Savita Tupe

Thriller

3  

Savita Tupe

Thriller

वारस ! भाग १.

वारस ! भाग १.

2 mins
306


भाग १.


   तब्बल बारा वर्षांनी रामजी सावकाराच्या घरी पाळणा हलला . सखूने एका मुलाला जन्म दिला.  इतक्या नवस - सायासाने आज पुत्ररत्न प्राप्त झाले म्हणून दोघेही आनंदाने अश्रू गाळत होते . घराण्याला वारस हवा म्हणून वाट बघून बघून रामजीचे आई वडील कधीच देवाघरी पोहोचले .

 त्यांना आठवून रामजीला आणि सखुला अगदी भरून आलं होतं .त्यांच्या फोटो समोर उभे राहून रामजीने त्यांना नातू झाल्याचे सांगितले. देवघरात जावून खंडोबाला नमस्कार करून, " पोर सव्वा महिन्याचे झाले की नवस फेडायला येतो देवा ! " म्हणून हात जोडले .

    बाळ चांगलेच सुदृढ जन्माला आले होते . पण रंगाने कोणावर पडले होते कोणास ठावूक ! 

मोठा होईल तसा रंग बदलतो असे रखमा काकू म्हणाल्या. त्यावर विश्वास ठेवून त्याचा काळा रंग का असेना मुलगा आहे ना , असा विचार करून आहे तसं स्वीकारल दोघांनी आपल मुल .

   दिवस जात होते , नवस फेडून झाला . नवसाने झाला म्हणून बाळाचे नाव मल्हारी ठेवले , 

    मल्हारी जसजसा वाढू लागला तस तसं त्याचं वागणं आणि खोड्या पण वाढू लागल्या . 

   इतक्या वर्षांनी झालेलं मुल , त्यात वंशाचा दिवा , मुलगा मुलगी भेद करणारा समाज !

    मुलगा आहे , तो असाच वागायला हवा , मुलांनी काय घरात बसून राहायचे का ? अश्या खुळ्या समजुतीला कवटाळलेले , त्याच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करणारे त्याचे आई - दादा .

    हया वातावरणामुळे मल्हारी बेशिस्त आणि बेरकी होवून घडत होता. घरात सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आणि हा एकटा या वंशाचा दिवा !

  वडिलोपार्जित सावकारी मध्ये रामजीने , धन मात्र अत्यंत प्रामाणिकपणे जमवले होते .आणि त्याचा विश्वास होता की तो कुणालाही फसवत नाही , अडल्या नडल्याला अडी अडचणीच्या काळात सतत मदत करतो म्हणून देवाने त्याचे गाऱ्हाणे ऐकून त्याचा वंश वाढवला आहे .

 अति लाडाने त्याच्या वंशाचा दिवा मात्र वेगळे रूप धारण करू लागला होता .

  मल्हारी आता १८-१९ वर्षाचा झाला होता .त्यांच्यातले पोरसवदा अवगुण आता मात्र त्रासदायक होवू पहात होते.

   आईच्या लाडाने मल्हारी शाळेत गेला नाही , घरी शिकवायला येणाऱ्या शिक्षकांना मल्हारी निम्म्या वाटेवरून माघारी धाडायचा . रामजी जीव लावायचा पण तेवढाच त्याचा मल्हारीला धाक पण होता . त्याच्या चुकांची शिक्षा त्याला बऱ्याच वेळा घराबाहेर काढायची पण सखू त्याला रामजीच्या नकळत मागच्या दाराने घरात घ्यायची . रामजीला कळायचे पण प्रत्येक वेळी , आतातरी सुधारेल या आशेने त्याला माफ करायचा ....


क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller