहरायला लागली होती.. त्यांच्यात खूप विकास जाणवत होता.. छोटी कळी उमलण्यापासून फळं धरेपर्यंत सगळं मुलं आजोबांबरोबर बघायची.. त्यांना गंमत वाटायची.. सगळ्याच परिस्थितीत सुधारणा आल्यामुळे दानिशही निर्धास्त होता..

     एक दिवस सगळीकडे लाॅकडाऊन घोषित झाला.. हळूहळू संपूर्ण जग ठप्प होत होतं.. दानिश आणि मुलंही इथे अडकून पडले.. दानिशचं काम तर जोरदार चालू होतं.. आता मुलांच्या शाळाही ऑनलाईन चालू झाल्या होत्या.. मुलं आणि आजी-आजोबा असं छान समीकरण तयार झालं.. मुलं सगळं स्वतःचं स्वतः करायला शिकली.. रोज बागेत जाणं चालूच होतं.. मुलांचा हट्टीपणा, चिडचिड आणि एकटेपणा दूर झाल्याने दोघं खूष होती.. निसर्गाच्या आणि प्रेमाच्या माणसांच्या सान्निध्यात खुलली.. दानिश मुलांच्या प्रगतीवर खूष होता.. आजी-आजोबांच्याही विदिशाच्या जाण्याच्या दुःखावर मुलांच्या निरागस हास्याने खपली धरायला सुरूवात झाली होती.. मुलांच्या संगोपनाचा; विदिशाच्या नसण्याच्या दुःखाचा आणि सगळ्यांचा एकत्र राहण्याचा प्रश्न निसर्गानेच किती सहजपणे सोडवला होता.. चमत्कारच एक..

    एक दिवस ईव्हा तिची मॉर्निंग प्रेयर संपवून चर्चमधून घरी येत होती.. तेव्हा तिला बाबा बाहेर बागेत एकटेच बसलेले दिसले.. तिने गुड मॉर्निंग म्हटलं तरी त्यांनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही.. तिने विचारलं "अंकल डिड यू हॅव टी?".. पण पुन्हा तेच.. काहीतरी विचारात असतील म्हणून ईव्हा घरात निघून गेली.. असच काहीसं ईव्हाने पुढचे दोन दिवस अनुभवलं.. बाबा हरवलेले असायचे.. एकटेच विचारात गढलेले असायचे.. साध्या प्रश्नांची उत्तरंही द्यायचं भान त्यांना रहायचं नाही.. जरा जोरात आवाज दिला किंवा हलवलं की खूप दचकायचे.. दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी ही गोष्ट काही केल्या ईव्हाच्या डोक्यातून जाईना.. तिला बाबांची काळजी वाटायला लागली होती.. त्यांना काही होत असेल का? कसली काळजी लागली असेल का? विदीशाची आठवण सतावत असेल का? मायरा - विहानची चिंता लागली असेल का? ईव्हाला सुचेनासं झालं होतं.. मानवी मन कसं असतं ना.. एखाद्याला आपलं मानलं की त्याची काळजी वाटणे, त्याची सुखं-दुःख अनुभवणे, त्याला साथ द्यावीशी वाटणे, वगैरे गोष्टी आपसूकच घडत जातात.. ईव्हाला बाबांची मदत करायची होती.. पण कशी ते समजत नव्हतं..

    नेमका तेव्हाच दानिश मुलांना घेऊन चार दिवस दिल्लीला गेला होता.. त्याच्या मम्मा - डॅडना भेटायला.. ते दोघंही मायरा आणि विहानला बघून खूप गहिवरले.. विदीशा जाण्याचं तर त्यांना दुःख होतच पण त्याहून जास्त वाईट या पोरक्या जीवांकडे बघून वाटायचं.. विदीशावर त्यांचाही खूप जीव होता.. तिच्या अकस्मात जाण्याने तेही हादरले होते.. त्यांना सतत दानिश आणि मुलांची काळजी वाटायची..

"अरे मम्मा, अंदर आ जाईये.." बेडरूममधे डोकावणार्‍या मम्माला दानिश म्हणाला तशी ती खजिल होऊन आत आली..

"कैसा है बेटा?" मम्मा

"आप कितनी चिंता करते हो.. मै सही मे ठीक हू मम्मा.." दानिश

"बच्चे कितने भी बडे हो जाए दानिश, लेकिन एक मा के लिये तो बच्चे ही रहते है.. तेरी आंखोमे मुझे विदीशा बिटीया दिखती है.. कुछ बाते किस्मत नही बदल सकती.. कुछ चीजे मै भी नही बदल सकती.. लेकिन मुझे भी तुम्हारी चिंता सताती रहती है.. आखिर तेरी मा हू मै.. रात रात भर नींद नही आती मुझे.. तू कैसा होगा? बच्चे कैसे होंगे? खाना खाया होगा ना? बच्चोंकोभी तो विदीशा की बहुत याद आती होगी.. बस वो बयान नही कर सकते.. मै इन सारे मामलोमे ज्यादा कुछ कर भी तो नही सकती.. ईश्वर पर भरोसा रखो बेटा.. अगर तुम हिम्मत हार जाओगे तो बच्चे किसके सहारे जियेंगे? एक तुम ही उनकी इकलौती उम्मीद हो.. कभीभी अपना हौसला टूटने मत देना.. छोटी से छोटी किसी भी चीज की जरूरत हो तो मै और तेरे डॅडी हमेशा तेरे पीछे खडे है ये बात याद रखना.. मुझे जितना अपनी पर्वरीशपर भरोसा है उससे भी ज्यादा तुमपर नाज है बेटा.. विदिशाको तो हम भी नही भुला पा रहे है.. मगर हमे जीना होगा ना.. बच्चोंके खातिर.. उनके भविष्य के खातिर.." मम्मा

"मम्मा मै दूसरी शादी के बारेमे सोच भी नही सकता.." दानिश

"दानिश मैने कब ऐसा कहा?" मम्मा

"आपका मतलब तो वही इशारा कर रहा है ना.." दानिश

"दानिश बेटा, आजतक मैने तुम्हारे मर्जी के विरूद्ध कुछ किया है जो अब करूंगी? मै तो बस तुम्हे तसल्ली दे रही थी.." मम्मा

"सॉरी मम्मा, वो लोग जनरली ऐसे सुझाव देते रहते है तो मुझे लगा कही आप भी.." दानिश

"नही बेटा.. मै बस तेरी खुशी और बच्चोंकी सलामती की दुआ करती रहती हू.." मम्मा

पुढचा एक तास दानिश मम्माच्या मांडीत डोकं ठेऊन ती शांतता अनुभवत होता जी जगात कुठेच मिळत नाही.. मम्मा पण दानिशला लहानपणी करायची तशीच थोपटत बसली होती.. दोघांच्या डोळ्यासमोर होता फक्त विदीशाचा चेहरा.. पण आता दानिश मम्माशी बोलल्यामुळे बराच शांत झाला.. आता त्याला विदीशासाठी बरच काही करायचं होतं.. ती जिथे आहे तिथे तिला आनंदी बघण्यासाठी..


.............................. चार दिवस दानिश नसताना मात्र ईव्हाचं बाबांवर लक्ष ठेवणं चालूच होतं.. तिला असं काहीतरी समजतं जे सर्वांचच आयुष्य बदलवून टाकणार आहे.. त्यातून ती काय मार्ग काढते? आणि ते दानिशला कळणार का? दानिश दिल्लीत असताना तिथेही काहीतरी विपरीत घडतय.. ते दानिशपर्य॔त पोचतं.. त्याचाही सामना दानिशला करायचाय.. या दोन्ही पेचांमधून दानिश कसा सुटतो आणि त्यासाठी काय करतो? ईव्हा काय करते? सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे पात्रांच्या आयुष्याचं मंथन चालू आहे.. विधिलिखित.. त्याचा नेम कसा चुकेल.. पण तो विधाता काय करतो, हेही बघण्यासारखं आहे.. वाचत रहा...................................


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational