सई कुलकर्णी

Inspirational Others Children

4  

सई कुलकर्णी

Inspirational Others Children

मनासारखा एक दिवस.. (अलक)

मनासारखा एक दिवस.. (अलक)

2 mins
457


जलपरी :-

आईने घराची साफसफाई करायला घेतली.. दिवाळी तोंडावर आली होती.. तात्पुरती दिवाणखान्यातील शोकेस शाहीनच्या खोलीत ठेवण्यात आली.. तिला किती आनंद झाला.. तिच्या डोळ्यांना २४ तास १२ महिने ३६५ दिवस छताचा पांढरा रंगच दिसायचा.. २००२ च्या पोहण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झालेल्या अपघातात तिच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली.. अवघ्या १५ वर्षाच्या वयात डॉक्टरांनी ती आजन्म चालू शकणार नाही असं सांगितलं.. ३ वर्ष वयापासून उराशी बाळगलेलं जगप्रसिद्ध स्विमर व्हायचं स्वप्न धुळीला मिळालं.. खूप डॉक्टर, खूप हॉस्पिटल्स, खूप देश झाले पण फरक शून्य.. आज परत तिला जिंकलेल्या सगळ्या ट्रॉफीज बघून मनासारखा एक दिवस हसत जगावासा वाटला.. जुन्या सुंदर आठवणींना उजाळा मिळाला.. 

...............................

कॅफा :-

मॅडीने एलीला हाक मारली आणि सगळ्यांना घेऊन यायला सांगितलं.. मग त्यांची सगळी टोळी आली.. डोक्याला टक्कल, फिक्कट हिरवे गणवेश, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं, सुकलेले ओठ, ताणलेले चेहरे.. तरीही वय लपत नव्हतं.. ४ ते १५ वयोगटातील ते कॅन्सरग्रस्त कोमल जीव.. कॅलिफोर्नियातील "कॅफा - कॅन्सर फायटर्स" हॉस्पिटल.. सोमवार सकाळची वेळ.. काचेच्या बिल्डिंगला बाहेरून साफ करायला दर आठवड्याप्रमाणे स्टीफन येत असे आणि मुलांची करमणूक करत असे.. त्या मुलांच्या आयुष्यात चार आनंदाचे क्षण फुलवायचं जणू त्याचं उद्दिष्ट होतं.. मुलं खूष होत आणि त्यांना केमो सुसह्य होत असे.. असा प्रत्येक सोमवार त्या मुलांसाठी मनासारखा एक दिवस असायचा.. 

.................................

रंगांधळा चित्रकार :-

बाबांनी हाक मारली आणि व्हरांड्यात यायला सांगितलं, पण डोळे झाकून.. मग निषादच्या आईने त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि बाहेर येऊन बघतात तर काय.. किती गंमत.. रंगांच्या जवळजवळ १०० छटा, नानाविध प्रकार - तैलरंग, वॉटर कलर्स, क्रेयॉन्स.. ब्रशचे अनंत प्रकार.. त्याची चित्रकला परत बहरणार होती.. फरक एवढाच होता की बघायला त्याचे डोळे राहिले नव्हते.. आतंकवादी हल्ल्यात बंदुकीच्या गोळीने त्याच्या डोळ्याचा नेम साधला आणि त्याला दोन्ही डोळे गमवावे लागले होते.. पण आई -बाबा अगदी काहीच न घडल्यासारखे वागत.. आज परत मनासारखा एक दिवस आला होता.. चित्रकारितेच्या स्वप्नांना पंख घेऊन.. 

...................................

सजीव मूर्ती

मूर्तिकलेची देणगी राधिकाला आईकडून अनुवांशिकच प्राप्त झाली होती.. राधिकाचा लंडनचा व्हिसा आला होता.. तिला तिथल्या युनिव्हर्सिटीत मूर्तिकला शाखेत प्रवेश मिळाला होता.. आज निमाताई मिराजदार घरी आल्या होत्या.. तिच्यासाठी स्वतःच्या एन्.जी.ओ. मधून व्हीलचेअर घेऊन.. मूर्ती घडवताना पडून अपघातात तिला कमरेखाली पंगुत्व आले होते.. पण आता उच्चशिक्षणाने ती त्यावर मात करणार होती.. परत तिच्या सृजनशीलतेने सजीव मूर्ती घडवणार होती.. अगदी तिच्या मनासारखा एक दिवस आज आला होता.. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational