वैश्विक प्रेमाची अनुभूती
वैश्विक प्रेमाची अनुभूती


शिर्षक-वैश्विक प्रेमाची अनुभूती
आफ्रिका खंडातील,केनियाच्या घनदाट जंगलात,ती सारी इंग्लडहुन आपल्या पंचवीस मित्र मैत्रिणीसह उतरली होती.
शहरवस्तीपासून दुर जंगलातलं वातावरण पाहुनत्यांची मने उल्हसीत झाली.
एलीना,सबीना,राँबर्टस,ज्युली,हँरी डायना किती किती नावे घ्यावी.
क्षणांक्षणांला चालणारे विनोद,मद्यांचा चढता अंमल,धुंद करून सोडणारा निसर्ग,पाहुन ती सारी हरकली होती.
मोरांचा केकारव,पालापाचोळ्यातुन सरसर जंगलांत लुप्त होत जाणारी सर्प,त्यांच्या ह्रदयांची ठोके चुकवीत होती.
सोबत वाटाड्या असल्यांने काळजी नव्हती.
चालता चालता एलिनाचा,पाय दगडाच्या सापटीत अडकून बसला.तो तिने सोडवला.पण पायाला लचक आली.तिने आपला बुट काढुन पाहिला,जिथे मुरगळला तिथे खरचटलं होत,अन रक्ताळला ही होता. तिने सँकमधला वेदनानाशक स्प्रे काढून लाल भागावर मारला.आता तिला बरे वाटत होते.
परत तिने बुट चढवुन निघाली,पण बरोबरीचे पुढे निघुन गेले होते.अन आता त्यांचा आवाज ही येत नव्हता.
"आपल्याला त्यांना गाठलंच पाहिजे.",असं मनांला बजावत,ती चालायला लागली.
पुढे,गेल्यानंतर तिला दोन रस्ते दिसले,जो बरा वाटला त्या रस्त्याने अंदाजाने भरभर चालु लागली.बराच वेळ ती चालत होती,तरी मित्रांपैकी कुणाचा ही आवाज येत नव्हता.दाटझाडीमुळे कवडस्यातूनच दिवसाचा आभास होत होता,सुर्य मावळतीला होता,पक्षी घरी परतु लागली होती.तिने वाघ सिंहाबद्दल बरेच ऐकले वाचले होते,आता तिला खुप भिती वाटु लागली.तरी भितीवर,ताबा ठेवुन ती पुढे जातच राहिली.
आता तिच्यांत त्राण उरले नाही.पाय पुढे रेटतच नव्हते.एका ठिकाणी शेवटी ती कंटाळुन बसली.
अचानक,अंधारातून तिच्यासमोर महाकाय माकडांच्या टोळीने तिला घेरले.त्यांना पाहुन ती घाबरून भोवळ येऊन पडली.
इकडे साऱ्या मित्र मैत्रिणींच्या लक्षात आले की,एलिना आपल्याबरोबर नाही.तेव्हां मात्र त्यांची घाबरगुंडी उडाली.ते एलिना,एलिना हाका मारू लागले.तेवढ्यांत त्यांना जंगलाच्या शांततेचा भंग करणारी किंकाळी ऐकु आली.ती ऐकून त्यांच्या ह्रदयाचे पाणी झाले.
इकडे,एलिनाजवळ जो समुह होता,तो महाकाय एप माकडांचा समुह असतात.त्यांच्या सवयी भावना,माणसांसारख्याच असतात.त्यांच्या कळप प्रमुखाने,सहजगत्या हाताने,उचलले व ते तिला त्यांच्या गुहेत घेऊन गेले.
बऱ्याच वेळाने, एलीनास जाग आली.डोळे किलकिले करून सर्वत्र नजर फिरविली.तिला काहीच समजत नव्हते.आपल्या भोवताली महाकाय माकडे आहेत,असे तिला आढळले.खुप घाबरली ती,मनांत येशुचे स्मरण करू लागली.पण तरीसुध्दा आपण अजुन ही जिंवत आहोत,याचे तिला राहुन राहुन आश्चर्य वाटत होते.
ती उठुन बसली,तिला खुप भुक लागली होती,तिने तेथे पडलेली केळी भराभर खाण्याचा सपाटा लावला.
माकडं तिच निरक्षण करीत होती.केळी खाल्ल्याने एव्हांना तिला तरतरी आली होती.
तिला खात्री पटली,ही माकडे आपणांस काही करणार नाही.म्हणून ती धैर्याने,निर्भयपणे वावरू लागली.तशी ती धैर्यवानच होती.म्हणतात ना,प्रसंगात माणसाची परिक्षा होते.
तेवढ्यात पुन्हा तो,प्रमुख,तिच्यासमोर केळीची,भली मोठी फणी घेऊन आला,तो प्रेमभावाने तिच्याकडे पाहत होता.तिच्या अलौकिक सौंदर्याने भारून जाऊन तो तिचा मित्र बनला होता. तो एप माकड,ही एक मानव तरी त्यांच्यात,मैत्र जुळून आले. तिने हसत हसत आपला हात त्याच्यासमोर ठेवला.त्याने ही तो प्रेमांने हातात धरला.तिथे पिलांना छातीशी धरलेल्या माकडीणी माता ही होत्या.त्यांनी वात्सल्यांनी ची ची करीत एकच जल्लोष केला.
कुठेतरी विधात्याने प्रत्येक जीवाला एक मन दिले आहे.अन टेलीपथीने जीव दुसऱ्या जीवाची भाषा समजु शकतो,जसे कुत्री, मांजरे वगैरे पाळीव प्राणी ही समजतात.सृष्टीच्या वैश्विक धाग्याने सारी बांधली आहेत.हीच ईश्वराची भावभुती आहे,वैश्विक प्रेमाची अनुभूती आहे.
इकडे,वनरक्षकांना नंतर ते समजल्यानंतर त्यांनी तिची त्याच्यापासुन सुटका केली.एव्हाना साऱ्या ग्रुपला,देशाला समजली.अन आनंदाने,चांगल्या आठवणी घेऊन एलीना मायदेशी परतली.
म्हणतात ना काळ आला होता,पण वेळ आली नव्हती.जाको राखे साईयाँ,मार सके ना कोय.