vaishali vartak

Romance

3  

vaishali vartak

Romance

पहिल्या भेटीचे क्षण

पहिल्या भेटीचे क्षण

2 mins
217


   विषय वाचताच गाणे माझ्या ओठी आले.

"भेट तुझी माझी स्मरते....आजून त्या दिसाची...""

   खरच पहिल्या भेटीच्या क्षणांची आठवण काही औरच. कोण आधी बोलेल ..काय बोलेल. मन थोडे भयभीत असते. कशी बर आणि काय  सुरुवात करु ?. कुठल्या विषयात हात घालू ..काहीsss. काही समजत नसते.

 मग उगाचच पदराचा चाळा चालतो वा वेणीशी खेळ करत बोलणे होते. 

     तसच काही से झालेले ते क्षण डोळ्यासमोर आले. ती पहीली भेट. ओढ तर असतेच ..कसा असेल आपला सखा. आपले विचार मांडणे मनात चालू होते . तेवढ्यात मनाचा निर्धार करुन .दोघांच्या तोंडून एकच शब्द निघतात .,"...मी म्हणत होतो / मी म्हणत होते. .."आणि पुन्हा स्तब्धता. 

     असेच काहीसे बावचळलेले क्षण होते व सर्वांचेअसतात. मग मात्र गंभीर पणे एकमेकांची आवड ..संगीताची आवड वगैरे आहे का करत गप्पा सुरु होतात. आजु बाजुला चालत असलेली हालचाल डोळ्यांना दिसत असते पण लक्ष मात्र नसते. क्षण च तो असतो तसा ... एकमेकांना जाणून घेण्याचा .एकमेकात गुंतण्याचा. असेच गुंतत आम्ही पुढे चालत होतो. सहजच झालेला ..नाही.... नाही जाणून बुजून केलेला तो स्पर्श ..अजून आठवणीने मन शहारते. असतोच क्षण तसा तो. सहजचतेने हात हाती घेऊन टाकत गेलो काही पावले. 

  एकत्र पावले.. जणू मनास आनंद.. धीर ..विश्वास ..मनात वाटलेले ते क्षण. जणू 

क्षणात भासले आता काहीही संकट आपल्यावर येऊ शकत नाही ..असा त्या वेळेचा वेडा ......हो वेडा ..आता भासतो. पण तेव्हाचा दृढ विश्वास .. कारण वेळच अशी असते.एकमेकां शिवाय काही दिसत नसते. आपल्याच विश्वात गुरफटलेले असतो. 

असे मोहक क्षण अनुभवत .बोलत वेळ जातो. मग मात्र सहज झालेला स्पर्श हवा

हवासा वाटतो. व जणू जीवनाची वाटचाल कशी असेल याची मनी स्वप्न रंगवीत 

पावले हातात हात गुंफवित वाटचाल करु लागलो.. 

     चालत चालत कधी घराशी आलो कळलेच नाही. टाटा बायबाय करत 

उद्या च्या भेटीची आतुरता दोघांनी दर्शवत .निरोप घेत .पहिली भेट अविस्मरणीय मनी ठरवत... मनात आनंदाने घरी परतलो.

   असेच असतात ना ते पहिल्या भेटीचे क्षण!


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance