STORYMIRROR

सई कुलकर्णी

Inspirational Others

3  

सई कुलकर्णी

Inspirational Others

पुरे तुझे बहाणे

पुरे तुझे बहाणे

1 min
324

"चल उठ बाळा अंतिम परीक्षा आहे आज", आई म्हणाली त्याला डोळे उघडले, अंध त्याच्या डोळ्यासमोरचा अंधार कायम राहिला. पण एका निश्चयाने तो उठला "पुरे तुझे बहाणे" जणू बजावत स्वतःला. 


"पुढचा नंबर", स्विमिंग कोच म्हणाल्या. तसा धावत तो आला आणि उभा राहिला एका पायावरच, कारण दुसरा जन्मतःच नव्हता "पुरे तुझे बहाणे" म्हणत पाण्यात सूर मारला. 


तिने तोंडात ब्रश पकडून सराईतपणे चित्र काढलं. आंतरराष्ट्रीय पारितोषिक दिमाखात पटकावलं. मान्यवरांनी पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाची ट्रॉफी तिला बहाल केली. आयुष्याला सांगत "पुरे तुझे बहाणे" हात कायमचे गमावूनही 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational