STORYMIRROR

vaishali vartak

Action Others

3  

vaishali vartak

Action Others

फजिती

फजिती

2 mins
206

मला फार फुशारकी होती, म्हणजे आहेच की माझ्या इडल्या खूपच हलक्या , स्पाँजी बनतात वा नेहमी बनतात असे म्हणा. म्हणजे सर्वांच्याच होत असतील पण मला माझ्या इडल्यांची ,छानच होतात अशीगोड समजूत आहेच.

मी माझ्या च तंद्रीत होते. व स्वतः ठरविले उद्या इडलीच नासत्याला करुया.आणि हो , हल्ली कसे तयार इडली डोस्याचे तयार वाटून पीठ , सर्वत्रच मिळू लागले आहे. तसे पूर्वी मिळत नव्हते त्यामुळे अचानक आता सारखे इडली ढोसे तयार करता येत नव्हते.

मी माझ्या अंदाजाने ,माझ्या कृतीने तांदळाचा रवा व उडीद डाळ तीनास /एक च्या प्रमाणात घेउन, भिजवून,व रात्रीच वाटून मस्त इडली पीठ तयार करून ठेवले व रात्र भरात छान फरनटेशन (फसफसेल) होइल व इडल्या नक्कीच नेहमी सारख्याच मस्त होतील. या विचाराने सर्वांना उद्या सकाळी अनायसे रविवार ,तर मस्त इडली चटणीचा ब्रेक फास्टआहे बर का! असे घोषित पण केले .

     रात्री ,आम्ही उद्या रजेचा दिवस म्हणून गप्पा करत बसलो. गप्पा छान रंगल्या. रात्री झोपण्या अगोदर अगदी मंद आचेवर दूध तापविण्यास ठेवले होते. ते तापले नंतर ते उतरवून थंड झाल्यावर फ्रीज मधे ठेवले . मग झोपायला जाताना अगदी बारीक गॅसवर ,ज्यावर दूध तापविले होते. त्या बर्नलवर इडलीच्या पीठाचे पातेले ठेवले की गॅस गरम होता तर उष्णतेने अजून छान फर्मनटेशन होईल. फसफसण्यासा मदत होईल हा मनात विचार .

     सकाळी उठून कीचन मधे आले. चहाची तयारी करण्यासाठी गँसवरून पातेले खाली उतरविण्यास हात लाविला..,तर इडली पीठाचे पातेले गरम . ते कसे काय ? म्हणून झाकण सारून पाहिले ....तर काय ...? सर्व पीठाची एकच इडली . ती पण न फुगलेली .म्हणजे गॅस तसाच चालू राहिला,होता.अगदी लहान गॅस व पातेले भले मोठे जाड बुडाचे त्यामुळे जळले नाही . पण माझ्या छान इडलीचा एकच इडलेश्वर झाला होता. सकाळच्या ब्रेक फास्टची मी फुशारकीने वाच्यता केली होती की माझी नेहमी च इडली मस्त असते .त्या इडली ची पूर्ण वाट लागली. व ईडली चटणी नास्त्याची पण पूर्ण वाट लागली होती.व चेष्टेचा विषय झाला ते वेगळेच .आणि माझी मात्र खुशखूशीत फजिती झाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action