vaishali vartak

Abstract

2  

vaishali vartak

Abstract

गप्पा

गप्पा

3 mins
72


 भाजी मार्केट मधे भाजी घेऊन झाल्यावर, अचानक जुनी मैत्रीण भेटता ब-याच गप्पा झाल्या तरी, "चल ग ,

 आता जाऊ या. आपल्या गप्पा काही संपणार नाहीत असे म्हणत ,पुन्हा तेथेच रेंगाळत , पाय दुखू लागले तरी बाजूच्या कट्ट्याचा आधार घेत गप्पा करणा-या मैत्रिणी आपण पहातो .अथवा आपण पण त्यातील एक, कधी कधी असतो वा भेटलेल्या दोन मित्रात एकमेकांना निरोप देता देता" या ना घरी, मस्त गप्पा करू यात" . असे उद्दगार ऐकू येतात      परवाची च गोष्ट बाजूच्या काकू चेहरा पाडून बसल्या होत्या. काय झाले विचारले तर बसक्या आवाजात म्हणाल्यात, " काल रात्री, आमच्या कडे गप्पा रंगल्या होत्या पण माझा आवाज,घसा बसल्याने मी काहीच बोलूच शकले नाही ना !." किती विरस झाला माझा . नेमका सर्व गप्पा मारावयास जमले होते व मी गप्पात सहभागी होऊ शकले नाही 

      खरच, गप्पा गोष्टी करण्यात काय मजा असते ना ! ती गप्पीष्ट लोकांनाच त्यातील मजा कळते . मुखस्तंभा सारखे बसणा-यांना त्याची मजा कळत नाही . म्हणतात ना ' गाढवाला काय गुळाची चव" तशातले आहे.

      दोन वा अधिक व्यक्तित, जे भाष्य होते, ते संवाद वा गप्पा. त्यास भाष्य..वा संभाषण म्हणतो. एकटा स्वत;शी बोलतो ते स्वगत . वाच्यता वा भाष्य करणे ही देवाने मानवास दिलेले अमुल्य वरदान आहे. त्यात मेंदू बहाल केल्याने मानवाने भाषा शोधली . त्यामुळे भाषेत शब्दांचे स्थान महत्वाचे आहे .योग्य ते शब्द रचून वा जोडून मानव आपले विचार , मत , भावना आपले ज्ञान ,व मंतव्य दुस-यास सहजतेने सांगतो, पटवितो,गळी उतरवितो . विचारांचे आदान प्रदान करतो.. शब्दांना शब्द जोडून गप्पा रंगात येतात . बोलण्यात , गप्पात शब्दाला महत्व असते.

      गप्पा मारणे प्रत्येकास आवडते . म्हणूनच तर "या ना घरी गप्पा गोष्टी करू "असे उद्दगार कानीं येत असतात. आणि एकदा भेटले कीं गप्पांना विषय मिळत रहातात . अगदी राजकारण ,स्वयंपाक घर ,वाढती महागाई .दोन पिढीतील अंतर ,हल्लीचे मुलांचे वागणे ,सध्याचे हवामान,पाऊस ,गर्मी पासून एवढेच काय हल्लीचे चित्रपट ,टी व्ही वर न चुकता पहाण्यात येणा-या मालिका (काय फालतू मालिका आहेत) म्हणत नाव ठेवत मलिकांची चर्चा वा कामवाल्यांचा त्रास , ते थेट मोदीचा देशभर गवगवा पर्यंत चौफ़ेर गप्पा रंगतात . गप्पांना उत येतो. गप्पात चौफेर विषय हाताळले जातात .

      अगदी बालपणात पण डोकावून पाहिले अथवा बालपण आठविले तर वर्गात शिक्षक शिकवीत असता बाजूच्या अथवा पुढच्या वा मागच्या विद्याथ्याशी बोलल्याने व त्याच वेळी डोक्यात आलेला विचार त्यास सांगणे आणि शिक्षकांनी नेमके " अरे गप्पा मारू नकोस , मी येथे शिकवीत आहे आणि गप्पा काय मारतोय , उभे रहा ," अशा रीतीने त्यावेळी भोगलेल्या शिक्षेचे कारण पण गप्पा असायचे . पण गप्पा केल्या नाही तर आपले विचार दुस-यास कसे कळणार 

      टेलिफोन वरून अर्धा तास, पाऊण तास गप्पा बसायची सवय असते . त्यात तर भेटीचा आनंद मिळतो . सर्वाची खुशाली, खबरी कळतात . पूर्वी पत्राव्दारे नंतर फोन. आता तर social media मध्ये इतकी सुधारणा झाली आहे कीं क्षणात साता समुद्रापार पण chating voicemail आणि whatapp सारख्या माध्यमातून एकाशीस नाही तर ग्रुप बनवून गप्पा करू शकतात . एवढेच काय vedio call मधून तर थेट त्यांच्या घरात शिरून प्रत्यक्ष पाहत त्यांच्या समवेत गप्पा करण्याचा कार्यक्रम करता येतो, गप्पांचा मनसोक्त आनंद लुटून भेटीचा आनंद मिळवता येतो.

       महिलांची किटी वा भिशी काय प्रकार आहे ? फुरसतीच्या वेळात, नव्हे तर वेळात वेळ काढून गप्पा करण्याची बैठक च असते. प्रत्येक जण हिरीरीने गप्पात भाग घेत असतात. महिनाभराने भेटल्याने आपले विचार ,अनुभव, दुस-यां सोबत शेअर करतात . खेडे गावात गावाच्या वेशीवर झाडाचा पार म्हणजे  गावक-यांना एकत्र होऊन सुख दु:खाच्या गोष्टी करण्यास खुशाली जाणण्यास व खुशाली कळविण्यास गप्पाची बैठक च असते . शहरात वाचनायाल ,बगीचे ,क्लब , सोसायटीचे कॉमन प्लॉट ही सर्व ठिकाणे देखील गप्पांचे अड्डे च आहेत. तसेच शहरात पण कॅफे हाउस , किंव्हा चहाच्या टप-या काय , हल्ली तर चहाच्या आधुनिक chiawia सारख्या टप-या पण गप्पाची बैठक वा गप्पा रंगात येण्याची ठिकाणे झाली आहेत.

प्रवासात तर गप्पा मुळे वेळ कुठे गेला कळत नाही . नवीन ओळखी होतात . बिझनेस करणारे तर गप्पा केल्या शिवाय राहूच शकत नाहीत . गप्पा हेच तर त्यांच्या जाहिरातीचे प्रमुख माध्यम आहे .

       गप्पा करून मनास मनस्वी आनंद मिळतो जीवास विरंगुळा लाभतो कित्याकदा मनातील साचलेले विचार बाहेर निघून मन स्वच्छ होते.तसेच चार जणात गप्पा करून चार अनुभवाचे ,ज्ञानाचे कण मिळतात . चांगले विचार कळतात. गप्पा केल्यानी मनाची दारे उघडी होऊन गप्पातून चारलोकात बोलल्याने हृदये हलकी होतात . तेव्हा गप्पा करणे केव्हाही चांगलेच . जसे हसणे आरोग्यास आवश्यक आहे त्यामुळे सध्या जागो जागी हास्य क्लब निघाले आहेत . तसेच गप्पा करणे पण जरुरी आहे . चला तर मग आपल्या विविधोत्सवाने छान संधी दिली आहे , कार्यक्रम पाहून झाल्यावर मनसोक्त गप्पा मारुयात .   


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract