STORYMIRROR

vaishali vartak

Action

2  

vaishali vartak

Action

वाढदिवस

वाढदिवस

3 mins
59

     सकाळी उठले तर गेल्या वर्षीच्याच या दिवसाची आठवण झाली. सकाळ पासूनच मी पूर्णतः गेल्या वर्षात कसे रमले गेले कळलेच नाही.गेल्या वर्षी  याच दिवशी मी मैत्रिणीं सह कल्ला करत, केकचे घास सर्वांनी मला व मी सर्वांना भरवतांना हसत खेळत केलेली मजा मस्ती व  घेतलेले सहभोजन व त्यात दुपारचे 2/3 तास कसे मस्त गप्पात रंगले त्याची आठवण येऊन मन उल्हासित झाले. सकाळी सकाळीच मुलीने मला माहित नसता , हो ! सध्याचे सरप्राईज देण्याचे फॕड फारच वाढल आहे ना . तर सकाळीच फेशियल व मसाज साठी पार्लर ची बाई दारात येउन उभी होती .व माझ्या सौंदर्यात भर करण्यास मुलीने तिची appointment घेतल्याने ती पण माझ्या तैनातीला हजर होती. स्वयंपाक घरात रवा शेकण्याचा खमंग वास दरवळला होता .सूनेने केशर घालून शिरा केला होता व न्याहरीला मस्त माझा आवडता ईडली चटणी चा बेत तिने ठेवला होता. नातवंडांनी पण त्यांना गीफ्ट मधे मिळालेली विविध चाॕकलेटस् सकाळी सकाळी देउन सकाळ अजूनच गोड केली होती. वाह s वाह किती सुखाचा आनंदाचा माझ्या वर वर्षाव केला होता सर्वांनी . व यांनी आणलेली त्यांच्या आवडीच्या साडीची मी घडी मोडणार होते. सर्व सर्व काही क्षणात डोळ्यासमोर उभे झाले.

       आणि सरळ सरळ मी मागील वर्षात मनाने रमले. मग हळूहळू नव्हेंबर महिना पुढे आला व दिवाळी चे आनंदी दिवस आठविले .दिवाळी म्हणजे उत्साहाचे आनंदाचे पर्व. दिवाळी च्या दिवसात नातवंडांकडून काढून घेतलेल्या रांगोळ्या, रांगोळी काढताना त्यांची सोडविलेली भांडणे , त्यांच्या बरोबर मातीत खेळत केलेला किल्ला, किल्ल्याची सजावट , शोभेची दारु फोडण्याचा कार्यक्रम ,सर्व दिवाळी डोळ्यासमोरून चित्रपटा सारखी सरकली. मग डीसेंबर महिना म्हणजे परदेशातील मुले भारतात येण्याचा .म्हणजे पुन्हा दिवाळी .सध्या काय मुले बाहेरून आली की दिवाळी .तर डिसेंबर पण कसा चारी नातवंडात केव्हा आला व सरला कळलेच नाही. पुढे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी इथल्या नातवांची केंद्रीय शाळा , त्यामुळे परीक्षा लवकर आटपल्या .मग काय इथल्या दोन नातवंडांना घेऊन सिंगापूरला गेलो. पुन्हा चारी नातवंडांना एकत्र .पण तेथे मात्र त्या नातवंडाच्या सहामही परीक्षा .त्यामुळे त्यांचे अभ्यास करून घेऊन , मुलाला व सूनेला मदतरुप होण्यात , संध्याकाळी नातवांडाना play ground वर घेऊन जाणे,घरात आजी आजोबा असण्याने मुलाला व सूनेला दोघांना एकटे पणाने फिरावयास मोकळीक देण्यात दिवस कसे मस्त गेले व चारी नातवंडे आजीकडून पोहणे शिकली .आम्ही दोघांनी पण तेथील महाराष्ट्र मंडळात जाऊन मस्त मजेचे दिवस व्यतीत करत मानसिक आनंद मिळवित होतो. तसेच आपला मुलगा व सून यांची संगीतातील प्रगती तसेच त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थिती देत दिवस किती मजेत गेले याची आठवण झाली.

   मुलगा व सून दोघेही नव नवीन ठिकाणी फिरावयास नेण्यात मागे पडत नव्हते. दोघे जणही पुतण्यांना "जीवाचे सिंगापूर "करविण्यात जरा पण कसूर पडू देत नव्हते . व त्यांचे मे वेकेशन अविस्मरणीय केले होते. मग परत येता , जून महिना , तेव्हा पुन्हा शालेय जीवनाचा श्रीगणेशा सुरू झाला. मग आॕगस्ट

सप्टेंबर पावसाळा, यावर्षी पावसाने छान कृपा केली .पावसाळा ऋतू छानच जाणविला. आणि आता पुन्हा आला आॕक्टोबर.माझा वाढदिवसाचा महिना . हे सर्व चित्र एक वर्ष मागे जाण्याचे, म्हणण्या पेक्षा गत वर्षात मला पुन्हा जगण्याचे श्रेय मिळाले .आणि ते कसे ? तर आज माझ्या नातवाने मला सकाळी उठता सरप्राईज ,मला न सांगता वाढदिवसाचे कार्ड रात्री त्याच्या आईलाच काय पण कोणाला कळणार नाही असे गुपचुप बनविले, व सकाळी माझ्या  हातात दिले .व त्यावर 67 वा वाढदिवस लिहून, मला एक वर्षाने लहान केले .आपण बरेचदा म्हणत असतो की पुन्हा आपण लहान व्हावे. गेलेले दिवस परत यावेत. पण ते शक्य नसते, तर आज नातवाने मला एक वर्ष लहान करून ,पूर्ण पणे गत वर्षातील सर्व गोड आठवणीत पुन्हा जगण्याचे भाग्य देऊरन सर्व आठवणी ताज्या केल्यात. तेव्हा याहून सुंदर वाढदिवसाची भेट काय असू शकते ? नाही का?


Rate this content
Log in

Similar marathi story from Action