Sangieta Devkar

Drama Inspirational

4  

Sangieta Devkar

Drama Inspirational

वा रे पुरुष

वा रे पुरुष

4 mins
471


तुला किती वेळा सांगितले की माझ्या वस्तू जागच्या जागी हव्यात मला? एकदा सांगून पण तुला समजत नाही का? घरात बसून काय करत असतेस? राकेश रागात वसुधा ला बोलत होता. अहो मी फक्त साफ सफाई करताना चुकून हलवले. काही गरज नाही माझ्या वस्तुंना हात लावायचा समजले. राकेश पून्हा ओरडला. वसू च्या डोळ्यात पाणी आले ती तशीच किचन मधये आली. राकेशसाठी चहा ठेवायचा होता. हे नेहमीचेच होते. राकेश स्वभावाने अत्यंत तापट आणि हेकेखोर. प्रेम त्यातला हळूवारपणा,आपलेपणा काय असतो हे त्याच्या गावी ही न्हवते. बायको ने बायको सारखे राहावे जास्त आवाज चडवू नये आणि नेहमी नवऱ्याच्या धाकात रहावे अशी त्याची विचारसरणी! वसू ने जास्त साज शृंगार करायचा नाही. परक्या माणसाशी बोलायचे नाही. शेजाऱ्यांशीही जास्त संबंध ठेवायचे नाहीत असे राकेशचे बरेचसे नियम आणि अटी होत्या. वसूचे लग्न ठरले तेव्हा राकेश तिला खूप आवडला होता दिसायला हँडसम, राकट शरीरयष्टी, उंचापुरा असा राकेश पाहताक्षणी तिला भावला होता. पण लग्न झाल्यानंतर त्याचा मूळ स्वभाव तिला समजला आणि तिच्या इच्छा अपेक्षाचा चुराडा झाला.


लग्नाला दहा वर्ष होत आली साकेत आणि शर्वरी दोन मुलं झाली तरी ही त्याच्या स्वभावात बदल नाही झाला. मुलंही त्याला घाबरून असायची. वसूला वाचनाची खूप आवड होती. तिचे काम उरकले की ती वाचन करत राहायची. राकेश च्या वागण्या कडे दुर्लक्ष करत राहायची तो बदलनार नाही मग आपण का उगाच त्रास करून घ्यायचा असा ती विचार करत होती. वाचनातून तिला बऱ्याच गोष्टी समजू लागल्या होत्या. तिच्या सारख्याच स्त्रियांच्या कथा वाचून ती विचार करत राहायची की आपण एकटीच नाही आहोत की जिच्या वाट्याला हे दुख आहे. अलीकडे वाचना मुळे तिच्यात थोडा थोडा बदल होत होता. आपण का राकेशची मनमानी सहन करतो ? तिने बी ए केलेले होते नोकरी करायची इच्छा असून ही राकेश च्या संशयी स्वभावा मुळे तिला नोकरी करता आली न्हवती त्यात त्याला मेल इगो जास्तच होता. रात्री सगळे एकत्र जेवायला बसले पहिला घास खाताच राकेश बोलला कसली भाजी बनवली आहेस तू ? याला चव तरी आहे ? कुठे लक्ष असते तुझे ? असे म्हणत ताट बाजूला सारून राकेश उठला आणि बाहेर गेला. वसूला समजेना की भाजी तर नेहमीप्रमाणेच बनवली होती मग याला का चव नाही लागली. जावू दे म्हणत वसू आणि मुलांनी जेवण केले.


थोड्या वेळाने राकेश घरी आला. वसु झोपण्याच्या तयारीने बेडवर पडली. राकेश फ्रेश होऊन आला. तिच्याजवळ झोपत त्याने तिला आपल्या जवळ ओढ़ले तर तिला ड्रिंकचा वास आला. राकेश ड्रिंक करायचा हे तिला माहित होते. ती त्याच्यापासून दूर झाली बोलली तुमच्याजवळ ही येण्याची माझी इच्छा नाही. तिने नाकारले याचा त्याला ख़ूप राग आला तुझ्या इच्छांचा इथे प्रश्नच येत नाही. तू माझी बायको आहेस हे विसरु नकोस आणि मला नकार द्यायचा तुला अधिकारच नाही आहे. असे म्हणत राकेशने तिचा हात घट्ट पकडला. वसु रागात म्हणाली, मी तर चांगला स्वयंपाक करत नाही. मला वागण्या बोलण्याचा सेन्स नाही. मला काम नीट जमत नाहीत मग असली बिनकामाची बायको तुम्हाला बेडमध्ये कशी काय चालते? जास्त बोलू नकोस आणि मला उलट उत्तर करू नकोस राकेशही चिडून बोलला. बास इतकी वर्ष तुमची मनमानी, तुमचा हेकेखोरपणा सहन करतेय आता नाही. मी पण माणूस आहे मला मन भावना आहेत निर्जीव वस्तू नाही मी. वसु बोलत होती इतके दिवस गप राहुन सगळ सहन केले पण सहन करण्याला पण मर्यादा असते आणि आज तिची मर्यादा संपली होती. राकेशने जोरात तिला थप्पड़ मारली. झालं इतकीच तुमची मर्दानगी. बायकोवर हात उचलला म्हणजे तुम्ही पुरुष म्हणून ओळखले जाता का? खबरदार पुन्हा माझ्यावर हात उचलला तर मी पोलीस कम्प्लेंट करीन.


वसुचे हे बोलणे ऐकून आणि तिचे बदललेले रूप बघून राकेश वरमला. वसु मला माफ कर मी खरंच तुझ्याशी चुकीचे वागत आलो. तुला कधी समजून नाही घेतले. पण मी तरी काय करू लहानपणापासून माझ्या वडिलांना माझ्या आईशी असंच वागताना बघत मोठा झालो. पुरुषाने बाईला डॉमिनेट करायचे आपला हक्क तिच्यावर गाजवायचा. यातच पुरुषार्थ आहे हेच माझ्या मनावर माझ्या वडिलांनी नकळतपणे स्वतःच्या वागणुकीतून बिंबवले. तेच संस्कार माझ्या कोवळ्या मनावर झाले. आता मला समजते आहे की माझ्या आईने किती आणि काय सहन केले असेल. वसु तू माझे डोळे उघडलेस आज. मी ही तीच चूक करत होतो जी माझ्या वडिलांनी केली. माझ्या मुलांवर मला चांगले संस्कार करायचे आहेत. शेवटी आपण जे पेरणार तेच उद्या उगवणार आहे. मग आपल्या मुलांच्या मनात चांगल्या संस्कराचे बीज आपणच पेरायला हवे. मला माफ कर वसु म्हणत राकेशने तिची माफी मागितली. वसु म्हणाली तुम्हाला तुमची चूक समजली यातच सगळं आले. यात तुमचा दोष नाही. बालपणी जे तुम्ही पाहिले, अनुभवले त्यावरुन तुमचा स्वभाव बनत गेला. पण लवकर तुम्हाला तुमची चूक लक्षात आली हे महत्वाचे आहे. मग राकेशने प्रेमाने वसुला आपल्या जवळ घेतले. वसुच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama