Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

सई कुलकर्णी

Romance Others


3  

सई कुलकर्णी

Romance Others


मंथन भाग ५

मंथन भाग ५

5 mins 200 5 mins 200

   आज दानिशची सगळ्या बिझनेस हेड्सबरोबर मोठी मीटिंग होती.. ॲक्टिंग चेअरमन म्हणून पहिलीच.. त्यामुळे त्याच्यावर खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती.. दुपारी तीन वाजता मीटिंग सुरू झाली म्हणजेच लंडनमधील सकाळचे साडेदहा.. "गुड मॉर्निंग एव्हरीबडी.." आणि मीटिंग एकदम धडाक्यात सुरू झाली.. सर्वप्रथम एकमेकांची ओळख असली तरी औपचारिकरित्या दानिशने ओळख परेड घेतली.. खासकरून नवीन जॉईन केलेल्यांसाठी.. त्याला वाटायचं हे गरजेचं असतं.. मग त्याने प्रत्येक बिझनेस हेडच्या कामाचा आढावा घेतला.. जगात कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीची जाणीव करून दिली.. त्यातच कंपनीच्या चेअरमनचं अकाली निधन झाल्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली आणि कंपनी त्यांच्या कुटुंबाला पूर्ण सहाय्य करणार असल्याची ग्वाही दिली.. कंपनी एकाही एम्प्लॉईला काढणार नसल्याची हमी दिली.. रिझाईन्ड हेड्सना कर्टसी मेसेजेस पाठवायची सूचना रायनाला, म्हणजे सेक्रेटरीला दिली.. आणि मग मीटिंगमधे बजेट डिस्कशन, नवीन टार्गेट्स, नवीन आयडियाज, मर्जर्स ॲक्विझिशन्स, ऑडिट कंम्प्लायन्स, एक्सपान्शन्स आणि बरच काही चालू राहिलं..

     मीटिंग जवळपास ५ तास चालली.. पण सरतेशेवटी सगळे समाधानी होते.. संपूर्ण मॅनेजमेंट दानिशला चेअरमन घोषित करायला उत्सुक होते.. कारण आज दानिशने त्याची हुशारीच नाही तर सगळीच कौशल्यं मीटिंगच्या निमित्ताने दाखवली होती.. हवं तिथे मृदू पण गरज पडल्यास सक्त कारवाई करायला तो मागेपुढे पहायचा नाही.. अत्यंत चाणाक्ष निर्णयक्षमतेला माणुसकीची जोड द्यायचा.. कामालाच देव मानायचा आणि झोकून देऊन काम करायचा.. कुठलीच ड्युटी कमी समजायचा नाही.. कंपनीतील प्रत्येक घटकाचं काम महत्त्वाचं असतं अशी त्याची धारणा होती..

"आय थिंक ही ईज पर्फेक्ट फॉर द पोस्ट ऑफ चेअरमन.." एडी विल्सन, एस्.व्ही.पी.

"हो नक्कीच.. वय, क्वालिफिकेशन, हुशारी, कष्ट, मॅनेजमेंट स्टाईल आणि बर्‍याच पॉझिटिव्ह गोष्टी आहेत.. आय थिंक वुई शुड नॉट मिस ॲन अपॉर्चुनिटी लाईक धिस.. दानिश सारखे हिरे दुर्मिळ असतात.." निंबाळकर, डायरेक्टर

"आपण ऑफिशियल मीटिंगच्या आधी एक अनऑफिशियल वोटींग करूयात.. म्हणजे संपूर्ण बोर्डाचा कल कळेल.. काय वाटतं.." इनामदार, डायरेक्टर

"येस.. आय विल अरेंज दॅट.." सेक्रेटरी रायना

     ही आणि अशा अनेक मीटिंग्स दानिश वरचेवर घ्यायला लागला.. कारण आता सूत्रं त्याच्या हातात होती.. त्याच्या मते रेग्युलर कम्युनिकेशन खूपच महत्त्वपूर्ण असतं त्यामुळे एकमेकांशी मीटिंग्सद्वारे बोलत राहिलं पाहिजे.. मॅनेजमेंटने देखील दानिशच्या या निर्णयाचं स्वागत केलं.. कंपनीत होणारे सकारात्मक बदल मॅनेजमेंटच्याही दृष्टिपथात होते.. दिवसेंदिवस दानिश त्याचं टॅलेंट दाखवत होता.. अत्यंत उत्कृष्टपणे सगळं हाताळत होता.. कंपनीचे चेअरमन अकाली निधन पावल्यामुळे जी पोकळी निर्माण झाली होती, ती दानिशला भरून काढायची होती.. त्यांच्या सगळ्या चांगल्या योजना त्याला पुढे न्यायच्या होत्या.. त्यांनी जी चांगली तत्वं कंपनीच्या कल्चरमधे रुजवली होती, ती तर त्याला भक्कम करायचीच होती, पण अजूनही बरेच सकारात्मक बदल घडवून आणायचे होते.. कोरोनामुळे जी भीतीची सावली पसरली होती, तिला आशेच्या प्रकाशाने मिटवायची होती.. मृत्यूच्या थैमानाने जी मरगळ आली होती, तिला आयुष्याचा सकारात्मक भाग दाखवायचा होता.. दानिशला स्वतःलाच कळत नव्हतं की अचानक एवढी उर्जा कुठून आली, पण त्याला फक्त पद पटकवायचं नव्हतं, तर ते कमवायचं होतं.. त्याच्या लायक बनायचं होतं.. कारण त्याचं हेच कर्तृत्व त्याला फॅमिली बिझनेसच्या योग्यतेचं घडवणार होतं.. त्याला विदिशाचा विश्वास सार्थ करून दाखवायचा होता.. विदीशाने सांगितलं होतं की दानिश चेअरमन होणार.. मग आता दानिशने मागे वळून बघायचा प्रश्नच नव्हता..

     दानिश खन्ना.. ब्रिलियंट ब्रेन, सहा फूट उंची, हॅन्डसम तरीही नम्र, शांत तरीही धाडसी.. संकटं तर त्याला आवडायचीच.. विघ्नं यावीत आणि आपण ती तल्लख बुद्धीने सोडवावीत अशी त्याची इच्छा असे.. तो वडिलोपार्जित बिझनेसचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी उत्सुक होता पण कष्ट आणि सन्मार्गाने तिथवर पोचण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील होता.. दिल्ली हाय स्कूलचा टॉपर, स्पोर्ट्समधे स्टेट चॅम्पियनशिप, स्कॉलरशिपवर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससारख्या जगविख्यात इन्स्टिटय़ूट मधून गोल्ड मेडल कमावणारा..

     एकदा दानिशच्या कंपनीला एक मोठं प्रोजेक्ट मिळालं.. ते यशस्वी झाल्यास कंपनीला नुसताच फायदा झाला नसता तर मार्केटमधे ब्रॅण्ड व्हॅल्यू देखील वधारली असती.. दानिश ज्या कंपनीचा सी.ई.ओ होता त्याच कंपनीच्या भारताच्या युनिटमधील महत्त्वपूर्ण भाग म्हणजे निहीराचं डिपार्टमेंट.. त्यात निहीरा चीफ एडिटर होती.. नव्या प्रोजेक्टची सगळी जबाबदारी निहीराच्या बॉसवर, अबीरवर होती.. अबीरची नियत ठीक नव्हती.. त्याने प्रोजेक्टच्या कामात बरीच लबाडी केली आणि ते काही कारणाने निहीराच्या ते लक्षात आलं.. अबीरने पैशांची अफरातफर, ॲग्रीमेंट टर्म्सचा गोंधळ आणि टीममेट्सना धमक्या देऊन चुकीचे काम करवून घेणे हे प्रकार केले.. पण निहीराने सत्य उघड करण्यामधे बरेच अडथळे होते.. अबीर हा काही सरळमार्गी माणूस नव्हता.. तिचा जॉब धोक्यात येऊ शकला असता.. काहीही चूक झाल्यास तिचीच उलटी बदनामी केली गेली असती.. हवे तेवढे पुरावे तिच्या हातात नव्हते.. त्यामुळे पुराव्यांअभावी निहीरा अबीरच्या भक्ष्यस्थळी पडली असती..

     पण तेवढ्यात काहीतरी अनपेक्षित घडलं.. कंपनीने काही पॉलिसी चेंजेस जाहीर केले.. कंपनीत काहीही चुकीचं घडत असेल तर ते गुप्तपणे उघडकीला आणणं शक्य असल्याची हमी कंपनीने दिली.. यात त्या व्यक्तीचं नाव शेवटपर्यंत गुप्त राहील याची संपूर्ण जबाबदारी कंपनीने घेतली.. असं कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत होतं.. या पॉलिसीमुळे कंपनीला हानिकारक असणारे बरेच छुपे निर्णय उघडकीला येणार होते.. निहीराने या पॉलिसीचा फायदा घ्यायचा ठरवलं आणि अबीरच्या चुकीच्या कामाबद्दल कंपनीला जागरूक केलं.. यात कंपनीनेही निहीराला खूप मदत केली.. पुरावे गोळा करणे, अबीरला रंगेहाथ पकडणे यात प्रोजेक्टमधे असलेल्या सगळ्या कलीग्जनी निहीराला मदत केली आणि तिच्या बाजूने उभे राहिले.. अबीरवर योग्य ती कारवाई झाली.. त्याला पेनल्टी लावण्यात आली आणि नोकरीवरून काढून टाकण्यात आलं.. निहीराच्या धाडसाबद्दल तिचं कौतुक तर झालंच.. पण तिला प्रमोशन देऊन अबीरच्या जागी नियुक्त केलं गेलं..

    एक दिवस निहीराला मेल आला की तिला मॅनेजमेंट सोबत मीटिंग इन्विटेशन आहे.. तिला धक्काच बसला.. कारण आधी असं इन्विटेशन कधीच आलं नव्हतं.. कंपनी कल्चरमधे आलेले सकारात्मक बदल तिच्याही लक्षात आले होते.. दानिश म्हणून नवीन चेअरमन आल्याचं तिला माहीत होतं.. दुसर्‍या दिवशी तिने मीटिंग अटेंड करायचं ठरवलं.. कंपनीची वाटचाल योग्य दिशेने जात असल्याचं तिचं मत होतं..

      गूगल मीटवर मीटिंग चालू झाली.. चेअरमनची सेक्रेटरी रायनाने मीटिंगचा अजेंडा जाहीर केला आणि चेअरमनना मीटिंग सुरू करण्याची विनंती केली.. दानिशचा चेहरा स्क्रीनवर आला तशी निहीरा चकितच झाली.. तिने एका क्षणात त्याला ओळखलं.. तोच चेहरा, तेच डोळे, तीच बोलण्याची स्टाईल.. "हा तोच दानिश का?" असा विचारही तिच्या डोक्यात आला पण तरीही ती शांत बसली.. कारण दानिश तिच्यासमोर कंपनीचा सी.ई.ओ. आणि भावी चेअरमन म्हणून बसला होता.. त्यामुळे ओळख पटवायची ही योग्य जागा नाही हे निहीराला कळलं.. संपूर्ण मॅनेजमेंट निहीराचं कौतुक करतच होतं.. तसच नवीन पोस्टसाठी अभिनंदनही करत होतं.. पण तिच्या चेहर्‍यावर फक्त आश्चर्य होतं.. तरीही खोटं हसून तिने ते लपवायचा पुरेपूर प्रयत्न केलाच..


........... आता तुम्ही म्हणाल की दानिश आणि निहीराचा एकमेकांशी काय संबंध? की कथा चालू ठेवायची म्हणून उगीच जोडलाय? पण अजून खूप काही घडायचय.. बिघडायचयही.. इतक्यात काहीही निष्कर्ष काढू नका एवढच सांगेन.. जास्त महत्वाचं तर हे आहे की आता काय होणार आहे? सामान्यतः होतं तसच दोघं प्रेमात पडणार की नाही? काही अनपेक्षित घडणार की नाही? दोघं इतके हुशार आणि कर्तबगार आहेत.. मग ते आयुष्यात काही मिळवणार की सामान्यच आयुष्य जगणार? पुढे वाचत रहा........


Rate this content
Log in

More marathi story from सई कुलकर्णी

Similar marathi story from Romance