vaishali vartak

Tragedy Others

3  

vaishali vartak

Tragedy Others

प्रवास

प्रवास

3 mins
169


      प्रवास म्हटला की आयोजन आलेच. सर्व साधारण पणे प्रवासास जावयाचे म्हणजे निघण्याची तारीख नक्की करणे , तसेच परतीची तारीख पण नक्की करणे व त्या प्रमाणे गाडयांची availability पाहून , आपल्या वेळे प्रमाणे योग्य तशी सोयीची गाडी आहेना ? ते आपण पाहून घेतो. व त्या प्रमाणे दोन्ही आरक्षण करतोच . सध्या मुंबई काय , पुणे काय वा इतर सर्वच प्रवास reservation केले असले तर सुखदायी ,आरामदायी झालेले आहेत. मुंबई अहमदाबाद तर अगदी नेहमीच्या रुटीनचे झाले आहे. आम्ही पण अहमदाबाद -मुंबईचे व तसेच परतीचे पहिल्या वर्गाचे स्लीपर ए सी कोचचे reservation करून ठरल्या दिवशी परतीचा प्रवास सुरु केला होता .

      शेवटी अहमदाबादला पोहचलो . कधी एकदा अहमदाबाद येते असे झाले होते. आमच्या जवळ सामान विशेष नव्हते व आपल्याच म्हणजे स्वतःच्या शहरात परतत होतो ,त्यामुळे स्टेशन वर घेण्यास कोणीही येवू नका. आम्ही आमचे येवू हे सांगितले होते . त्यामुळे न कोणाची वाट पहाता घरी पोहचलो .

       घरी पोहचल्यावर मुलांनी विचारले कसा काय झाला प्रवास ? सुटकेचा श्वास सोडत म्हटले कसले काय ! रात्र भर जागेच आहोत. लगेच मुलांची प्रश्नांची प्रश्नावली झाली . म्हणजे? फस्ट क्लास ए सी चे reservation  होते ना ? आणि तुम्ही आलात त्यावरून कळतय की गाडी पण वेळेतच आलेली आहे . मग काय झाले? कुठे माशी शिंकली?

        अरे ! कसले reservation विचारतो रात्र भराची झोप नाही. मुंबई अहमदाबाद गाडीला सीझन असो नसो नेहमीच गर्दी. सीटच्या एका टोकाला बसून , बसून कसले! कसे बसे बुड टेकवून रात्र काढली. बाजूची बाई जाम हलायला तयार नव्हती. नेहमी जी स्टेशने झोपेत जातात ती सर्व स्टेशने अगदी चक्क उघडया डोळ्यांनी पहिलीत . मधेच एखादे पोर जोर जोरात रडत होते. खाली, माझ्या पायाशी बसलेली बाई माझ्या पायांना,गुडघ्यांना मान टेकविण्याचे साधन म्हणूनच वापर करत होती . त्यात चहा विकणारे त्या गर्दीत चहाची किटली सावरत ,"'चाय गरम,गरम चाय "ओरडत होते. तर मधेच ताजा वडा पाव , तर मधूनच पुरी भाजी असे ओरडत विक्रेते विक्रीचे काम आणि पैसे वसुलीचे काम सराहित पणे करत होते. रात्र झालेली असून रात्र आहे का दिवस कळत नव्हते . उभे असलेले प्रवासी आशाळभूत पणे बसलेल्या लोकांकडे पहात होते. पण कोणास दया येत नव्हती . चार जणांच्या सीट वर पाचव्या प्रवाशास जागा ,कशी तरी मिळाली होती . मिळाली कसली ?मिळविली होती .व तो प्रवाशी पण पुन्हा पुन्हा बसण्याची पोझिशन बदलत होता . मधेच एखादी बाई खाली बसलेल्या प्रवाशांना " जरा जाऊ द्या ना " म्हणत कसरत करत कशी बशी टोयलेट पर्यंत जावून परत येत होती. त्यात विकणारे होतेच . मधेच कुणीतरी खावून झालेला खाण्याचा कागद इकडे तिकडे टाकण्याचा प्रयत्न करत होते . अथवा सीट खाली जागा दिसेल तेथे ढकलत होते . गाडी थांबली की थंडीचे दिवस असून सुद्धा गर्मी जाणवत होती .

        अग पण reservation होते ,फर्स्ट क्लास ए सी चे तिकीट होते त्याचे काय झाले ? तिकीट हरविले की विसरलात व गाडीत बसल्यावर कळले की तिकीट नाही व pan no.पण नाही म्हणून ? मुलांनी एकदम प्रश्नांचा बडीमार केला.

       नाही रे! या वेळी reservation आपण बोरीवली हून केले. कारण मुंबईची सर्व कामे आटपून उशिराची गाडी घेतली . नेहमी दादर अथवा मुंबई सेंटर पासून तिकीट घेतो. व त्या गाड्या रात्री १२ च्या आधी सुटतात . व त्या गाड्या बोरिवलीला येतात तोवर १२ वाजून जातात व दिवस बदलतो . तेच आमचे झाले . गाडी वेळेत च आली.तिकीट पण हातात होते. पण हातातील तिकीटाची तारीख आदल्या दिवशीची होती . त्यामुळे ते तिकीट निरुपयोगी ठरले . व आता मिळेल ती गाडी, मिळेल ते reservation , वा नाही मिळाले तर without reservation प्रवास करावा लागला ,कारण आज सकाळी पुन्हा येथे येणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे नाईलाजाने का होईना फर्स्ट क्लास ए सी चे तिकीट हातात असून with out reservation अगदी असहाय्य होवून अगदी असह्य असा प्रवास केला .

         तेव्हा सर्व नीट planning करून पण कधी कधी असाही प्रवास घडतो .


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy