सई कुलकर्णी

Romance Inspirational

3  

सई कुलकर्णी

Romance Inspirational

मंथन - भाग २

मंथन - भाग २

4 mins
265


      मायरा आणि विहान.. विदीशा आणि दानिशची दोन गोंडस मुलं.. विदीशा लहानग्या विहानच्या जन्मानंतर दोनच महिन्यात त्यांना सोडून देवाघरी गेली.. दहा महिन्याच्या इवल्याशा विहानला आणि अडीच वर्षाच्या मायराला दानिश तेव्हापासूनच एकटाच सांभाळत होता.. आई-बाबा दोघांचं प्रेम देण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता.. पिल्लंही तशी समजूतदार होती.. पण शेवटी आईसाठी आसुसलेली होती.. बर्‍याच वेळा दानिशला अपूर्णतेची जाणीव व्हायचीच.. रोज दिवस कसाबसा सरायचा.. ऑफिसची कामं, डेली रुटीन, मुलांचा अभ्यास, वगैरे.. पण रात्र खायला उठायची.. विदीशाशिवाय जगणं खूप कठीण होत होतं.. मुलांकडे बघून दानिश रोज नव्या जोमाने कामाला लागायचा.. दानिशने सहाय्य करायला एक नॅनी ठेवली होती..


     नॅनी म्हणजे ईव्हा नावाची साठीतली आजी.. खूप प्रेमळ, पटकन आपलसं करणारी, अतिशय बोलकी, मायरा आणि विहानला खूप माया करणारी.. तिला स्वतःचं म्हणावं असं कुटुंब नव्हतं.. मग ती पण दानिशला मुलाप्रमाणे आणि छोट्या पिल्लांना नातवंडाप्रमाणे वागवायची.. दानिशही तिचा आईचा करावा अगदी तसाच सांभाळ करायचा.. ईव्हाला त्याने स्वतंत्र बॅन्क अकाऊंट आणि क्रेडिट कार्ड दिलं होतं.. त्यांच्या नात्यात पारदर्शकता आणि विश्वास होता.. विदीशाच्या जाण्याचं दानिश इतकच किंबहुना काकणभर जास्तच दुःख ईव्हाला झालं होतं.. नॅनी आणि विदीशाचं नातं तर निव्वळ शब्दांच्या पलीकडचं होतं.. एकमेकींवर त्यांचा खूप जीव होता..विदीशाने कधीच नॅनीला दुय्यम वागणूक दिली नाही.. नेहमी एका कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवलं..


     एका मोठ्या आंतरराष्ट्रीय मीडिया कंपनीचं सी.ई.ओ. पद आणि दोन पोरक्या चिवचिवत्या जीवांमधे दानिश पुरता दमून जायचा.. कधीतरी चिडचिडही व्हायची.. पण मग मुलं घाबरायची.. सोबतीला नॅनी होतीच.. पण दानिशच्या बिझी शेड्युलमुळे मुलांना बाबा हवा तेवढा मिळत नव्हता.. कारण ते निरागस जीव दानिशमधेच विदीशालाही शोधायचे.. दानिशला मात्र विदीशा जाण्याचं दुःखही कुरवाळत बसायची फुरसत नव्हती.. वाढत्या तणावामुळे दानिशच्या आयुष्यातला गुंता वाढायला लागला होता.. ही परिस्थिती हेरून विदिशाच्या वडिलांनी दानिशला थोडे दिवस आपल्याकडे रहायला बोलावलं.. मग दोन मुलं आणि नॅनी यांना घेऊन लंडनहून दानिश भारतात दाखल झाला.. विदिशासोबत लग्न झाल्यानंतर तसा तो पहिल्यांदाच पुण्याला आला होता..


     विदिशा ही विनय आणि विभा आपटे यांची एकुलती एक मुलगी.. अत्यंत मोकळ्या, सुशिक्षित, उच्च विचारसरणीत वाढलेली.. आई एका धनाढ्य शेतकऱ्याची मुलगी तरी स्वकष्टांवर पी.एच्.डी. प्रोफेसर आणि वडील आय.ए.एस्. ऑफिसर.. विदीशाची स्वतःची आर्किटेक्चर फर्म यशाकडे वाटचाल करत होती.. विदीशा हुशार तरीही नम्र होती, बोलकी तरीही शांतपणे सगळं हाताळणारी होती, चॅलेंजेसना अजिबात न घाबरणारी होती.. तिची स्वबळावर मोठं होण्याची स्वप्नं होती.. स्वतःची फर्म आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायची होती.. ती दिसायला सुंदर, वागायला बोलायला गोड, समोरच्याला पटकन आपलसं करणारी होती..


     तसाच दानिश खन्ना हा आरती आणि दलबीर खन्ना यांचा मुलगा, पाच भावांत सर्वात धाकटा.. अत्यंत धनाढ्य खन्ना कुटुंबात कशाचीच कमतरता नव्हती.. फॅमिली बिझनेस, गाड्या घोडे, आलिशान बंगले, नोकर-चाकर, परदेशी दौरे, वगैरे एकदम फिल्मी स्टाईल.. फरक एवढाच होता की दानिशच्या खापर पणजोबांपासून सगळ्यांनी मान मोडेस्तोवर कष्ट घेऊन हा डोलारा उभारला होता.. फॅमिली ट्रॅडिशननुसार प्रत्येक मुलाला स्वतंत्र नोकरी किंवा बिझनेस करून दहा वर्षांत स्वतःला सिद्ध करावं लागायचं.. तसाच दानिशही स्वतःच्या क्वालिफिकेशन आणि कॅलिबरच्या जोरावर चेअरमन पदापर्यंत पोचणार होता.. दानिशचे सर्व मोठे भाऊ परदेशात स्थित होऊन फॅमिली बिझनेस पुढे चालवत होते.. आई वडील दिल्लीत राहत आणि प्रत्येक मुलाला वर्षाकाठी एक भेट देत..


    दानिश लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या पोस्ट ग्रॅज्युएशनचा गोल्ड मेडलिस्ट होता.. तो त्याच्या ज्युनियर विदिशाच्या प्रेमात पडला आणि त्यांचे लग्न होऊन पाच वर्ष॔ झाली होती.. पण विधात्याचा नियम कुणाला चुकलाय.. विदीशाला ब्रेन ट्युमर डिटेक्ट झाला.. आणि अक्षरशः एका वर्षातच खेळ संपला.. विदीशाचं जाणं सगळ्यांनाच चटका लावून गेलं.. विशेषतः दानिश खूप एकटा पडला होता.. आयुष्य ढकलत होता, जगत नव्हता.. त्याचा श्वास तर चालू होता पण मनाने विदीशाचं जाणं ॲक्सेप्ट केलं नव्हतं.. तसं मोकळं व्हायला त्याच्याजवळ कुणीच नव्हतं..

     "ये, ये, दानिश.. अरे किती वर्षं लावलीस आपल्याच घरी यायला.. आम्हाला किती बरं वाटतय तुला बघून.. पिल्लांना बघायला तर डोळे तरसले होते रे.." बाबा

    "अहो त्यांना आत तर येऊ दे.. तुम्ही तर दारातच सुरू झालात.. दानिश, ये रे बाळा.. यांचं असच सुरू असतं.. तू लक्ष देऊ नकोस.." आई

    "आई, हाऊ कॅन यू से दॅट.. बाबा इज ॲब्सल्युटली राईट.. मुझे भी घर की कमी महसूस हो रही थी.. बाबा, सॉरी.. आय नो, आय शुड हॅव कम मोअर ऑफन.. बट अब आ गया हू.. लेट्स हॅव अ गुड टाईम.. एस्पेशियली मायरा और विहानको आपकी बहुत जरूरत है.. आय ऑलवेज ट्राय टू गिव्ह देम माय बेस्ट.. पर मै अकेला काफी नही है और मुझे वक्त भी कम मिलता है.. ऑफिस रिस्पॉन्सिबिलिटीजमे उलझा रहता हू.."

    "आई - बाबा म्हणतोस ना.. मग चिंता सोडायची आता कायमची.. काय? आम्ही कशाला आहोत.." बाबा

    "आणि हो, स्वतःकडे बघ जरा.. किती वाळलायस.. ते काही नाही.. घरचं तूप आणि माझा स्वयंपाक.. मीच बघते नीट आता तुझ्याकडे.." आई..


     आई - बाबांच्या या बोलण्यावर दानिशला भरून आलं पण त्याने अश्रूंवर ताबा ठेवला.. जुन्या आठवणींच्या गाठोड्याची गाठ सुटली.. दानिशला जबाबदाऱ्या वाटून घेणारी आपली माणसं आणि मोकळं बोलायला उद्युक्त करणारी आपुलकीची थाप पाठीवर मिळाली.. मुलंही आजी-आजोबांबरोबर रमली.. आईविना पोरके ते कोमल जीव मायेच्या स्पर्शात चिंब निथळले.. बदल मिळाल्याने सगळ्यांनाच ताजंतवानं तरतरीत वाटायला लागलं होतं.. विदिशाच्या आई वडिलांनाही अजून काय हवं होतं.. त्यांनी एकुलती एक तरणीताठी मुलगी गमावली होती.. दुःख तर सलत होतं, बोचत होतं, जगू देत नव्हतं.. पण हार मानून चालणार नव्हतं.. त्यांनी जगण्याची उमेद दानिश आणि चिमुकल्यांकडे बघून तेवत ठेवली होती..


दानिश भारतात येऊन सुखावला.. विदिशाशिवाय अपूर्णच होता पण आता आधाराला त्याच्यासोबत आई बाबा होते.. मुलंही बरीच स्थिरावली.. पण विदिशाच्या वडिलांना कसली तरी काळजी वाटत होती.. काहीतरी होतं जे त्यांना सतत बोचत होतं पण ओठांवर येत नव्हतं.. ते एकटेच बसायचे.. खूप विचार करायचे.. शून्यात नजर खिळवायचे.. घरातल्यांपासून काहीतरी लपवायचे.. पण काय? आणि का? एक दिवस त्यांचं हे गुपित घरात कोणाला तरी कळलं..

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance