STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract Tragedy

3  

AnjalI Butley

Abstract Tragedy

विचारांची गरीबी

विचारांची गरीबी

5 mins
353

हिरण्यगर्भ श्रीमंती, सगळ्या माहिती आहे, श्रीमंत, पैसा अडका भरपुर असलेला! सातपिढ्या बसुन खाणार हे परवलीचे बोलणे आपण एकत असतो, व आताच्या धावपळीच्या जगात सर्व जण पैशापाठी धावत असतात. 

पाटीलकी म्हणजे पैसा अस सगळ्यांना माहिती आहे, गावात मान, मोठा वाडा, घरी राबायला गडी माणसे, बायका! येणार्या जाणार्यांचा मान, अदबीने करणारे पाटील काका काकू, काकू छान स्वयंपाक करायच्या स्वतःच्या हाताने, त्यांच्या हातचा चहा पायला लोक खास घरी येणार! वहिनी चहा हवा करत!

पाटील काका काकूना एकच मुलगा होता, अभ्यासात त्याच जास्त लक्ष नव्हते, मित्र मंडळीत जास्त रमायचा, मित्र ही त्याच्या जवळ पैसा आहे म्हणून त्याच्या अवती भोवतीच असायचे, 

पाटील काकू त्याला रागवायच्या तसा तो अजून अजून त्रास द्यायचा, काय करणार आहे, हा माझा हक्काचा पैसा आहे मी घेणारच! तु ते आल्या गेल्यांचेच पहा! कर त्यांच!

काकांनाही ऊलटून बोलायचा, काकांचे एक मित्र गायकवाड नावाचे काकांच्या पुढे त्याला रागवायचे, इथे त्रास देऊ नको वरवर म्हणायचे, समजवयाच्या बहाण्याने आपल्या घरी न्यायचे पण घरी नेल्यावर त्याला पाटील काका काकूंच्या विरूद्ध भडकावयाचे! खूप पैसा आहे तुझ्या बापाकडे, काय करणार आहे? तु एकुलता एक आहे, छान पलंगावर बसून खा काही करयाची, शिकायची गरज नाही, गायकवाडांना एक मुलगी होती, तीला काही आजार होता, त्यामुळे तीची बौध्दीक वाढ झाली नाही, ती शाळेत जात नव्हती चौथी शिकली होती, तीला सांभाळण मुश्कील झाले होते गायकवाडांना, त्यांची बायको मोठी कजाग होती त्यामुळे कोणी जास्त त्यांच्याकडे जात येत नसे, घरपण स्वच्छ ठेवत नसे, पैसा भरपुर होता पण देण्याची दानत नव्हती!

पाटील काका काकूच त्यांना काही लागले की मदत करत असे!

पाटील काका काकूंना माहित नव्हत आपल्या मुलाला भडकवण्याच काम गायकवाड करत आहे म्हणून!

पाटील काकांचा मुलगा प्रथमेश, दिसायला छान होता, अभ्यासात हुशार होता पण अभ्यास करत नव्हता, शाळेत जायच्या बहाण्याने घरातुन निघायचा पण गायकवाड काका मुद्दाम त्याला आपल्या घरी घेऊन जायचे! आपल्या मुलीसमोर घेऊन जाणार ती त्याच्या अंगाला हात लावणार, प्रथमेशला ते आवडत नव्हत पण काकांच्या सांगण्यावरून तीला हात लावु द्यायचा मग काका त्या दोघांना आपल्या मीठीत घ्यायचे, जीव गुदमरायचा प्रथमेशचा पण काका सोडायचे नाही, काका खूप विचित्र वागायचे, त्यांचे हावभाव पण खूप विचित्र असायचे!

त्यांची बायको हे सगळ पाहायची, ती पण प्रथमेशच्या अंगावरून हात फिरवायची, त्याला ते नको असायच पण त्याची सुटका होत नव्हती!

 त्याचा डबा ते तीघेच खायचे, याला काही ठेवायचे नाही!

शाळा सुटायची वेळ झाली की तो बळजबरीने बाहेर पडायचा, घरी जायचा पण कोणाशी जास्त बोलायचा नाही, मित्रां बरोबर ही तो कमीच वेळ घालवायचा, असे सलग एक आठवडा झाले, शाळेचे शिंदे मास्तरांनी त्याच्या मित्रांना विचारले, मित्र म्हणाले आम्हाला माहित नाही आजकाल तो आमच्याशीपण खेळायला येत नाही, आमच्याशीपण बोलत नाही, त्या गायकवाड काकांकडे जातो. आम्हाला त्या काकू आवडत नाही म्हणून आम्ही नाही जात त्यांच्याकडे!

शिंदे मास्तरांनी एकदा प्रथमेशच्या घरी जाऊन बघून यावे म्हणून शाळेतुन लवकर निघाले पण मध्ये गायकवाड भेटले म्हणून त्यांच्याशी बोलण्यात वेळ गेला, ते शिंदे मास्तरांना पाटीलकडे जाऊ न देण्यासाठी मुद्दाम एकडच्या तिकडच्या फालतूच्या गप्पा मारत राहीले!

शिंदे मास्तरांना थोडी शंका आली, ते म्हणाले चला तुमच्या घरी जाऊन गप्पा मारू, गायकवाड थोडे घाबरले पण बळेबळे हसत विषय टाळत, परत दुसरे विषय काढत बोलत राहीले!

गायकवाडांच्या विचारांच दारिद्र ओथंबून वाहत होत!

शेवटी मास्तरच म्हणाले शाळा सुटायची वेळ झाली मला शाळेत जाव लागेल, परत कधी भेटल्यावर निवांत गप्पा मारू!

पाटील काकूंना सात आठ दिवस झाले प्रथमेश शाळेत जात नाही आहे हे माहितच नव्हत!

काकूंना वाटायच दहावीच वर्ष आहे तर न बोलता आता अभ्यासाच मनावर घेतले असेल म्हणून गप्प गप्प असेल मुलगा!

तरी त्या प्रथमेशला बोलत करायचा प्रयत्न करत होतेच!

शिंदे मास्तर एक दिवस सकाळी सकाळीच चहाचे निमित्त करून पाटील काका काकूनकडे आले, बर्राच गप्पा मारल्या, काकूंनी चहा दिला, चहा पीता पीता प्रथमेशची चौकशी केली कसा अभ्यास करतो, वैगरे मुद्दामूनच तो सात- आठ दिवस झाले शाळेत येत नाही हा विषय काढला नाही. प्रथमेश आहे का घरी, शाळेत सोबत जाऊ म्हणत, काकूंना विचारले, प्रथमेशपण नेहमी प्रमाणे शाळेत जाण्यासाठी तयार होताच!

शिंदे मास्तर व प्रथमेश सोबतच शाळेत जायला निघाले! नेहमी प्रमाणे गायकवाड प्रथमेशची वाट अडवायला समोर आले, पण शिंदे मास्तरांना पाहुन रस्ता बदलला! प्रथमेश घाबरलेला आहे हे मास्तरांच्या नजरेतुन सुटले नाही! तरी ही ते त्याच्याशी शांतपणे बोलत चालत राहीले, शाळेत त्याच्याशी अधुन मधुन नजर ठेऊन होते, इतर मित्रपण प्रथमेशची चौकशी जास्त न करता नेहमी प्रमाणे बोलत राहीले!

एक दोन आठवडे ते रोज प्रथमेशला घरी जाऊन शाळेत घेऊन यायचे व सोडायचे!

गायकवाडांची पंचायत झाली, त्यांना शिंदे मास्तरांचा राग आला, गायकवाडांची बायको मुद्दाम एक दिवस मास्तरांशी भांडली, तुम्ही मला धक्का मारला म्हणून, पोलिसात तक्रार केली, कायदे बायकांच्या बाजूचे, पोलिसांनी मास्तरांनाच दोषी ठरवले.

प्रथमेश सोबत होता मास्तर व गायकवाड काकूंचे भांडण झाले तेंव्हा.

तो ही घाबरून काय चालले ह्यांचे म्हणत गोंधळला होता, पण कुठून बळ आले व घरचे आईने आधी चांगले संस्कार केलेली त्याला स्वस्थ बसु देईना. पोलिसांसमोर धिटाईने तो बोलला, मास्तरांची काहीही चूक नाही, काकूंनीच माझ्यावरचा राग मास्तरांवर काढला.

काकू प्रथमेशवर चिडल्या व त्यालाच ऊलट सुलट बोलू लागल्या, तोपण चिडला, मोठ मोठ्याने बोलत त्याने मग मागच्या काही दिवस गायकवाड काका काकू माझ्याशी कसे वागता हे पोलिसांसमोर सांगत असतांनाच पाटील काका काकू पोलिस ठाण्यात पोहचले, प्रथमेशचे बोलणे एकून विश्वासच बसला नाही आपल्या कानांवर करत त्या प्रथमेशलाच मारायला लागल्या. पोलिसांनी पाटील काकूना शांत केल! प्रथमेशचा जबाब मुख्य साक्षिदार म्हणून नोंदवुन घेतला, मास्तरांना सोडले व गायकवाड काकूंना, काकांना दोषी ठरवत ताब्यात घेतले. मुलगी काही कळत नसल्यामुळे तीला घरीच ठेवले! तीची काळजी घ्यायला पाटील काकूच पुढे आल्या!

गायकवाड काकूंच्या विचारांचे दारिद्र येवढे खालच्या पातळीला गेल? का?

गायकवाड काकांनीच सांगीतले मी तुमचाराग करतो, गावात तुम्हालाच मान मिळतो, सर्व जण तुम्हालाच विचारतात, तुमच्या कडे पैसा आहे, माझी मुलगी बरी नाही तर तुमच्या मुलाला बिघडवल्यावर याच्याशी कोणी लग्न करणार नाही, मग मी त्याला आपला जावई करून घेणार तुमची प्रापर्टी मग मी हळुहळू आमच्या नावावर करून घेणार...

असूया, आणी फक्त असूयाच !

पाटील काका काकू शिंदे मास्तरांनी, बर झाले वेळीच सावरल प्रथमेशला करत देवापुढे हात जोडले. प्रथमेशला आपली चूक समजली व तो आता अयासत लक्ष देत राहीला, चांगले मित्र व वाईट मित्र ह्यातला फरक समजायला लागला त्याला! 

पैश्याने गरीब असलेल चालेल पण विचारांनी नको, विचारांची गरीबी लोकांना विनाशा कडेच घेऊन जाते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract