सई कुलकर्णी

Others

3  

सई कुलकर्णी

Others

मंथन भाग ६

मंथन भाग ६

5 mins
178


भाग ६

    बाबा काय करतात, कुठे जातात, कुणाशी बोलतात सगळं ईव्हा बघत होती.. तिचं त्यांच्यावर बारीक लक्ष होतं.. एकदा दुपारी सगळे झोपलेले असताना बाबा त्यांच्या खोलीतून हळूच बाहेर पडले आणि मेन गेटमधून बाहेर पडले.. ईव्हा पण दबक्या पावलांनी त्यांच्या मागे गेली.. बाबा कुणाशीतरी फोनवर बोलत होते..

"हो हो.. माझा ई-मेल आयडी मी फॉर्ममधे लिहीला होता तोच चालू आहे.." बाबा..

"...... समोरची व्यक्ती......."

"बर मी रिपोर्ट्स बघतो संध्याकाळी.. थॅन्क यू.." बाबा..

ईव्हा झाडामागे लपून त्यांचं बोलणं ऐकत होती.. तिने बाबांच्या चेहर्‍यावर पसरलेलं चिंतेचं जाळं बरोबर हेरलं होतं.. आता मात्र ती या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय गप्प बसणार नव्हती.. संध्याकाळी ती काहीतरी कारण काढून बाबांच्या खोलीतच थांबली.. आई स्वयंपाकघरात होत्या..

"बाबा, धिस कपबर्ड नीड्स क्लीनींग.. आय विल क्लीन इट.. प्लीज टेल मी इफ यू नीड एनीथींग.." ईव्हा

पण अपेक्षेप्रमाणे बाबा काहीच बोलले नाहीत.. तसं ईव्हाकडे त्यांचं लक्षच नव्हतं.. आणि याचाच फायदा घ्यायचं ईव्हाने ठरवलं.. बाबा त्यांचा ई-मेल चेक करत होते.. ईव्हा एका डोळ्याने कंप्युटर स्क्रीनकडेच बघत होती.. रिपोर्ट उघडला.. ईव्हाला काही कळत नव्हतं.. मेडिकल टर्मस् तिच्या डोक्यावरून जात होत्या.. पण तिने जिद्द सोडली नाही.. सर्वात शेवटचं पेज ओपन झालं आणि तिथे लाल बोल्ड अक्षरात लिहीलं होतं.... विभा आपटे - कॅन्सर पॉझिटिव्ह..

    बाबा तर स्तब्ध झालेच पण ईव्हासुद्धा जागीच खिळली.. तिच्या तोंडून शब्दच फुटेनात.. ती आहे तिथेच मटकन् बसली.. बाबा तर हलतच नव्हते.. जणू त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली होती.. असाच अंदाजे एक तास गेला असेल.. ईव्हाने बाबांच्या खांद्यावर हात ठेवला तसं त्यांनी तिच्याकडे बघितलं.. तिने चहाचा कप त्यांना दिला आणि म्हणाली, "बाबा आय रेड द रिपोर्ट्स.. बट फर्स्ट प्लीज हॅव सम टी.." तिने त्यांना चहा घ्यायलाच लावला.. बाबांना थोडसं बरं वाटलं तसं ते म्हणाले, "ईव्हा मी काय करू? मलाच कळत नाहीये.. आधीच विदीशाला गमावलय मी.. त्यातून अजून उभाही राहिलो नाही तर हे.. आता विभा माझ्या जगण्याचा एकमेव आधार आहे.. मी तिला तरी हे कसं सांगणार आहे मलाच कळेनासं झालय.. मलाच ॲक्सेप्ट करता येत नाहीये, ती कसं करेल? आणि दानिश आधीच बिचारा आमच्यावर अवलंबून आहे.. ती चिल्लीपिल्ली.. त्यांचं कसं होणार?.."

"बाबा, बाबा, प्लीज, कीप काल्म.. आय थिंक यू आर वरीड अबाऊट एव्हरीथिंग ॲट द सेम टाईम.. डोन्ट वरी.. दानिश ॲन्ड आय आर विथ यू.. डोन्ट वरी अबाऊट मायरा ॲन्ड विहान.. दे आर माय रिस्पॉन्सिबिलीटी.. जस्ट रिलॅक्स.. वी विल टॉक टू दानिश व्हेन ही इज बॅक ॲन्ड डिसाईड हाऊ टू टॉक टू आई.. बाबा वुई ऑल आर वन फॅमिली.." ईव्हा

     ईव्हाच्या बराच वेळ समजावण्यामुळे बाबा थोडे शांत झाले.. त्यांची काळजी काही मिटली नव्हती पण आता निदान स्थिर मनाने ते विचार करू लागले होते.. विदीशाच्या आईला लंग कॅन्सर डिटेक्ट झाला होता.. तोही शेवटच्या स्टेजमधला.. रिपोर्ट्स आले होते.. पण विदिशाच्या वडिलांना कळतच नव्हतं कसं रियॅक्ट व्हावं.. विदीशाच्या आईला, दानिशला कसं सांगावं आणि एकूणच ही परिस्थिती कशी हाताळावी.. आणि त्यांची सगळ्यात मोठी भीती तर ही होती की जर ते एकटे राहिले तर.. काय? त्यांच्यासमोर होता एक खूप मोठा यक्षप्रश्न..

     दानिश दिल्लीहून परत आल्यावर ईव्हाने आईंच्या कॅन्सर निदानाबद्दल त्याला सांगितलं.. दानिशला खूप वाईट वाटलं पण त्याने परिस्थितीचा सामना करायचा ठरवलं.. त्याने बाबांना खूप समजावलं.. बाबांचं आता वय झालं होतं.. त्यातून त्यांनी विदीशालाही गमावलं होतं.. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी परत खंबीर होण्याची अपेक्षा दानिशने ठेवली नव्हती.. पण विदिशासाठी त्याने बाबांना पुन्हा उभं करायचं ठरवलं.. त्याला आधी बाबा आणि ईव्हाला सोबत घेऊन आईंशी बोलायचं होतं.. त्याप्रमाणे सगळे आईंशी व्यवस्थित बोलले.. खासकरून दानिशने "मी आहे" अशा शब्दांत आश्वस्त केल्यामुळे आई बरीच सावरली.. दानिशने ताबडतोब त्याच्या कंपनीत चौकशी केली.. कंपनीच्या पॉलिसीनुसार एखाद्या एम्प्लॉईच्या आप्तेष्टांना जर कॅन्सरचे निदान झाले तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी लागणारी सर्व इत्यंभूत माहिती कंपनी पुरवणार होती.. तसच होणारा खर्चही कंपनी वाटून घेणार होती.. त्यानुसार दानिशने सेकंड ओपिनियन घेतलं, सर्वात बेस्ट ट्रीटमेंट मिळावी म्हणून कॅलिफोर्नियातील हॉस्पिटल्सशी ईमेल्स आणि फोनकॉल्स द्वारे संपर्क साधला.. दोन महिन्यात ईव्हा आईला घेऊन तिथे दाखल झाली.. कॅलिफोर्नियातील सर्वोत्कृष्ट "कॅफा - कॅन्सर फायटर्स" सेंटरमधे आईची ट्रीटमेंट करायची ठरवली.. ईथे भारतात बाबा आणि मुलांची जबाबदारी दानिशने उचलली.. मुलंही आता बरीच स्वतंत्र झाली होती.. आईविनाही आता खूप समंजस झाली होती..

     ठरल्याप्रमाणे आई आणि ईव्हा कॅलिफोर्नियात पोचल्या.. दानिशने त्या दोघींची उत्तम सोय केली होती.. रहायला घर तेही हॉस्पिटलपासून फक्त पाच मिनिटांवर, कॅलिफोर्नियातील एकूण एक नकाशे, वापरायला चार मोबाईल्स, ड्रायव्हरसकट दोन गाड्या आणि बरच काही.. अगदी कशाचीही कमतरता भासू नये याची पुरेपूर दक्षता घेतली होती.. मग ट्रीटमेंट सेंटरमधे जाण्याचा तो पहिला दिवस उगवलाच..

     मंडे मॉर्निंग.. आई आणि ईव्हा वेळेच्या आधीच पोचल्या.. रिसेप्शनीस्टने त्यांना टेन्थ फ्लोअरवर जायला सांगितलं.. आई आणि ईव्हाने लिफ्टमधून बाहेर पाऊल ठेवताच त्यांना पहिला आश्चर्याचा धक्का बसला.. एका कॅन्सर ट्रीटमेंट हॉस्पिटलमधे अपेक्षित अशी भयाणशांतता नव्हती.. सगळ्या भिंती अत्यंत सुंदर चित्रांनी बोलक्या केल्या होत्या.. सुमधूर संगीत कानांना रिझवत होतं.. छोटसं कारंजं तर मुख्य आकर्षण होतं.. तेवढ्यात एकाने "एली" अशी हाक मारली आणि म्हणाला "गॅदर एव्हरीबडी.. फास्ट".. मग त्यांची पूर्ण टोळी आली.. डोक्याला टक्कल, फिक्कट हिरवे गणवेश, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं, सुकलेले ओठ, ताणलेले चेहरे.. तरीही वय लपत नव्हतं.. ४ ते १५ वयोगटातील ते कॅन्सरग्रस्त कोमल जीव.. काचेच्या बिल्डिंगला बाहेरून साफ करायला दर आठवड्याप्रमाणे स्टीफन येत असे आणि मुलांची करमणूक करत असे.. त्या मुलांच्या आयुष्यात चार आनंदाचे क्षण फुलवायचं जणू त्याचं उद्दिष्ट होतं.. मुलं खूष होत आणि त्यांना केमो सुसह्य होत असे.. असा प्रत्येक सोमवार त्या मुलांसाठी मनासारखा एक दिवस असायचा.. आई आणि ईव्हाला खूप वाईट वाटत होतं.. पण ती मुलं मात्र आईपाशी आली.. हॅलो म्हणाली.. नावं सांगितली.. आईंना पटकन विदीशा आठवली.. त्या थोड्या भावनाशील झाल्या..

     'माझी विदीशा.. कशी शेवटी मृत्यूशी झुंजली असेल.. मुलांना आणि दानिशला गमवायच्या विचाराने हतबल झाली असेल.. त्या विधात्यालाही दया नाहीच आली का? मला तरी न्यायचं होतं..' पण पुढच्याच क्षणी आई सावरल्या..

"या मुलांकडून किती शिकण्यासारखं आहे.." आई

"येस अफ कोर्स.." ईव्हा

आता आईंचं उद्दिष्ट ठरलं होतं.. 


........................ कॅफा सेंटरमधे आईचा पहिला दिवस तर सकारात्मक गेला.. पण पुढे काय वाढून ठेवलय, देवालाच माहीत.. भारतात राहून दानिशने बाबा आणि मुलांची जबाबदारी घेतली आहे खरी.. पण तो ती निभावू शकणार का? त्याच्याही आयुष्यात एका वादळाची चाहूल लागत आहे.. निष्णात युद्धासारखा तो त्याला सामोरं जातो की आयुधं टाकून हार पत्करतो.. पाहूया पुढे.. वाचत रहा.. असेच प्रतिसाद देत रहा...............................


Rate this content
Log in